Monday 29 August 2011

टोपीचा परिणाम

अण्णांचे आंदोलन देशव्यापी ठरले. प्रत्येक व्यक्तीला यामुळे काही ना काही अनुभव दिले. नाशिकचे एक शिक्षकदेखील जमेल त्या वेळेत या आंदोलनांमध्ये सहभागी झाले. आंदोलकांप्रमाणे डोक्यावर गांधी टोपी घालून वावरणेदेखील त्यांच्या अंगवळणी पडले. टोपी तुम्हाला खरोखरच खुलून दिसते, असे आंदोलनातील त्यांच्यासारख्याच काही समवयस्कांनी त्यांना सांगितले. त्यामुळे घरच्यांनादेखील ती टोपी घालून आपले रुप दाखवावे, म्हणून ते घरीदेखील त्याच अवतारात जाऊ लागले. घरच्यांनी सुद्धा हेच रुपडे चांगले दिसत असल्याचे सांगितल्याने तर त्यांना स्फुरणच चढले. आंदोलन संपले तरी ते टोपी डोक्यावरून काढायला तयार नाहीत. आंदोलनाची आठवण म्हणून आता ही टोपी कायमस्वरूपी घालणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आंदोलनाच्या निमित्ताने गांधी टोपी डोक्यावर घालून त्याखालील टक्कल लपवायची संधी त्यांनी साधल्याचे शेजारपाजारचे रहिवासी म्हणतात. काही सहकारी आंदोलनामुळे त्यांच्या ‘डोक्यावर परिणाम’ झाल्याचे खासगीत सांगतात.