औरंगाबाद - दिव्य मराठीचे दर रोज मजेदार किस्से समोर येत आहेत. दैनंदिन बातम्या कमी आणि टुकार लेख देण्यात धन्यता मानणारे हे वृत्तपत्र आता बंद पडलेले मालहि सुरु करत आहेत. दिव्य कन्या रोशनी शिंपीला श्रीकांत सराफ यांनी एक टुकार बातमी करायला सांगितली. आज २५ ऑक्टोबरच्या दिव्य सिटीच्या पान २ वर दिवाळीत हाईटेक बाजार हाट या शीर्षक खाली ती बातमी प्रसीद झाली आहे. वास्तविक पाहता हे बीट भाग्यश्री बाप्ते नावाच्या ट्रेनी रिपोर्टरचे आहे. पण श्रींच्या मार्जीमुळे रोशनीला वाटेल तेथे शिंपले वेचण्याची परवानगी आहे. असो, नेहमीप्रमाणे ट्रेनी रिपोर्टर शिंपीने या बातमीत भरपूर चुका केल्या. या बातमीत शहरातील प्रमुख मालचे नावे टाकली आहेत. यात सहा मालची नवे टाकण्यात आली आहेत. दोन नंबरवर विशाल मेगा मार्ट असे नाव आहे. मात्र हा माल बंद पडून एक वर्ष झाले. सराफ साहेब पूर्वी काम करत असलेल्या सकाळमध्ये याची बातमी आली होती. तसेच सर्वच मेडियाने या घटनेची दाखल घेतली होती. तरीही या मालचे नाव टाकून शिंपल्यासहित तिचा बॉस सराफ आणि त्याचा बॉस देविदास लांजेवार यांनी नकळत बंद पडलेला माल सुरु केला आहे. खास दिवाळी निमित्त असे बंद माल सुरु झाले तर हि खरच आनंदाची बातमी ठरेल. याच बातमीत शिम्पीने reliance फ्रेश माल चा उल्लेख केला आहे. या मालमध्ये भाज्या आणि फळे मिळतात. यात कोणती आली हाईटेक खरीदी असा प्रश्न पडतो. श्रींच्या आशीर्वादानेच हे घडत असल्याचे समजते.
ता.क . आता रोशनी शिंपी हीच शहर प्रतिनिधींवर लक्ष ठेवेते. मीटिंगला जाण्याची सूचना तीच देते आणि परस्पर तीच कामे सांगते. हीच श्रींची इच्छा असावी.
ता.क . आता रोशनी शिंपी हीच शहर प्रतिनिधींवर लक्ष ठेवेते. मीटिंगला जाण्याची सूचना तीच देते आणि परस्पर तीच कामे सांगते. हीच श्रींची इच्छा असावी.