Wednesday 31 August 2011

वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ठरवलेले ध्येय स्वातंत्र्योत्तर काळात मातीमोल ?


पत्रकाराना संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याकरीता राज्य सरकारने नारायण राणे समिती स्थापन केली असून ही समिती म्हणे तीन महिन्यात अहवाल तयार करून राज्य शासनाला देणार आहे. त्यानंतर राज्य सरकार पत्रकारावर हल्ला झाल्यास हल्लेखोरावर कठोर कारवाई करणार आहे. आम्ही म्हणतो की, पत्रकारांवर उघड, उघड हल्ला करणार्‍या हल्लेखोरावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यावर हल्ला का झाला? याचे कारणही शोधले गेले पाहिजे. मिडडे चे जेष्ठ पत्रकार ज्योर्तीमय डे यांच्या एकट्यावर हल्ला झाला नाही. तर यापूर्वी अनेक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. असेही कायदे असून आता नवा कायदा केल्याने पत्रकारांना न्याय मिळणार आहे काय? कायदा केला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी किती पोलीस ठाण्यातुन केली जाईल, हे सांगता येत नाही. भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेले प्रशासन पत्रकारांना न्याय देवु शकलेच, हे सांगता येणार नाही. आज बहुसंख्य पत्रकारावर हल्ले होतात. त्यास पत्रकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. वृत्तपत्र स्वातंत्र्यास लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी अनेक वृत्तपत्रे स्वातंत्रपूर्व काळापासुन आपली भुमिका बजावित आहेत. परंतु या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ठरवलेले ध्येय स्वातंत्र्योत्तर काळात मातीमोल मिळविलेले दिसते.
      ज्या ग्रामीण भागात छोट्याशा बातमीकरिता, बहुसंख्य गावकर्‍यांना न्याय देण्याकरिता तहान भुक हरपून बातमी मिळविण्यासाठी वार्ताहर प्रयत्नशील असतात. त्यांना आज शेठजी, उद्योगपती व राजकारणी चालवित असलेले वृत्तपत्रे काय देतात, याचे संशोधन होणे गरजेचे बनले आहे. केवळ जाहिरातीच्या माध्यमातुन कमिशनाचे आमिष दाखवुन मर्यादेपेक्षा अधिक काम करून घेतात. या जाहिरातीही मिळविण्याकरिता आपल्या प्रतिनिधीला काय करावे लागेल, याची चिंता याना नाही. लाखो रूपयेच्या जाहिराती मागे तुटपुंजे कमिशन देवून हे वृत्तपत्रचालक एकप्रकारे लाटत आहेत. बातम्या व जाहिरातीसाठी आज ग्रामीण वार्ताहरांना वृत्तपत्र कार्यालयात बसलेले मोठे वार्ताहर (पत्रकार) सतत दमदाटी करून गुन्हेगारी करण्यास भाग पाडताना दिसतात. कार्यालयातुनच आदेश म्हटल्यावर बातमीदार हा फक्त गुन्हेगारांच्याच मागे बातमी असते म्हणत त्यांच्याच मागावर असतो व गुन्हेगारांना एक तर साथ देतो किंवा त्याच्याकडून मारला किंवा मार खालला जातो. यावर विचार कोण करणार आहे की नाही? नारायण राणे समितीने पत्रकारांवर हल्ले रोखण्यावर कायदा करण्यापेक्षा वृत्तपत्राकडून त्यांची गळचेपी का होते, बातमीदार, पत्रकारास प्रेस मालक वेठबिगारासारखे का वागवित आहेत, याची ही चौकशी करावी म्हणजे पत्रकार गुन्हेगारी धंदे करणार नाहीत, याबाबत वृत्तपत्र सृष्टीत दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

पिपली लाईव्ह सारखे राळेगण लाइव्ह करू नका....

प्रभावी जन लोकपाल विधेयकासाठी तेरा दिवस उपोषण करून थकलेले अण्णा हजारे चार दिवस दिल्लीच्या एका हॉस्टीपटमध्ये उपचार घेतल्यानंतर बुधवारी रात्री दिल्लीहून पुण्याला आले व लगेच राळेगण सिध्दीला याच रात्री पोहचले आहेत...आता गुरूवारी त्यांची मुलाखत घेण्यासाठी सर्व हिंदी आणि मराठी चॅनेलचे संपादक ओबी व्हॅन घेवून राळेगण सिध्दीला पोहचणार आहेत...अगोदरच अण्णा थकलेले आहेत, त्यांना हे चॅनलवाले उलट - सुलट प्रश्न करून भंडावून सोडण्याची शक्यता आहे...कृपया अण्णांना त्रास होईल असे वागू नका...कृपया पिपली लाईव्ह सारखे राळेगण लाइव्ह करू नका....

Monday 29 August 2011

अण्णा हजारे यांना जाहिरात मागणाऱ्या या संपादकाला तुम्ही काय म्हणाल ?

नगर - पत्रकारितेचा दर्जा काही लोकांमुळे किती खालावलाय याचा विचार कोणीही करू शकत नाही. एक संपादक (अर्थात या पदाचे कोणतेही गुण नसणारा) अन्नाला म्हणाला, आम्ही तुम्हाला एवढी प्रसिद्धी देतो, आमच्या वर्धापनासाठी तुम्ही आमच्या पेपरला तुमच्या trustchya माध्यमातून जाहिरात द्या. अन्नानीही त्या घमेंडी संपादकाला माझ्यानावाचे एकही अक्षर तुम्ही लिहू नका, असे नम्रपणे सांगितले. मग कळेल कोण कोणाला प्रसिद्धी देतोय ते. अण्णा हजारे यांना जाहिरात मागणाऱ्या या संपादकाला तुम्ही काय म्हणाल...
आता हेच संपादक परवा दिल्लीला जावून आले आणि अण्णासोबत फोटो काढून पवित्र झाले..
काय हरामखोर लोक असतात. अण्णांचे उपोषण सुरु झाले तेंव्हा हे चेष्टा करत होते त्यांची. आणि आता यांना अण्णा दैवत वाटू लागले काय.?
जाऊ द्यात. कावळा किती उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला तरी त्याचा गरुड थोडाच होणार आहे.
त्याचे टोपण नाव गब्बर आहे....तुम्ही शोध घ्या...

टोपीचा परिणाम

अण्णांचे आंदोलन देशव्यापी ठरले. प्रत्येक व्यक्तीला यामुळे काही ना काही अनुभव दिले. नाशिकचे एक शिक्षकदेखील जमेल त्या वेळेत या आंदोलनांमध्ये सहभागी झाले. आंदोलकांप्रमाणे डोक्यावर गांधी टोपी घालून वावरणेदेखील त्यांच्या अंगवळणी पडले. टोपी तुम्हाला खरोखरच खुलून दिसते, असे आंदोलनातील त्यांच्यासारख्याच काही समवयस्कांनी त्यांना सांगितले. त्यामुळे घरच्यांनादेखील ती टोपी घालून आपले रुप दाखवावे, म्हणून ते घरीदेखील त्याच अवतारात जाऊ लागले. घरच्यांनी सुद्धा हेच रुपडे चांगले दिसत असल्याचे सांगितल्याने तर त्यांना स्फुरणच चढले. आंदोलन संपले तरी ते टोपी डोक्यावरून काढायला तयार नाहीत. आंदोलनाची आठवण म्हणून आता ही टोपी कायमस्वरूपी घालणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आंदोलनाच्या निमित्ताने गांधी टोपी डोक्यावर घालून त्याखालील टक्कल लपवायची संधी त्यांनी साधल्याचे शेजारपाजारचे रहिवासी म्हणतात. काही सहकारी आंदोलनामुळे त्यांच्या ‘डोक्यावर परिणाम’ झाल्याचे खासगीत सांगतात.