चोपडा - शहर
पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शामकांत सोमवंशी व कॉन्स्टेबल विकास कोल्हे
यांच्या विरोधात येथील न्यायालयात शिवसेना नगरसेवक सुधाकर महाजन यांच्या
फिर्यादीवरुन 20 हजाराची खंडणी मागितल्याची तक्रार फौजदारी खटला
नं.151/2012 प्रमाणे कलम 504 (जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ) , 384 (पैसे
उकळणे वा खंडणी मागणे) नुसार दाखल करण्यात आला आहे.
महाजन यांच्या तक्रारीनुसार ते नगरसेवकपदी दोन वेळा निवडले आहेत. त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. 25 नोव्हेंबर रोजी चोपडय़ात दंगल घडली, त्यावेळी महाजन हे शेतात त्यांच्या कुटुंबियांसोबत काम करीत होते. दंगलीत सहभाग नसताना सूडभावनेने त्यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. महाजन यांनी त्यावेळी अमळनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. अटकपूर्व जामिनची पूर्तता करण्यासाठी महाजन व त्यांचे भाऊ रघुनाथ महाजन हे शहर पोलीस स्टेशनला गेले असता तपास अधिकारी एपीआय दिलीप बुवा यांनी सोमवंशीच्या दालनात महाजन यांना नेले, तेथे कॉन्स्टेबल विकास कोल्हे हेही हजर होते. दिलीप बुवा तिथून निघून गेले. शामकांत सोमवंशी यांनी महाजन यांच्याकडे 20 हजार रुपये खंडणी मागितली व कॉन्स्टेबल विकास कोल्हे यांच्याकडे देण्यास सांगितले.
महाजन यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना सोमवंशी व कोल्हे यांनी शिवीगाळ केली व ‘तुङो राजकारण संपवून टाकू, गुन्हे दाखल करुन घेणे हे आमच्या अख्यत्यारित असते. तुला मोठमोठय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकू व कायमचा संपवून टाकू’ अशी धमकी दिली व शिवीगाळ केली, ‘ असे अनेक तीनपाट नगरसेवक सोमवंशीने पाहिले आहेत. तू काय चिज आहे.’ अशीही भाषा त्यांनी वापरली. त्यानंतरही विकास कोल्हे यांनी महाजन यांच्याकडे पैशांसाठी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. ‘व्यवस्था करतो’ असे महाजन यांनी सांगितले.
त्यानंतर 15 डिसेंबरला विकास कोल्हे यांनी महाजन यांना जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा चॅप्टर प्रोसिडींगसाठी हजर केले असता पुढील जामिनाची पूर्तता करण्यासाठी 20 डिसेंबर 12 ची मुदत देण्यात आली. दरम्यानच्या काळात ऐपतदार दाखला (सॉलव्हन्सी) व उतारे काढण्यात महाजन यांचा वेळ गेला. याबाबतीत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार पाठविलेली आहे. मात्र कार्यवाही झाली नसल्याचे महाजन म्हणतात.
चौकशी होऊन आरोपींना जास्तीत जास्त दंड व शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी फिर्यादीत केली आहे.
दरम्यान नगरसेवक महाजन व त्यांचे वकील अॅड.धर्मेद्र सोनार यांच्याकडे गुन्हा दाखल झाल्याची सांक्षाकित प्रत मागितली असता आज खटला दाखल होण्यास उशिर झाल्याने प्रत देऊ शकत नाही, ती 28 रोजी देण्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची चर्चा होत असून शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलिसांमध्येही कुजबुज होत आहे.