Friday, 30 November 2012
'झी'च्या संपादकांना १४ दिवसांची कोठडी
नवी दिल्ली - झी
वृत्त वाहिनीच्या दोन वरिष्ठ संपादकांना आज दिल्लीच्या एका न्यायालयाने १४
दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल
यांच्या कंपनीकडून १00 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी या दोघांना अटक
करण्यात आली होती.
महानगर दंडाधिकारी गौरव राव यांनी झी न्यूजचे प्रमुख सुधीर चौधरी व झीचे बिझनेस संपादक समीर अहलुवालिया यांची १४ डिसेंबरपर्यंत तिहार कारागृहात रवानगी केली. तपास पूर्ण झाला असून, त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे, असे न्यायालय म्हणाले. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, आज या दोघांच्या वतीने नव्याने जामीन याचिका करण्यात आली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. |
Subscribe to:
Posts (Atom)