Monday 19 December 2011

वेबसाईटवरून खोटे पॅकेज विकून फसवणूक

हिंगोली -  मुंबईच्या बांद्रा भागात आर्यरूप टूरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट कंपनीच्या नावाखाली तीन महिन्यांत रक्‍कम तिप्पट करून देण्याचे पॅकेज विकून पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल पुणे, कोल्हापूर व चंद्रपूर भागातील तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्‍यातील निशाणा येथील श्रीराम शेषराव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बांद्रा ईस्ट भागात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आरोपी रवींद्र देशमुख व वसुंधरा रवींद्र देशमुख यांच्यासह काही जणांनी आर्यरूप टुरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट ही कंपनी उघडली. त्यानंतर या कंपनीने www.airrupa.in ही वेबसाईट उघडली. आरोपी विश्‍वासराव देशमुख (मुंबई), रामचंद्र थोरात (पुणे), पुंडलिक इंगळे (सोलापूर), अतुल बाबाराव जाधव, कल्पना अतुल जाधव (चंद्रपूर), राहुल वाणी ऊर्फ राहुल पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पाच संशियातांनी या वेबसाईटवरून पॅकेजची विक्री केली. या वेबसाईटवर कंपनीच्या स्कीमची प्रसिद्धी केली. त्यामध्ये नऊ हजार रुपये भरल्यास नव्वद दिवसांत सत्तावीस हजार रुपये मोबदला देणारी पॅकेज प्रदर्शित केले. यासोबतच पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दीड लाख, तीन लाख व पाच लाख याप्रमाणे पॅकेज नव्वद दिवसांत तीनपट करून दिले जातील असे जाहीर केले. या स्कीममध्ये फिर्यादीसह परसराम मोरे (मसोड), नीळकंठ नामदेवअप्पा कापसे (लासिना) आदींनी हिंगोलीच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये काम करणाऱ्या अतुल जाधव याच्यामार्फत पॅकेजमध्ये सहभाग घेतला.

त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपये भरले. नंतर पॅकेजच्या रकमा जमा केल्या. नंतर नव्वद दिवसांचा कालावधी लोटल्यावर संबंधित खातेदाराच्या खात्यावर रकमा जमा झाल्याच नाही तेव्हा फिर्यादी श्री. जाधव यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. तेव्हा तेथील अधिकारी राजेश पांडे यांनी कंपनी चांगल्यापद्धतीने काम करीत आहे असे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने पैसे जमा झाले नाहीत असेही सांगितले. नंतर दुसऱ्यांदा बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कंपनीचे अकांउंट लॉक झाले आहे असें सांगितले. राहुल पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील खातेदारांचे पैसे घेण्याचे जबाबदारी घेतली. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळणार नाहीत असेही सांगितले. या प्रकाराला कंटाळून अखेर श्री. जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून तेरा संशयित आरोपींच्या विरोधात 25 लाख 53 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर इंगोले तपास करीत आहेत.

Saturday 17 December 2011

दिव्य मराठीचे "दिव्य ज्ञान" ... वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकांची मनाने बदलली नावे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली. त्याची बातमी देताना दिव्य मराठीने आपल्या अगाध ज्ञानाची प्रचीती दिली. "सर्वत्र पसरलेली मुळट", शुण्यशेष, अधोलोक आणि मर्त्य, यात्रा हि पुस्तके डहाके यांच्या नावावर असल्याचे बातमीत लिहिले आहे. दिव्या मराठीच्या ज्या प्रतिनिधीने हा शोध लावला त्याने हे ज्ञान कुठून मिळवले हे सांगावे.
डहाके यांच्या पुस्तकांची नावे अशी :
कविता - योगभ्रष्ट (१९७२), शुभवर्तमान (१९८७), शून्:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६)
कादंबरी - अधोलोक (१९७५), प्रतीबध्य आणि मर्त्य (१९८१)
लेखसंग्रह - यात्रा अंतर्यात्रा (१९९९), मालटेकडीवरून (२००९)
समीक्षा - समकालीन साहित्य (१९९२), कवितेविषयी (१९९९), मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती (२०११), मराठी समीक्षेची सद्यस्थिती (२०११).

Tuesday 6 December 2011

पुरस्कारप्राप्त ‘साकेत’ प्रकाशनाच्या लबाडीचे ‘भागवत’ पुराण

औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था. मागीलवर्षी महाराष्ट्र शासनातफेर् दिला जाणारा उत्कृष्ठ प्रकाशनासाठीचा ‘श्री.पु.भागवत’ पुरस्कार या प्रकाशनाला प्राप्त झाला. तसेच मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘वि.पु.भागवत’ पुरस्कारही या संस्थेला यावर्षी प्राप्त झाला. साहजिकच या प्रकाशनाची ग्रंथव्यवहाराबाबत नैतिक जबाबदारी वाढली. यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या. पुण्या मुंबईच्या बाहेर मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा बहरला नाही. या दृष्टीने विचार करता साकेत प्रकाशनाने औरंगाबादला आपली संस्था स्थापन केली व वृद्धिंगत केली. 1500 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली ही संस्था.
या प्रकाशनाच्यावतीने शिवराज गोर्ले यांची ‘दुरंगी’ या नावाची कादंबरी नुकतीच (डिसेंबर 2011) मध्ये प्रकाशित झाली. ही कादंबरी 1995 मध्ये ‘सामना’ नावाने इंद्रायणी साहित्य (पुणे) या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती.  मुक्त अर्थव्यवस्थेची पाठराखण करणारी मराठीतील पहिलीच कादंबरी म्हणून तेंव्हा तिचा गौरवही झाला होता. 
साहजिकच जेंव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेंव्हा हा सगळा उल्लेख त्यावर असावा अशी अपेक्षा होती. किमान हे पुस्तक पुर्वी कुठल्या प्रकाशनाने आणि कोणत्या नावाने प्रकाशित केले आहे हे नोंदवणे आवश्यक होते. पण तसे काहीच घडले नाही. पुस्तक चक्क पहिल्यांदाच निघते अशा आवेशात प्रकाशकांनी ते प्रकाशित केले आहे.
ज्या प्रकाशनाला मौजेच्या दोघाही भागवत बंधूंच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला, ज्या भागवत बंधूंनी आयुष्यभर प्रकाशन व्यवसायाची नैतिकता जपली त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार्‍या साकेत प्रकाशनाला अशी लबाडी करायची का गरज भासली?
यातली गोम अशी की हे पुस्तक शासनाच्या खरेदीमध्ये, राजा राम मोहन रॉय योजनेच्या खरेदीत, विविध पुरस्कारांसाठी सादर होणार. त्याची खरेदी जर शासनाने इ.स.2011 मधील नवीन पुस्तक म्हणून केली तर या व्यवहाराला काय म्हणायचे? या पुस्तकाला एखादा पुरस्कार प्राप्त झाला तर काय करायचे?
या पुस्तकासाठी प्रकाशक म्हणून जी काही मेहनत इंद्रायणी साहित्यच्या श्याम कोपर्डेकरांनी केली असेल ती तर मातीतच गेली. त्याची भरपाई कशी करायची? पु.ल. देशपांडे यांची पुस्तके देशमुख आणि कंपनीने आधी प्रकाशित केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या/ पुनर्मुद्रणे मौजेनं प्रकाशित केली पण आवर्जून त्यावर पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक म्हणून देशमुखांचे नाव ठेवले. पण शिवराज गोर्ले किंवा साकेत प्रकाशन या दोघांनाही ही नैतिकता पाळाविशी वाटली नाही. या वृत्तीला काय म्हणावे?
साकेतच्या कैक प्रकाशनांवर आवृत्त्यांचे क्रमांकच नसतात. शासकीय खरेदी साठी चाललेली ही लबाडी सामान्य वाचकांच्या लक्षात येत नाही. पण निदान मोठमोठे प्रतिष्ठेचे पुरस्कार देणार्‍या संस्थांच्या तरी लक्षात यावी. आता 16 तारखेला मुबईमध्ये उत्कृष्ठ प्रकाशक म्हणून ‘वि.पु.भागवत’ पुरस्कार स्वीकारल्यावर साकेत प्रकाशन पुरस्काराला उत्तर काय देणार? नवीन प्रकाशकांपुढे काय आदर्श म्हणून ठेवणार? दुसर्‍यांच्या संहिता पैशाच्या जोरावर पळवा आणि परस्पर शासनाच्या ग्रंथखरेदीमध्ये घुसडून पैसे कमवा. शिवाय विविध पुरस्कार मिळवून प्रतिष्ठाही मिळवा. त्यासाठी कुठलीही मेहनत करण्याची गरज नाही. लेखकांना किती आवृत्या निघाल्या हे सांगण्याची आवश्यकता नाही.

Monday 5 December 2011

वीणा मलिक करणार २० लाख डॉलरचा दावा

नवी दिल्ली : एफएचएम मॅगेझिनच्या कव्हरवर वीणा मलिकचा छापण्यात आलेला नग्न फोटो हा बनावट असून, आपण मॅगेझिनकडे २० लाख डॉलरचा अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचं, वीणा मलिकच्या वकीलांनी म्हटलंय.
भारतीय मॅगेझिन एफएचएमने वीणा मलिकची फसवणूक केली असून, वीणा मलिकच्या मूळ फोटोत फेरफार करण्यात आले आहेत, असंही वीणा मलिकचा वकील अयाझ बिलावाला यांनी म्हटलंय.

एफएचएम मॅगेझिनच्या ज्या प्रतिंवर वीणा मलिकचा नग्न फोटो छापण्यात आला आहे, त्यासर्व प्रति परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीणा मलिकचा फोटो फेरफार करून छापण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.
वीणा मलिकच्या वकीलाने संबंधित मॅगेझिनवर अब्रु नुकसानीचा दावा म्हणून २० लाख डॉलरची मागणी करण्याच ठरवलंय.एचएफएमचे संपादक कबीर शर्मा यांनी हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय. आपल्याजवळ फोटो शूटच्या वेळचा व्हिडीओ असल्याचं कबीर शर्मा यांनी म्हटलंय.

http://www.fhm.com 

Friday 2 December 2011

...सरकारी अधिकाऱ्यांना नाचवलं सापांनी!

लखनौ - एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी वारंवार खेटे घालूनही दाद घेतली जात नसेल तर काय करावं...? आणि समजा अनेक मिनतवाऱ्यांनंतर यदाकदाचित कुणी दाद घेतली, तरी काम करून देण्याच्या बदल्यात लाच मागितली तर...तर काय करावं? तर संबंधित कार्यालयात चक्क साप सोडावेत...! नाही, नाही, हा काही काम करवून घेण्याचा पर्याय मुळीचच होऊ शकत नाही...आणि तसं कुणी कुणाला सुचवूही नये...पण एके ठिकाणी खरंच असं घडलं आहे खरं!

हे जिथं घडलं ते राज्य आहे - उत्तर प्रदेश. गाव - हरय्या आणि ही "करामत' करणाऱ्या व्यक्तीचं नाव - हक्कुला. हक्कुलानं "हरय्या' या गावातील सरकारी अधिकाऱ्यांना अशा रीतीनं हरवलं!

हक्कुला आहे सर्पमित्र आणि त्याला उभारायचं आहे सर्पोद्यान. परिसरातील सरकारी कार्यालयांत घुसणारे साप पकडण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करतो. पकडलेल्या सापांसाठी एक सर्पोद्यान असावं, अशी त्याची इच्छा आणि त्यासाठी छोटासा भूखंड मिळावा, ही मागणी. तहसीलदार कार्यालयाकडं ही मागणी करकरून तो थकून गेला...पण सरकारी अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी काही त्याची दाद घेतली नाही. इकडं हक्कुलाचा राग मनातल्या मनात साठत गेला आणि तब्बल तीन डझन विषारी सापांच्या रूपानं बाहेर पडला! हक्कुलानं केलं काय, तर आजवर पकडून ठेवलेले हे सगळे साप त्यानं तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले. या प्रकारानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना पळता भुई अक्षरशः थोडी झाली! जीव वाचवण्यासाठी काहींनी तर खिडक्‍यांमधून उड्याही घेतल्या. अन्य कामांसाठी कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांनीही कार्यालयाबाहेर धूम ठोकत या "सर्पसंकटा'पासून स्वतःचा बचाव केला.

थोडक्‍यात, हक्कुलानं सगळं कार्यालय काही काळ असं पुंगीशिवायच नाचवलं...!

सर्पोद्यानासाठी भूखंडाची मागणी हक्कुला तीनेक वर्षांपासून करत होता...."पकडलेले साप ठेवायला जागा हवी आहे; तेव्हा छोटासा का होईना भूखंड आपल्याला मिळावा,' असं त्याचं म्हणणं. मात्र, "असा भूखंड देण्याची तरतूदच नाही,' असं ठेवणीतलं सरकारी उत्तर देऊन दर वेळी त्याची बोळवण केली जात असे. शेवटी हक्कुलानं तब्बल 36 साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले...आणि नंतर हलकल्लोळ माजला...

हक्कुलाच्या मागणीविषयी तहसीलदार सुभाषमणी त्रिपाठी यांचं म्हणणं असं - "हक्कुलाविषयी आम्हाला सहानुभूती आहे; पण सर्पमित्राला भूखंड देण्याची तरतूदच नसल्यानं आमचाही नाइलाज होता. आता घडल्या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हक्कुलाला हंगामी स्वरूपाचा भूखंड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण हक्कुलानं जे काही केलं ते चुकीचं आहे, हेही आपण विसरता कामा नये.'' हक्कुलाच्या विरोधात स्थानिक पोलिसांकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर हक्कुलाला त्याची बाजू मांडायची आहेच. तो म्हणतो, "तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भूखंड देण्याची तयारी दाखविली होती; पण ते लाच मागत असल्यानं रागाच्या भरात मी हे कृत्यं केलं.''

आता, या लाचरूपी सापाचं करायचं तरी काय, याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही!

Tuesday 22 November 2011

मद्यधुंद पत्रकाराचा अर्धनग्नावस्थेत जाहीर तमाशा

घाटंजी (जिल्हा यवतमाळ)
येथिल एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधीने दि. १२ नोव्हेंबरला  सायंकाळी सिनेमा टॉकीज चौकात अर्धनग्नावस्थेत चांगलाच धुमाकुळ घातला.
सुक्ते यांच्या चहा टपरीवर  एका पत्रकाराने जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन पानटपरी चालकास शिवीगाळ सुरू केली. टपरीवरील चहाचे कप फोडले व सामानाची नासधुससुरू केली तसेच सुक्ते यांची कॉलरही पकडली. एवढ्यावरच तो थांबला नाही तरत्याने आपली पँटही काढली आणी अर्धनग्न होऊन धिंगाणा घालणे सुरू केले.
यावेळी परिसरातील नागरीकांनी त्यास चांगलाच चोप दिला. सुरेश भोयर यांनी त्यास नागरीकांच्या तावडीतुन सोडविले. एका ठिकाणी नेऊन त्याचे अंगावर पाणी टाकुन नशा उतरविण्याचा प्रयत्न केला. तरी त्याची नशा उतरली नाही. त्याने पुन्हा तिथेच येऊन गोंधळ सुरूच ठेवला. यापुर्वी त्याने अशाच प्रकारे घोटी येथे एका परिचारीकेच्या घरी रात्री एक वाजता जाऊन दारास लाथा बुक्क्या मारून शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पारवा पोलीस स्टेशन मध्ये त्याचेवर गुन्हे दाखल झाले आहे. सदर पत्रकार आपल्या वागणुकीत बदल न करता वारंवार असे प्रकार करीत आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये त्या पत्रकाराबाबत संताप व्यक्त होत असुन संबंधीत वर्तमानपत्राने अशा पत्रकारांवर वचक ठेवावा अशी मागणी होत आहे.

स...र...''काळ'' ऑन ''घोळ" करणारे वे ...

पुणे - पुण्यातील नंबर एकचे दैनिक म्हणवणाऱया एका वृत्तपत्राच्या मालकाचा आता एकच ध्यास आहे. आणि ते म्हणजे आपल्याकडे ''घोळ" करणारे शंभर ''वे'' पाहिजेत. त्यानुसार त्यांनी पिंपरी-चिंचवड कार्यालयात असा घोळ करणारा एक माणूस ठेवला आहे. जाहिरातीच्या नावाखाली खंडणी वसूल करणारा ह पत्रकार सध्या या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील बिल्डर आणि राजकारण्यांच्याकडे अक्षरशः खंडण्या वसूल करत फिरत आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या इतिहासात नाव कोरलेल्या या  दैनिकाची पुरती बदनामी झाली आहे.

हा पत्रकार पूर्वी काम करणा-या दैनिकात टेलिफोन पुसण्याचे काम करत होता. परंतु, भावाच्या लग्नाला चक्क ३ हॅलिकॉप्टर घेऊन गेला होता. हाच त्याचा भाऊ आौरंगाबाद येथे एका उद्योजकाकडून खंडणी मागताना पोलिसांनी पकडला आहे. यापूर्वीच्या दैनिकात काम करताना दहा वर्षांपुर्वी रिसेपशनिस्टला याच पत्रकाराकडून दिवस गेले होते. नको ती झंजट म्हणून त्याने तिला दीड लाख रुपये व लग्नाचा खर्च दिला. लग्नानंतरही त्या रिशेप्शनिस्टसोबत त्याचे संबंध होते. आजही तो एखाद्या दैनिकातील चीफ रिपोर्टरला मिळणा-या महिन्याच्या पगारा इतक्या पैशांची नुसती दारु ढोसत असतो. आणि तो इतर पत्रकारांना हा दारूचा किस्सा अभिमानाने सांगतो. याची ''दलाल'' अशी आेळख असताना हा मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये येणा-या सर्व वरिष्ठ अधिका-यांना 'मी'चं आणल्याचे ठासून खोटे बोलत असतो. सध्या पुण्यातील नंबर एकच्या दैनिकात ''दुकानदारी'' करण्यासाठी आणलेला आणि बारावी सुद्धा पास नसलेला हा पत्रकार आठ आवृत्तीच्या संपादकांवर दादागिरी करू लागला आहे. या दैनिकातील प्रामाणिक पत्रकारांचे रिलेशन बाजारात विकण्यासाठी निघाला आहे. नुकत्याच झालेल्या मटका प्रकरणातून त्याने आणि ''कुठे कुठे'' खाऊ म्हणून कोणत्याही बातमीसाठी लोकांच्याकडून पैसे घेणा-या त्याच्या एका चेल्यामुळे या दैनिकातील एका प्रामाणिक पत्रकाराला स्वाभिमानाला ठेच पोचल्याने राजीनामा द्यावा लागला. त्याच्या या चेल्यामुळे पहिल्यापासून या दैनिकाची बदनामी होत आली आहे. तरीही त्याला प्रत्येकवेळी पाठीशी घालण्यात येत आहे. या पैसे खाऊ ''कुठे''ला आता हा दलाल पत्रकार वरिष्ठांच्याकडे प्रमोशनची शिफारस करत आहे. या प्रकरणाता बिच्चारे संपादक आणि आणखी एका वरिष्ठ अधिका-याला नाहक बदनाम व्हावे लागले.
शंभर ''घोळ'' करणा-या या दलाल पत्रकाराने एका महापालिकेची २ लाखांची जाहिरात देऊन ८ लाख रुपये उकळले होते. एका जागरुक नागरिकाने हे प्रकरण उघडकीस आणल्याने या दलाल पत्रकाराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पुण्यातील एका नामांकित बिल्डरने मुंबईतील आदर्श शेजारील पाच एकरच्या प्लॉटचा काही भाग आरक्षित असताना तो मंत्रालयातून ''एनए" करून आणण्याची 'सुपारी' याला दिली होती.
राज्यात अलिकडे बनावट डॉक्टर व वकिलांवर कायदेशीर कारवाई होत आहे. परंतु बारावी पास असलेल्या आणि स्वतःच्या चेल्याला ''डमी'' बसवून पत्रकारितेची पदवी मिळविणाऱया पत्रकारावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न प्रामाणिक पत्रकारांना पडला आहे. बिल्डरांना धमकावून पत्रकारितेचे हत्यार वापरून जाहिरातीसाठी स्वत:च ठरविलेल्या दराने खंडण्या वसूल करणा-या या पत्रकाराला नंबर एकच्या दैनिकाची नव्याने सुरू होत असलेल्या स्वतंत्र आवृत्तीचा निवासी संपादक करण्यात येणार आहे. त्यामुळे या दैनिकाची आता ''काळ'' आली आहे, अशी चर्चा पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. आता तो पुण्यातील ज्या नंबर एकच्या दैनिकात काम करतो तेथेच स्वतःची ''घोळ माझा'' (जीएम) एन्टरप्रायझेस नावाची जाहिरात एजन्सी सुरू केली आहे. या एजन्सीच्या नावाखाली वर्धानपदिनाच्या जाहिराती गोळा करताना मालकाचा फायदा करण्याऐवजी स्वतःचीच तुंबडी भरण्याचे उद्योग या पत्रकाराने सुरू केले आहेत. शहरातील सर्व बिल्डरांना आणि राजकाऱण्यांना दैनिकाच्या नावाचा वापर करून जाहिरातीसाठी धमकावू लागला आहे. या सर्व बाबी कानावर जाऊनही ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असा मालक त्या दलाल पत्रकारावरच मेहरबान आहे. या मालकाने दलाल माकडाच्या हाती कोलीत दिल्याने तो पाहिजे तेथे फिरवू लागला आहे.
स्वतंत्र आवृत्तीच्या नावाखाली शहरातील बिल्डर आणि राजकीय क्षेत्रातील सर्वांना धमकावून जाहिराती मिळविणाऱा हा पत्रकार आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे (जीएम), दिलीप वळसे पाटील यांच्यासह मंत्रालयातील सर्व खात्याच्या सचिवांशी वैयक्तिक ''चेंबरमधील संबंध'' असल्याचे सर्वांना सांगत असतो. परंतु, अजित दादाबरोबर आपले चांगले संबंध असल्याचे हा पत्रकार सांगत असला तरी दादा या पत्रकारावर चांगलेच खार खाऊन आहेत. त्यामुळे इतर सर्व नेत्यांच्या फोनवरून बातम्या देणारा हा पत्रकार अजित दादांना मात्र कधीच फोन करून बातम्या घेत नाही. याची बातमीदारी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रकाश आंबेडकर, आघाडीत बिघाडी, प्रचंड खळबळ, मवाळ पुतण्या, प्रबळ पुतण्या याच्या पलीकडे जात नाही. याची बातमी दिसली की पत्रकारही वाचत नाहीत आणि आता वाचकही वाचत नाहीत. छापून आल्यानंतर दुस-यांना फोन करून हाच विचारतो वाचली की नाही माझी बातमी. पिंपरीत स्वतंत्र आवृत्ती सुरू होणा-या नंबर एकच्या दैनिकातील जाहिरात, वितरण आणि संपादकीय विभागातील सहका-यांच्या बैठकीत या सर्वांची लायकी नसल्याचे तो तोंडावर सांगतो. पण यापूर्वीच्या दैनिकात काम करत असताना रिशेप्शनिस्टबरोबर अश्लील चाळे करताना आपल्या सहका-यांना सापडलेल्या या दलाल पत्रकाराने त्याची स्वतःची काय लायकी आहे, हे इतरांना जणू काही माहितच नसल्याच्या आविर्भावात बोलत असतो. यापूर्वीच्या दैनिकात लाखाची जाहिरात देऊन दुप्पट-तीप्पट वसूलीमुळे त्याची राजकारणी आणि बिल्डरांच्यात ख्याती झाली आहे. गेल्या पंधरा वर्षात त्याने अशा प्रकारे कोट्यावधीची माया कमविली आहे. टेलिफोन पुसणारा हा दलाल पत्रकार एवढी प्रगती करत असल्याने अशा प्रकारच्या इतर पत्रकारांनाही हुरूप आला आहे.
मध्यंतरी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या लायक मुलाला युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी याने पेड न्यूज (सुपारी )छापल्या. त्याचा मोबदला म्हणून या नेत्याने दैनिकाच्या ऑफिसमध्ये पंधरा लाख रुपयांची थैली एकाच्या हातून त्याला पाठविले होते. हा दलाल पत्रकार ती थैली हातात घेऊन संपूर्ण ऑफिसमध्ये मिरवित होती. सर्व सहका-यांना ही थैली दाखवत त्यांची टर उडवित होता. तब्बल ७८ वर्षांची परंपरा असलेल्या आणि ज्यांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून या दैनिकाचे नाव पत्रकारितेच्या इतिहासात कोरले. सर्व तळागाळातील नागरिकांना बातम्यामध्ये स्थान दिले. असे पत्रकारितेतील हे आदराचे स्थान आज अस्तित्वात नाहीत. पण त्यांनीच सुरू केलेल्या या दैनिकात सध्या जो काही ''पिंपरी" पॅटर्न सुरू झाला आहे, तो पाहून नानासाहेब स्वर्गात अक्षरशः ढसाढसा रडत असतील.

Sunday 20 November 2011

राज मास्तरांनी घेतली छडी; परीक्षेशिवाय तिकीट नाही

मुंबई -  महापालिकेच्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या "मनसे'च्या कार्यकर्त्यांना शनिवारी नवा मंत्र मिळाला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी "नवनिर्माणा'ची छडी उगारली, तेव्हा आपल्याला आता पारंपरिक राजकारण सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उमटली असेल. त्यामुळे शाळा-कॉलेजांत दिलेल्या परिक्षेसारखीच परीक्षा घेण्याच्या राज यांच्या निर्णयाला साऱ्यांनीच "मनसे' दाद दिली.

आगामी महापालिका निवडणुकीबाबत राज यांनी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ""महापालिका निवडणुकीसाठी तिकीट "फिक्‍स' असल्याच्या गैरसमजात कोणीही राहू नये. इतरांना "गिमिक' अथवा "स्टंट' वाटू दे; मनसेचे तिकीट मिळविण्यासाठी अगदी राज ठाकरेंनाही लेखी परीक्षा द्यावीच लागेल,'' असा धडा त्यांनी दिला. लिहिता-वाचता न येणाऱ्यांनी घरीच बसावे, असा छडीचा मार द्यायलाही ते विसरले नाहीत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे गणित थोडेसे चुकले; पण मुंबई महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढू, असा इशाराच त्यांनी शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांना दिला. सभागृहात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे निवडणुकीचे तिकीट देण्याची प्रक्रिया राज यांनी स्पष्ट केली. उमेदवारी मिळण्यासाठी सर्व इच्छुकांना लेखी परीक्षा द्यावीच लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठीही अशीच प्रक्रिया होईल, असे ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.

शहरातील इच्छुकांसाठी माटुंगा येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि उपनगरातील इच्छुकांसाठी पार्ले येथील साठे महाविद्यालय ही परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेत कॉपी अथवा इतर गैरप्रकार करणाऱ्यांनी घरी बसण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दमही राज यांनी दिला आहे.

""महापालिकेत प्रवेश करणारा मनसेचा लोकप्रतिनिधी अभ्यासू असला तरच नागरिकांचे प्रश्‍न सुटतील. त्यासाठी तयार केलेली संदर्भ पुस्तिका 1000 रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच पुस्तिकेवर लेखी परीक्षा आधारित असेल; त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम मुलाखत मी स्वत: घेणार आहे'', असे राज यांनी जाहीर केले. त्या वेळी टाळ्यांचा कडकडाटात करून कार्यकर्त्यांनी या घोषणेचे स्वागत केले. एका प्रभागातील इच्छुकांनी एकाच गाडीतून परीक्षेच्या ठिकाणी जावे. ती गाडी त्यांनी लगेच परत पाठवून परीक्षा केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळावी, असा सल्लाही राज यांनी दिला.

अशी आहे आचारसंहिता
1.परीक्षा केंद्रात दोन तास आधी प्रवेश
2.परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाही.
3.कॉपी करणारा तत्काळ बाद.
4.परीक्षा प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नाही.
5.एकाही कार्यकर्त्याला सोबत आणायचे नाही.
6.पेपर फोडण्याचा अजिबात प्रयत्न नको.
7.वशिलेबाजीचा प्रयत्न केल्यास "हद्दपार'.
8."डमी'चा प्रयत्न केल्यास "नापास'.
9.एका उमेदवाराला एकाच प्रभागातून अर्ज.
10.जातपडताळणी दाखला अनिवार्य.
11.परीक्षेच्या दीड तासाच्या काळात वर्गाबाहेर जाण्यास बंदी

Friday 18 November 2011

बारबालांनी घातला नाशिकचे व्यापारी मुंदडा यांना गंडा

मुंबई -  नाशिकच्या एका व्यापार्‍याला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून दोन बारबाला बहिणींनी त्याला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी उमेश मुंदडा (47) यांनी फिर्याद नोंदवल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी निशा ऊर्फ वंदना बाबुलाल राज (29) आणि तिची बहीण वर्षा राज (27) यांना अटक केली आहे.

मुंदडा यांचा नाशिकमध्ये घाऊक धान्य आणि स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईत कामानिमित्ताने त्यांचे नेहमीच येणे-जाणे असते. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित सुर्वे म्हणाले की, नऊ वर्षांपासून ग्रँट रोड येथील मिनर्व्हा जंक्शन येथील जंक्शन्स बारमध्ये ते येत असत. या दोघीही तिथेच काम करतात. 2004 पासून मुंदडा यांची या दोन बहिणींशी ओळख आहे. मैत्रीच्या नावाखाली निशा व वर्षा यांनी त्यांच्याकडून आतापर्यंत 40 लाखांची रोकड उकळली आहे. तसेच नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहण्यासाठी या दोघींनी मुंदडा यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने आणि मीरा रोड येथे फ्लॅट खरेदीसाठी 10 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. या पैशातून वर्षाने मीरा रोड येथील गीता हाइट्स इमारतीत 1015 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला. मे 2011 मध्ये मुंदडा यांनी आपल्या पैशाची मागणी केल्यानंतर पैसे परत करण्याऐवजी आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या धमकावणीला कंटाळलेल्या मुंदडा यांनी धीर एकवटत अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या दोघींविरोधात विश्वासघात, फसवणूक, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्षा आणि निशाला मदत करणारा त्यांचा मेहुणा मनीष सिंग व त्याची बहीण बिंदिया सिंग फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अजित पवारांची 'दादागिरी' युवकाच्या पथ्यावर


मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात पटाईत असले, तरी त्यांचा पहाडी आवाज मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही काहीसा खटकतो. त्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन कैफियत मांडताना प्रत्येकांना त्यांच्याबाबतची आदरयुक्‍त दराऱ्याची भीती अधिक असते; मात्र आज (गुरुवार) त्यांच्या जनता दरबारात शिक्षकाची नोकरी मिळविताना फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकाने दर्दभरी कहाणी ऐकवली. या युवकाची कैफियत ऐकून अजित पवार यांनी थेट संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवाला "दादागिरी'ची प्रचीती दाखविली.

पश्‍चिम महाराष्ट्रातील राजेश नावाचा युवक कोणाच्याही ओळखीशिवाय गुरुवारी राष्ट्रवादी भवनमधील दर गुरुवारी होणाऱ्या अजित पवार यांच्या जनता दरबारात हजर झाला होता. उच्च शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील राजेशला एका खासगी संस्थेत शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवांनी दिले. या बदल्यात राजेशकडून सहा लाख रुपये घेण्यात आले. जमिनीचा तुकडा विकून आणि काही कर्ज घेऊन राजेशने सहा लाख रुपयांची व्यवस्था केली. शिक्षकाची नोकरी मिळणार, या आशेने त्याचे लग्नही जमविण्यात आले; पण वर्ष लोटले तरीही संस्थाचालकाने नोकरी दिली नाही. अखेर नोकरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजेशने सचिवाकडून सहा लाख रुपये परत मागितले; मात्र एकदा दिलेले पैसे परत करणार नाही. तुला नोकरी कधीतरी देऊ, असे सांगत संस्थाचालकाने राजेशला रेंगाळत ठेवले.

ही सर्व कहाणी राजेशने अजित पवार यांच्या कानावर घातली. त्याच्याकडे पैसे घेतलेल्या संस्थेच्या सचिवांचा दूरध्वनी क्रमांक होता. अजित पवार यांनी लगेचच संबंधित सचिवाशी दूरध्वनीवर संपर्क साधला. "मी अजित पवार बोलतोय. तुम्ही राजेश नावाच्या युवकाकडून नोकरी देण्यासाठी सहा लाख रुपये घेतलेत का, असा करड्या आवाजात त्यांनी सवाल केला'. त्यामुळे पलीकडून पाचावर धारण बसलेल्या संस्थेच्या सचिवाने तत..पप.. करत उत्तरे दिली. पैसे घेतल्याची खात्री पटल्यावर, आज मी राजेशला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याला त्याचे पैसे परत करा नाही तर तुमच्या मागे उद्यापासून पोलिसांना लावेल, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला.

संस्थेच्या सचिवाला सुनावल्यानंतर अजित पवार यांनी राजेशला जाण्यास सांगितले; शिवाय त्या सचिवाने पैसे परत दिले नाहीत, तर परत मला सांग. मी बघतो काय करायचे ते, असेही सांगितले. त्यानंतर राजेश समाधानाने घरी गेला.

Thursday 17 November 2011

सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची - भि.म.कौसल

भंडारा,- प्रसार माध्यमांची कामगिरी ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत चोखपणे सुरु आहे. पूर्वीच्या काळी व स्वातंत्र्यानंतर राजकीय जागृतीकरीता प्रसार माध्यम महत्वाची भूमिका सांभाळत होते. आज सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक भि.म.कौसल यांनी व्यक्त केले.
आज (ता.16) पत्रकार भवन येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्तवतीने राष्ट्रीय पत्रकार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.कौसल बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यकांत जाधव होते. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम व माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारिता सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरुन जाधव म्हणाले, पत्रकारिता हे सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे ठरेल यादृष्टीने पत्रकारांनी विचारमंथन केले पाहिजे. समाजाला प्रबोधन करणारे लेखन पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले. 
डॉ.बोरकर म्हणाले, पत्रकारांनी सांस्कृतिक घडामोडीचे प्रतिबिंब वृत्तपत्रामधून उमटवावे. लुप्त होत असलेल्या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. संस्कृतिचे जतन कसे करता येईल याकडेही प्रसार माध्यमानी लक्ष द्यावे. 
प्राचार्य डॉ.ढोमणे म्हणाले, आधुनिक काळातील पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील पत्रकारिता ही सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे करता येईल याची अनेक उदाहरणे देवून पत्रकारितेची उपयोगीता उपस्थितांना पटवून दिली.
डॉ.माले म्हणाले, पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन अधिक ठेवून नकारात्मक बाजू तपासावी, जेणे करुन पत्रकारांची भूमिका ही पारदर्शक बनेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार सार्वजनिक जबाबदारी स्विकारत असतांना स्वत:च्या आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 
पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी पत्रकार दिवसाचे महत्व सांगून वाढत्या महागाईमुळे वृत्तपत्र काढतांना संपादक व मालकांना कठीण ठरत असले तरी एक सार्वजनिक जबाबदारी म्हणून वृत्तपत्रे कार्य करीत असल्याचे सांगीतले. 
यावेळी जेष्ठ पत्रकार वामनराव तुरीले, गोपू पिंपळापूरे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत पत्रकार रमेश चेटूले व कांचन देशपांडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 
पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचे फित कापून उद्घाटन संचालक भि.म.कौसल यांनी केले. यावेळी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. नेत्र चिकित्सक शेंडे व ईसीजी तंत्रज्ञ संदिप अवसर यांनी सहकार्य केले. 
कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार नंदकुमार राही, अशोक चचडा, हिवराज उके, ललितसिंह बाच्छिल, काशिनाथ ढोमणे, मिलींद हळवे, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, प्रमोद नागदेवे, प्रा.नरेश आंबिलकर, चंद्रकांत श्रीकोंडवार, संजिव जयस्वाल, तथागत मेश्राम, सुरेश शेन्डे, प्रफुल्ल घरडे,राजेश उरकुडे, रवि भोंगाने, सुनिल चौरसिया, सुरेश कोटगले, परमेश्वर शेन्डे, राजु आगलावे, नरेंद्र बोंद्रे, विलास केजरकर, देवाजी गजभिये, यशवंत थोटे, दिपक रोहणकर, विरेंद्र गजभिये, पृथ्वीराज बन्सोड, श्री.चव्हाण, छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे मानीक कन्हाके, बसंत मडामे, घनशाम खडसे, गणेशदास तलमले, शंकर शेन्डे, घनशाम सपाटे, रेखा निनावे, प्रशांत केवट यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार डि.एफ.कोचे यांनी मानले

Sunday 13 November 2011

लग्नबाह्य संबंधांसाठी "सोशल नेटवर्किंग'

पॅरिस - पॅरिसच्या रस्त्यांवर सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या "सोशल नेटवर्किंग'चा प्रकार पाहायला मिळतो आहे. लग्न होऊनही बाहेरख्यालीपणा करण्यास इच्छुक व्यक्तींना सदस्य करून घेणाऱ्या एका "सोशल नेटवर्किंग' ुसंकेतस्थळाची जाहिरात करणारे फलक सध्या येथील मेट्रो रेल्वे स्थानकांवर दिसत आहेत. आतापर्यंत पाच लाख फ्रेंच नागरिकांनी या संकेतस्थळाचे सदस्यत्व पत्करले आहे. शिवाय स्पेन व इटली या अन्य युरोपीय देशांनीही या संकेतस्थळाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत.

जे लोक विवाहबाह्य संबंध ठेवण्यास इच्छुक आहेत त्या व्यक्ती आपली इच्छा या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात, असे या संकेतस्थळाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. हे संकेतस्थळ चालवितात अमेरिकेत राहणारे दोन भाऊ आणि त्यांच्या कार्यालयीन साहाय्यक असणाऱ्या वीस महिला! फ्रान्स, इटली, स्पेन अशा दक्षिण युरोपातील जीवनशैली वेगळी असल्याने अशा ठिकाणी हे संकेतस्थळ यशस्वी होईल, असे या निर्मात्या बंधूंचे म्हणणे आहे आणि संकेतस्थळाची वाढती सदस्यसंख्या लक्षात घेता त्यांचा अंदाज खराच ठरल्याचे चित्र स्पष्ट होते आहे.

मदेरणा समर्थकांचा माध्यमांवर हल्ला

जोधपूर - भंवरीदेवीप्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेले राजस्थानचे मंत्री महिपाल मदेरणा यांच्या समर्थकांनी आज (रविवार) सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला. मदेरणा यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील एमडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाची माध्यमांवर हल्ला करण्यात आला आहे.

या प्रकरणात मदेरणा यांना सीबीआयकडून अटक करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने माध्यमांचे प्रतिनिधी त्याठिकाणी पोहचले होते. मात्र, गेटवरच त्यांच्या समर्थकांनी माध्यमांवर हल्ला केला. यामध्ये दोन वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनचे नुकसान झाले आहे, तर एक पत्रकार गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान या प्रकरणावरून मदेरणा यांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे; तर दुसऱ्या एका घडामोडीत पारसदेवीनामक महिलेच्या हत्येप्रकरणी वन आणि खाण मंत्री रामलाल जाट यांनीही राजीनामा दिला आहे.

दीड महिन्यांपूर्वी 34 वर्षीय पारसदेवी या महिलेचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी गेहलोत मंत्रिमंडळातील वन आणि खाणमंत्री रामलाल जाट यांचे नाव चर्चेत आले होते. जाट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, मदेरणा यांची पत्नी लीला यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली.

फेसबुकवर समस्यांचं समाधान

बीड : सोशल नेटवर्किंग साईटचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. मात्र याचा वापर केवळ टाईमपाससाठी न करता विकास कामांवर चर्चा करण्यासाठी केली जातोय. फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात हे शक्य झालंय. अंबाजोगाईच्या तरूणांनी फेसबुकच्या माध्यमातून शहरातील समस्या मांडायला सुरुवात केली आहे आणि समस्या सोडवूनही घेतल्या आहेत.

तिकडे लंडन मध्ये फेसबुकच्या आती वापरामुळे शाळकरी मुलांमध्ये आळस वाढत चाललाय असा निष्कर्ष काढण्यात आलाय. तर भारतात ही फेसबुकचा वापर अगदी गावागावात पोहचलाय. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत तरूणामध्येही ही क्रेझ आलीय. पण या तरुणांनी या फेसबुकचा वापर विधायक कामांसाठी करयाला सुरुवात केली आहे. न

नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतांना या तरुणांनी अंबाजोगाई नगरपालिका निवडणूक २०११ हा ग्रुप सुरु केलाय. अवघ्या एका महिन्यात या ग्रुपसोबत तेराशे मेंबर जोडले गेलेत. यात शहरातील सगळ्या नगरसेवकांपासून डॉक्टर, वकील आणि महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे हे सगळे लोक मोबाईल वरतीच नेट वापरतात. अंबाजोगाईतील अभिजित जगताप या तरुणाने हा ग्रुप सुरु केलांय, आता मात्र ही चळवळ बनलीय.

नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा हा ग्रुप तयार करण्यात आल्याने शहरातील सगळ्या नगरसेवकांना आप आपली विकासकामे यात मांडण्यासबंधी आव्हान करण्यात आले. सुरुवातीला याला फारसा रीस्पोंस मिळला नाहीं मात्र. शहरातील समस्या मांडून त्यावर चर्चा व्होऊ लागल्याने या वर माहिती टाकण्यासाठी लोक प्रतिनिधी पुढे सरसावले. आता तर लोकात जावून निवडणुका लढवायच्या असल्याने सकाळी हातात पेपर येण्याअगोदर आता राजकारणी फेसबुक चेक करतात.

शहरातील रस्त्यांची दुर्दशा फेसबुकवर आल्यानंतर लगेच नगरसेवक जागे झाले आणि शहरातील विश्रामगृहासमोरील रस्ता दुरुस्त झाला. रस्ता असो की पिण्याचे पाणी स्वच्छता असो की अतिक्रमण, ही सगळी प्रश्न असोत नागरिक यावर फेसबुकच्या माध्यमातून बिनधास्त बोलू लागलेत. म्हणूनच फेसबुकमुळे लोक प्रतिनिधीची जवाबदारी ही तितकीच वाढलीय.

उच्चशिक्षित माणसाच्या शहरात मतदानविषयीची अनास्था असलेली पहायला मिळते. नुकत्याच झालेल्या पुण्यातील खडकवासला मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीवरून हे पुन्हा एकदा समोर आलेय. म्हणूनच फेसबुकवरचा हा ग्रुप जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, यासाठी प्रबोधन करण्याच्या तयारीत आहेत.

एरव्ही आपल्या गावात काय चाललेय हे वृत्तपत्रातून समजते, मात्र आपल्या गल्लीत काय चाललेय, हे फेसबुकमुळे कळायला लागल्याने अंबाजोगाई बाहेर राहणाऱ्या तरुणांना ही फेसबुकचा हा कट्टा म्हणजे हक्काचे व्यासपीठ मिळालेय. सुरुवातीला या ग्रुपला एवढा प्रतिसाद मिळेल असे या तरुणांना वाटले नव्हते, आता मात्र फेसबुकशिवाय हे तरुण राहूच शकत नाहीत.

जे नवं ते आम्हाला हवं या ओढीने सध्याची तरुणाई झपाटलीय. मात्र नवीन नवीन केवळ अप्रुप म्हणून हे न वापरता फेसबुकचा वापर जर विधायक गोष्टींसाठी झाला तर विकास कामांवर चर्चा करण्यासाठी हे मोठे व्यासपीठ बनू शकतं.


Wednesday 9 November 2011

इंटरनेटचं व्यसन सोडवण्यासाठी मुक्तांगण

पुणे : जेव्हा कोणत्याही गोष्टीला भुलून त्याचा अतिरेक वापर केला जातो, तेव्हा खरी त्या गोष्टीच्या व्यसनाची सुरवात होते. पण आजच्या जगात दारू, तंबाखू, चरस, गांजा हेच फक्त व्यसन  राहील नाहीये. तर इंटरनेट ही व्यसनासारख वापरलं जावू लागलंय. अशाच इंटरनेट व्यसनी विद्यार्थी, आणि मोठ्या व्यक्तींसाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात इंटरनेट एडिक्शन सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.

आजच प्रगत तंत्रज्ञान ज्या प्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे.तस्च ते त्यांच्यासाठी मारक बनत चालंल आहे. आजकाल टीव्ही, कम्प्युटर यांचा वाढता वापर. त्यात तासंन तास इंटरनेट, सोशल नेट वर्किंग साईट्स, गेम्स, पोर्न मुव्हीज, चॅटीगमुळे ते सतत त्यातच गढून राहातायेत..त्यांच्या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.

दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते या गोष्टींसाठी घालवतात आणि दारू, तंबाखू, चरस गांजा यांसारख या इंटरनेटचं व्यसन जडवून घेतायेत. सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्हणजेच या महाजालात ते स्वत:ला अडकून घेतायेत. आजच्या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्यक्तींना व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.

पुण्याच्या मुक्तंगण व्यसनमुक्ती केद्रात ही या वर्षभरात इंटरनेट एडीक्शनच्या ब-याच केसेस दाखल झाल्यात. यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं- मुलींच प्रमाण जास्त आहे.याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडील. ते घरात नसल्याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाही, आणि मग परिणामी ते या व्यसनाच्या आहारी जातात, अशा विद्यार्थ्यांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे मुक्तांगण मध्ये आता या व्यसनावरही उपचार आता देण्यात येत आहेत.

त्यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे की, आपल्या मुलाला. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्याला याच सगळ्याचं व्यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभ करायचं.

‘ घेंगा’ रोगग्रस्त संपादक -वार्ताहराचं आर्थिक कुंपण वृत्तपत्राचे सामाजिक शेत गिळणार ! वरिष्ठांना योग्य ‘शाळा’ घेण्याची नितांत गरज

आजच्या पत्राचा मजकुर वृत्तपत्रात असणा-या संपादक-उपसंपादक-वार्ताहर यांच्या संबंधीतआहे. लोकशाही सामाजिक व्यवस्थेत चौथ्या खांबाची उपमा वृत्तपत्र व प्रसार माध्यमांना दिली गेली.
मात्र या चौथ्या खांबाला आता लाचलुचपत (घेंगा) प्रवृत्तीचं जंग चढायला सुरुवात झालीय असं वाटू
लागतंय. कदाचित जंग चढून चढून येणा-या काळात हे खांबच कोसळण्याची वेळ येणार आहे. लोकशाही
प्रणाली न्याय व्यवस्थेत यास ४ थ्या खांबाचीच उपमा का दिली गेली, प्रथम खांबाची का नाही? हा
सर्वस्वी चिंतनाचा विषय आहे. मात्र यास मालक-चालक हेच सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांचे नियोजन
शुन्य व्यवस्था व कमावुबुध्दीमुळे १०० टक्के समाजसेवा होत नसल्याने व गुन्हेगारी मुक्त ऐवजी गुन्हेगारी
युक्त प्रवृत्तीलाच प्राधान्य दिल्याने लोकशाही व्यवस्थेत यांस ४थ्या क्रमाकावर ढकलले असतील असा
कयास मनाला बोचत आहे. आपण म्हणाल की वृत्तपत्र व मालकशाही विरुध्द आमच्या मनात इतका उद्रेक का? पण यास कारणचं तितकेच सशक्त आहे. मात्र माझी रोजी रोटी वृत्तपत्राच्या माध्यमातून चालत असल्यामुळे त्या विषयी थोडीफार सहानुभुती मनात ठेवायलाच हवी.

नुकतेच दैनिक भास्कर चमुच्या दिव्य मराठी वृत्तपत्राने पदार्पण केले. वृत्तपत्रात अति महत्वाचे
व रिझल्ट देणारे कनिष्ठ पदावर काम करणा-यांसाठी दिव्य मराठी हे वृत्तपत्र मोठा आधारच ठरणार आहे.
वृत्तपत्र चळवळ व व्यवस्थापनास चांगले वळण या दिव्य मराठीने लागणार आहे. जास्त खपाचे व
सर्ककुलेशनचे सर्टफिकेट घेणारे प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनातील मनुष्यबळ कमी होत असल्याने
त्यांच्यात भीतीची हुरहुरीच डिवचल्यासारखी दिसून येत आहे. भल्लेमोठे पगाराचे पॅकेज देवून कर्मचा-यांना
व संपादकांना मोहीनी घालणारे हे दिव्य मराठी वृत्तपत्र सुध्दा समाजाला न्याय देवू शकणार नाही असे
मला वाटते. कारण त्यांच्या व्यवस्थापनात त्याच गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे जे आधीच्या
वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनात समाविष्ट आहेत. वृत्तपत्राच्या जास्तीत जास्त खपासाठी संपादक- वार्ताहराच्या
तोंडाचा ‘आ’  होईल एवढे मानधन व पॅकेज ! मला सुचवावयचे वाटते की, संपादक -वार्ताहरांना
पगारवाढ का दिली जाते? त्यांची आर्थिक पत उंचावण्याकरिता की त्यांच्यात व्यसनाची व गर्विष्टपणाची
बुध्दी मिरवायला काही समजत नाही.
वृत्तपत्र मालक-चालक ,व्यवस्थापक, कार्यकारी संचालक व आवृत्ती प्रमुख यांच्या बुध्दीचे जितके
जोगवे गावे तितके कमी. वृत्तपत्र संपादकांना व सहसंपादकांना पगारवाढ देण्याचा मुर्खपणा हेच करत
असतात. आमच्याकडे तर काही उपसंपादकांना पगार नाही दिला तरी ते फुकटचं काम करण्यास तयार
होतील कारण अक्कलशुन्य बुध्दी त्यांत त्यांच्या बॅकींगला वृत्तपत्राचे कार्ड आणि त्यावर संपादकाचा शेरा
आणि दररोज फक्त २-३ तासाची मेहनत पगार मात्र इतर कर्मचा-यांपेक्षा जास्तच आहे. त्यात खर्च
कवडीचा नाही. केव्हा केव्हा रेशनवाला तावडीत सापडला तर रेशन फुकट, पाहिजे तेव्हा गॅस सिलेंडर,
संधी मिळाल्यास दुपार आणि सायंकाळचे जेवण, कपडे लत्ते सर्वामध्ये डिस्काऊंट त्यात मोठ मोठे
पुढा-यांचे वाढदिवस, कार्यक्रम , निवडणुक, दिवाळी आहेच, अहो विचारुच नका. त्यातच कार्यालयाचा
टेलिफोनवर चालणारे फोनोफ्रेंड , जीवनात बचतच बचत आहे. दोन कॉलम निवेदन, मागणीची वार्ता व
३ कॉलमचा फोटो या पंचसुत्री कार्यक्रमाने नेहमी पाचही बोट तुपात असतात. आज किती पैसे हाताला
लागतील याचे गणीतच ते कार्यालयात आल्यानंतर करत असतात नंतर मात्र कार्यालयात त्यांची
पृष्ठभूमीच टिकत नाही. पुर्ण दिवसभर गाव डवरुन आल्यानंतर मग सायंकाळी पेजवर आपले आर्थिक
भांडवलदारांना प्रसिध्दी देण्याकरिता बातम्या दुस-या वृत्तपत्रांतून आयात केल्या जातात. हा सर्व
प्रकार आवृत्ती प्रमुखांना चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. मात्र ते संपादक महोद्यांच्या सर्व चुका आपल्या
पदरात लपवून घेतात कारण ते त्यांचे ‘ पिट्टु ’  आहे असं म्हणतात. त्यामुळे इतरांचे सत्तेपुढे शहाणपण
नाही.
वृत्तपत्र कार्यालयात येणा-या बातम्या ,पत्रकांपैकी ज्या पत्रकधारकाने प्रसिध्दीबद्दल संपादकांना
छुप्या पध्दतीने १००/-, २००/- ५००/-रुपये मोजले असतात त्याच बातम्या आधी लागतात.
किंवा कार्यालयाबाहेर ज्यांच्याकडून गणित जुडलेले आहेत त्यांच्याच बातम्या लागतात. यात फक्त
निधन वार्ताचा अपवाद आहे. अशी आमची वृत्तपत्राची चौकटच होवून बसलीय. आवृत्ती प्रमुखांना
पाहिजे फक्त ‘पेज’  ते मिळालं तर त्यांचे समाधान ! असो त्यांच्या समाधानाला आमचा मानाचा मुजरा
! अहो वर्षभर जे संपादक बातम्या लावून लावून पैसे कमावतात त्यांना कसली करता पगारवाढ.
ऑपरेटर, शिपाई, वितरण प्रमुख, छायाचित्रकार यांना तर पिवळे कार्डच मिळायला हवे . अशी
परिस्थिती आहे. अक्कलशुन्य वरिष्ठांना का कळत नाही काय माहीत? कदाचित त्यांना ‘ घेंगा’  रोगानेच
पछाडले असणार असे वाटत आहे. कारण आमच्या कडे वृत्तपत्र म्हटले की ,चहा पाणी असो की
जेवण, की गिफ्ट पॅकेट, किंवा रोखीने असो फक्त संपादकच पुढे असतो बाकीचा स्टॉफ शून्यच ! अहो
तर माझे आव्हानच आहे वरिष्ठांना फक्त संपादकांच घेवून तुमचा पेज येवू द्या की प्रसिध्दीला बघु किती
दम आहे. आणि किती दिवस तुमची कुवत टिकून राहील हे शक्यच नाही. मुर्खासारख्या गोष्टी आहे
हे मात्र आम्हाला सुचवायचे वाटले म्हणून सुचवले. वृत्तपत्र छापून आले की फक्त संपादकांचीच लाल
होते बाकीच्यांनी काय गोटया खेळलाय. काही समजत नाही. मेहनत सर्वांची आहे. हे लक्षात घ्यायला
हवे. अशा वेळी एका संताचे दोहे लक्षात येत असतात.
शहरात हंगामी लागणारे कपड्याचं सेल असो की एखाद्या अधिकारी व पुढा-याची प्रेस
कॉन्फरन्स. संपादक- वार्ताहरांना तर आर्थिक हित साधण्याची संधीच मिळून जाते. चहा, पाणी,
अल्पोपहार व वेळ पडल्यास ओली जेवणाची चमचमीत पार्टी वरुन मिळणारे निरनिराळे गिफ्ट सर्वांचे
लाभार्थी फक्त संपादकच असतात. बातमी सकट फोटो छापून आणायला त्यांचीच पुष्कळ मेहनत
असते. इतर कर्मचारी काय अक्कलशुन्य त्यांना तलब लागली तर स्वतःच्या पैशानेच चहा गिळावा
लागतो. कारण ‘ प्रेस’  व वृत्तपत्र या शब्दावलीत त्यांचा हक्कच नसतो. मला काय म्हणावेचे आहे ते
आपणास समजत नसेल तर त्यास साधं उदाहरण देवून समजता येईल.
शहरात लागणारे हॅण्डलुम, सर्कस यांच्या मालकांकडून संपादक-रिपोर्टरांना काही ना काही
गिफ्ट मिळतात मात्र ते परस्पर घरी पोहोचल्याशिवाय हे महाभाग कार्यालयात येत नाही. बाकीच्या
महत्वाच्या व सामाजिक क्रांती घडविणा-या बातम्यांना तिलाजंली देत पहिले कॉटन सेलची बातमी
लावा. जोपर्यत पेजवर सेट होत नाही तोपर्यत ऑपरेटर्सची मानगुंट हे सोडत नाही वरुन सांगतात ही
बातमी , फोटो उद्या सर्वच वृत्तपत्रांत येईल त्यामुळे सुटता कामा नाही. कशी काय सुटणार?त्यामागे
एक गणित होतं ‘ कॉटन सेलच्या मालकांनी ते सोडवलं आहे. गिफ्ट घेवून बातमी जर लिहिता नाही
आली तर कोठून तरी दुस-या वार्ताहराकडून चोरून आणून लागलीच पाहिजे. आवृत्ती प्रमुखांना
वाटायला पाहिजे आपला संपादक किती हुशाऽऽर आहे. बरं असो त्यांच्या समाधानाला आमचा
मानाचा मुजरा. आमच्या पेजवर तर फुकटात मच्छर सुध्दा त्याची विष्ठा सोडू शकत नाही. असे
एक नाही अनेको उदाहरणं आपणांस देवू शकतो. मात्र लेखणीत स्याही कमी असल्यामुळे
महत्वाचं मजकुर लिहीत आहे. शितावरुन भात ओळखण्याची बुध्दी आपणास आहे.

आयकर खात्यामार्फत व्यवसायिकांना एफबीटी म्हणजेच फ्रिंज फेनीफिट टॅक्स लावला
जातो. कारण कार्यालयाच्या एकुण होणा-या खर्चांमध्ये व्यक्तीगत व कार्यालयीन हित किती साधले
गेले याचे आकलन करता येत नसल्याने सरसकट एफबीटी कर लावला जातो त्यामुळे खर्चावर
आळा बसतो. मात्र आमच्या वृत्तपत्रात संपादक-वार्ताहरांच्या कामकाजावर एफबीटी बसविले
पाहिजे कारण त्यांनी बजावलेली सेवामध्ये व्यक्तीगत व कार्यालयीन आर्थिक हित किती साधले
जाते याचे आकलन सुध्दा करता येत नाही किमान त्यांच्या खावरट व ’ मीच सर्वस्वी वृत्तपत्र’
या मी पणाला आळा तरी बसवता येईल. असे सुचवावयासे वाटते.
इतर वृत्तपत्राच्या तुलनेत दिव्य मराठी वृत्तपत्र सर्वानाच चांगले मानधन देत आहे. पण
घाम पण तेवढेच काढून घेत आहे. तरी ते चालेल , कारण वृत्तपत्रात जे तुटपुंज्या पगारांमध्ये ८-
१० तास खुर्चीवर बसून बसून आपली पिछाडी घासून घासून काम करीत होते त्यांना तर कामाची
सवयच आहे. त्यांचा काय घाम निघणार. मात्र फक्त प्रेस, संपादक, रिपोर्टर असा बिल्ला घेवून
बाहेर मिरवणा-यांना आता ही मेहनत जुलाब आणल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्की. म्हणूनच
दिव्य मराठी या वृत्तपत्राने त्यांच्या चमुतील सर्व पदांवर काम करणारे वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ
सर्वाना समाधानकारक पगाराची हमी दिली आहे. त्यामागील कारण एकच, कोणाच्या चहाचा
देखील आपला वार्ताहर-संपादक भुखेला राहू नये. त्याने समाज व न्याय व्यवस्थेस १०० टक्के
न्याय द्यायला पाहिजे. अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे दिव्य मराठी या वृत्तपत्राने आपल्या
सर्वच संपादक , रिपोर्टरांना या ‘ घेंगा’  रोगाने ग्रस्त होणार नाही याची दक्षता घेतली तर त्यांच्या
हातून १००% समाजसेवा घडून येईल आणि कोणाचा चहा देखील नरड्यात न रिचवता बातम्या
व घटनांना योग्य तो न्याय देता येईल. असे माझे व्यक्तीगत मत मी व्यक्त करीत आहे.
बाकी काही वृत्तपत्रांचे संपादक- रिपोर्टरांना तर या ‘ घेंगा’  रोगाने १००% टक्के रोगग्रस्त
केले आहेच. त्यांना यातून सुटका मिळावी किंवा वरिष्ठांना याबद्दल शहाणपण येवून त्यांनी त्यांची
‘ शाळा’  करावी अन्यथा समाजात ज्या पोलीसांना हफ्ते व फुकटे रुपी दाग लागलेला आहे. त्यात
वृत्तपत्रांच्या संपादक व मालकांनाही आघाडी प्राप्त होईल अशी भितीच आम्हाला वाटत आहे.
आणि एक काळ येईल त्या दिवशी समाज म्हणेल जर आम्हाला पुर्ण गुन्हेगारी व भ्रष्टाचार मुक्त
भारत घडवायचा असेल तर अशा वृत्तपत्रांवर पहिले बंदी आणा. त्यामुळे कशाला ज्याची खाता
त्याची पुंगी वाजवता हा ठपका पण आमच्यावर ठेवण्याची पाळी आणता. ४-५ वृत्तपत्रांमुळे सर्वाना
ही शिक्षा का ? पाहा, समजा आणि योग्य तो सुधार सुचवा नाही तर, अक्कल शुन्य कार्यालयातील
‘ घेंगा ’  रोगाने ग्रस्त संपादक-वार्ताहर पेज लेआऊट चे कुंपण लावून बातम्या आयात करुन
करुन तुमच्या सामाजिक बांधिलकीचं शेत खाऊन टाकतील या कडे जरा लक्ष द्या. भिका-यांच्या
रोजंदारीपेक्षा कमी वेतनात काम करणा-या कनिष्ठ कर्मचा-यांना सुध्दा जगण्याचा व मान-सन्मान
मिळवण्याचा हक्क बहाल करा.
आपला विश्वासू
‘अ’  ला ‘आ’  आणि
‘ग’  ला ‘गा’  जोडणारा कनिष्ठ कर्मचारी

Friday 4 November 2011

तरूणीकडून इंटरनेट चॅटिंगने लाखोंचा गंडा

नाशिक : इंटरनेट चॅटींगच्या माध्यमातून बंगळूरच्या तरूणीशी झालेली ओळख, नाशिकच्या मनिष अग्रवालला चांगलीच महागात पडलीय.. प्रियंका अवस्थी नावाच्या मुलीनं त्याला लाखो रुपयांना गंडा घातलाय..परंतू धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी प्रियंकावर गुन्हा दाखल होण्या ऐवजी उलट नाशिक पोलीसांच्या मदतीने बंगळूर पोलीसांनीच मनिषचं अपहरण करुन त्यांला बेकायदेशीररित्या  कोठडीत डांबून लुटल्याचं उघड झालंय. या गुन्ह्यामुळे नाशिक पोलिसांच्या गुन्हेगारीच्या इतिहासात आणखी एक काळं पान लिहलं गेलंय.

लाखो रूपये तर गेले पण बेदम मारही

जनरल स्टोअर्सचा मालक असलेला मनिष इंटरनेटमुळे लाखो रुपयांना गंडवला तर गेलाच शिवाय त्याला बंगळूरच्या जेलची हवा आणि बेदम मारही खावा लागलाय.. प्रियंका अवस्थी नावाच्या बँगलोरमधल्या मुलीशी अग्रवाल कुटूंबियांची ३ वर्षापुर्वी इंटरनेट चॅटींगच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर अवस्थी आणि अग्रवाल कुटुंबिय एकमेकांचे घरोब्याचे संबंध झाले. एकमेकांच्या घरीही त्यांचं येणं-जाणं झालं.आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने एमबीए शिक्षण घ्यायला मदत करावी या प्रियंकाच्या याचनेला भुलुन अग्रवाल कुटूंबियांनी तिला पावणे तीन लाख दिले. मात्र प्रियंकाचे चारित्र्य शुध्द नाही. इंटरनेट, प्रेमप्रकऱणांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुक करणं आणि नंतर खोट्या पोलीस तक्रारी करुन लुटणं प्रियंका आणि तिचा बंगळूरला पोलीसांत असलेल्या भावाचा उद्योग असल्याची आपबिती प्रियंकाच्या एका मित्राने मनिषला सांगितली.आणि थोड्याच दिवसांत मनिषला याची प्रचितीही आली.

फुकटात जेलची हवा
प्रियंकाकडून झालेल्या फसवणुकीची तक्रार मनिषने नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे ६ महिन्यांपूर्वीच केली होती. त्यानंतर प्रियंकाच्या स्टेट बँकेच्या अकाऊंटवर असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची माहितीही सायबर क्राईम विभागाने मिळवली. मात्र पोलिसांकडून तपासाऐवजी अर्थकारण झालं आणि सगळी चक्रं उलटी फिरली. प्रियंकावर कारवाई होण्याच्या ऐवजी बंगळूर पोलीसांनी थेट नाशिकमध्ये येऊन पंचवटी पोलीस ठाण्यातच मनिषला मारहाण केली. कुठलंही वॉरंट नसताना मनिषला बंगळूरला नेलं.. विशेष म्हणजे यावेळी आरोपी आशुतोष हा तिथल्या पोलिसांच्या सोबत होता.अदखलपात्र गुन्हा असतानाही मनिषला पोलीसांनी दोन दिवस जेलमध्ये डांबलं. त्याचे ५० हजार आणि लॅपटॉपही घेतला.शब्दश: मनिषचं अपहरणच केलं.

सहा महिन्यानंतर नोंदवली तक्रार
कागदपत्रांचा विचार करता मनिषविरुध्द गुन्हे दाखल झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी मनिषला नाशिकमधून उचलून नेलं. अदखलपात्र गुन्ह्याबद्दल त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना माहिती न देताच पंचवटी पोलिसांना हाताशी धरुन मनिषला लुटणं हा मोठ्या कटाचाच भाग असल्याचं स्पष्ट आहे. पोलिसांचा धाक मनात असतानाही ६ महिने सातत्याने लढा देत सीसीटीव्ही फुटेज, माहितीच्या अधिकाराचा वापर करुन यासंबंधीचे पुरावे मनिषने गोळा केले. त्यामुळे नाईलाजाने का होईना ६ महिन्यांनंतर नाशिक पोलीसांनी मनिषची तक्रार नोंदवून घेतलीय.. मात्र बंगळूरचा सबइन्स्पेक्टर मोनेश्वरकडून मनिषला आजही जीवे मारण्याच्या धमक्या येतायेत.. या सगळ्यानंतर आता मनिषला आपल्या सुरक्षिततेची चिंता लागलीय.. त्यामुळे निदान इतर तरूणांनी इंटरनेवरून तरूणींशी चॅटींग करणाऱ्या तरूणांनी धडा घेणं गरजेचं आहे.

Thursday 3 November 2011

केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पाठवला चेक

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आयआरएस सेवेचा राजीनामा दिल्याप्रकरणी भरपाई म्हणून त्यांनी आज सरकारला सव्वा नऊ लाख रूपये परत केले आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंह यांना पत्र लिहून चेकच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी ही रक्कम परत केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोणतीही सेव्हिंग सध्या नाहीय. त्यांना या रकमेवरून अनेकदा कोंडीत पकडण्याचे प्रयत्नही झाले आहेत. केजरीवाल यांच्या मदतीला त्यांचे आयआयटीचे मित्र धावून आले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आपल्या सहा मित्रांकडून कर्ज घेऊन आपण ही रक्कम परत केली आहे. केजरीवाल यांचे आयआयटीचे वर्गमित्र राजीव सराफ यांच्याकडून १ लाख १५ हजार, सुब्रतो सहाय यांच्याकडून ३ लाख ५० हजार, हरिष हांडे यांच्याकडून ३ लाख रूपये, अतुल बल यांच्याकडून ६२ हजार रूपये, विकास गंगल यांच्याकडून ५० हजार रूपये आणि टाटा स्टीलमध्ये काम करणारे त्यांचे मित्र पी.श्रीनिवास यांच्याकडून केजरीवाल यांनी ५० हजारांचं कर्ज घेतलंय.

पंतप्रधानांना पाठवला चेक
अरविंद केजरीवाल यांनी ९ लाख २७ हजार ७८७ रूपयांचा चेक आणि त्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पत्र लिहलंय, त्यात आपल्याला कर्ज म्हणून पैसे देणारे मॅगसेस पुरस्कार विजेते हरिष हांडे यांच्यासह आपल्या सहा मित्रांना त्रास देऊ नये अशी विनंती केजरीवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे.

आपण विरोध म्हणून हे करित आहोत, याचा अर्थ असा नाही की मी माझी चूक मान्य केलीय, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

केजरीवाल यांनी आयआरएस तीन वर्ष पूर्ण केलं नाही, त्यांनी संपूर्ण पगार घेऊन अभ्यासासाठी सुट्टी घेऊन बॉन्डच्या नियमांचं उल्लंघन केलं, असा आरोप केजरीवाल यांच्यावर करण्यात येत होता. पण केजरीवाल यांच्या मते, त्यांनी बिनपगारी सुट्टी घेतलीय आणि नियमानुसार सेवा केली आहे.

पंतप्रधानांना केजरीवाल यांचं पत्र
केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, मी पत्रासह नऊ लाख २७ हजार ७८७ रूपयांचा चेक पाठवतोय, पण याचा अर्थ हा नाही की मी चूक मान्य केली आहे. जेव्हा मला माहित नाही की मी चूक काय केली आहे, तर ती चूक मान्य करण्याचा प्रश्नच नसल्याचं केजरीवाल यांनी पत्रात लिहलंय.

मी ही रक्कम विरोध म्हणून परत करतोय, मी तुम्हाला आवाहन करतो की, गृहमंत्र्यांना माझा राजीनामा मंजूर करण्याची सूचना द्या, माझा राजीनामा मंजूर झाल्यानंतर ही रक्कम परत घेण्यासाठी मला न्यायालयात अपील करण्याचा अधिकार मिळेल.

केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आपल्याकडे कोणतीही सेव्हिंग नाहीय, त्यांनी आपल्या सहा मित्रांकडून कर्ज घेतलं आहे. अनेकांनी आपल्याला पैसे देण्यासाठी हात पुढे केले पण मी पैसे नाही घेतले, पैसे घेतले तर मी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा दुरूपयोग करतोय, असा अर्थ काढला गेला असता.

केजरीवाल आपल्या सरकारी सेवेच्या दरम्यान १ नोव्हेंबर २००० रोजी दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर अभ्यासाठी सुटीवर होते. यासाठी त्यांनी एक बॉन्डही लिहून दिला आहे, यावर त्यांचे हस्ताक्षर आहेत. बॉन्डनुसार जर ते तीन वर्षांच्या आत सुटीच्या काळात राजीनामा देतात, किंवा सेवेत परत येत नाहीत तर त्यांना पूर्ण पगार परत करावा लागेल.

केजरीवाल १ नोव्हेंबर २००२ ला पुन्हा कार्यालयात परतले पण त्यांनी पुन्हा १८ महिन्यांची बिनपगारी सुट्टी घेतली.सरकारच्या मते १८ महिन्यानंतर सुटी घेणे बॉन्डच्या नियमांचं उल्लंघन आहे. पण अरविंद केजरीवाल यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. मी बॉन्डमधील कोणताही नियम तोडलेला नाही आणि अभ्यास सुटीनंतर मी पुन्हा सेवेत परतल्यानंतर तीन वर्षांनी मी नोकरीचा राजीनामा दिला.

Wednesday 2 November 2011

जे डे हत्याप्रकरण; आरोपपत्र गुरवारपर्यंत दाखल

नवी दिल्ली - वरिष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येसंदर्भात मुंबई गुन्हे शाखा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि शस्त्रे पुरविणारा नैन सिंग बिश्त यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे आरोपपत्र 4 नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्यात यावे असे आदेश गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने गुन्हे शाखेला दिले आहेत. हे आरोपपत्र गुरवारपर्यंत दाखल होईल, असा अंदाज संबंधित सूत्रांनी व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे (जे. डे) यांच्यावर 11जूनला घाटकोपर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात त्यांचा मृत्यू झाला. 'जे. डे' हे चंदनतस्कारावर बातमी करत होते. चंदन तस्करावर बातमी न छापण्यासाठी 'जे. डे' यांना दहा लाख रुपयांचे आमिष दाखवले होते. याप्रकरणी तीन जणांना जून महिन्यातच अटक करण्यात आली होती.

'जे डे' हे 'मिड डे' या दैनिकात 'शोधवृत्त संपादक' म्हणून गेली अनेक वर्षे काम बघत होते. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Monday 31 October 2011

जैन फाऊंडेशनचे उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर

जळगाव - येथील भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यि पुरस्कारांची निवड काल जैन हिल्स येथे झालेल्या निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जाहीर केली. बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार आणि
ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कारांचा समावेश आहे. नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पुरस्कार समितीची बैठक आज जैन हिल्स येथे झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री सन्मानित मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी पद्मश्री सन्मानित ना.धों. महानोर, ज्येष्ठ समीक्षक गो. मा. पवार, साहित्यिक रवींद्र इंगळे चावरेकर, साहित्यिका डॉ. हेमा जावडेकर, डॉ. वृंदा भार्गवे, बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन हे या निवड समितीचे सदस्य आहेत. मराठी साहित्यात विविध संस्थांतर्फे पुरस्कार दिले जातात. हे लक्षात घेऊन पुरस्कारार्थींची निवड अचूक व्हावी या उद्देशाने ही समिती अधिक व्यापक करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष भवरलाल जैन यांना समितीने विशेष निमंत्रित म्हणून बोलाविले होते.

पुरस्कारांसाठी समितीने महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून शिफारशी मागविल्या होत्या. यात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पुरस्कार जळगाव येथे विशेष समारंभात प्रदान केले जाणार आहेत. या द्विवार्षिक पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख 51 हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे आहे. भवरलाल जैन यांनी पुरस्कारामागची भूमिका निवड समितीच्या सदस्यांसमोर विशद केली.

Sunday 30 October 2011

सोशल नेटवर्किंग गरज की व्यसन?

इंटरनेट क्षेत्रातील बदलामुळे जगभरातील कोणतीही माहिती एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होते. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही. मात्र इंटरनेटच्या फायद्या-तोट्याचे गणित अनेकांना अद्याप समजलेले नाही. सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हे व्यसनच असून, योग्य वेळी थांबवणे गरजेचे आहे.

सोशल नेटवर्किंग म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्‍नही अनेकांसमोर उभा राहतो. इंटरनेटचा वापर हा सोशल नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरला जातोय. सोशल नेटवर्किंगला भारतातल्या इंटरनेट युजरकडून सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच "गुगल' ही सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेली कंपनी प्रथम भारतातल्या युजरचा विचार करते. सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक, ट्विटर, एफबी, ऑर्कूट, चॅटिंग असे अनेक पर्याय युजर्सपुढे उपलब्ध आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भारतातला 75 टक्के युजर हा 35 वर्षाच्या आतील वयाचा आहे. भारतातील युजर इंटरनेटसाठी आठवड्याला किमान साडेबारा तास वेळ देतात. दिवसातले अनेक तास इंटरनेटवर घालविणाऱ्यांची संख्याही मोठी असून, दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ट्विटरमुळे अनेक जण सेकंदा-सेकंदाला आपली वैयक्तिक माहिती अपलोड करताना दिसतात. शिवाय यू-ट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अपलोड करता येत असल्यामुळे दर सेकंदाला ठिकठिकाणचे व्हिडिओ अपलोड होताना दिसतात. जगात कोणतीही घटना घडली तरी काही वेळातच त्याचे व्हिडिओ यू ट्यूबर उपलब्ध होतात. सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहतात. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, अनेक जण मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे.

इंटरनेटसारख्या माध्यमामुळे अगदी मोकळेपणाने युजर्सला आपली मते समोरच्या व्यक्तीसमोर मांडता येतात. शिवाय, माहितीची देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत राहते. इंटरनेट विश्‍व हे माहितीचा खजिना असल्यामुळे प्रत्येक जण नवनवीन माहितीच्या शोधात असतो. सोशल नेटवर्किंगचे हे फायदे आहेत, यात तीळमात्र शंका नाही. परंतु काही प्रमाणात तोटेही आहेत, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. खरे तर सोशल नेटवर्किंगचा वापर आपण कसा करतो, यावर सर्व काही अवलंबून असते. मध्यंतरी सोशल नेटवर्किंगचा तोटाही अनेक देशांना बसला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर बंदी असावी, की काही प्रमाणात निर्बंध लादावेत, यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन्‌ तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा. अनेक जण फेसबुकवर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरातील सदस्यांशी बोलणे कमी झाले आहे. म्हणूनच सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते. मैदानी खेळही कमी होत चालल्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. इंटरनेटचे स्पीड कमी झाले तरी चिडखोरपणा वाढताना दिसतो. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे इंटरनेट ही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. परंतु सहा तासांहून अधिक काळ जर इंटरनेट वापरात असाल, तर व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजावे. यासाठी आपण स्वतः काही निर्बंध लादून घ्यायला हवेत. इंटरनेटमुळे जग जवळ येऊन ठेपले आहे, माहिती मिळत आहे, हे अगदी बरोबर. परंतु इंटरनेट नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढत असेल, काही सुचत नसेल तर ते मग व्यसनच. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जायचे की माहितीसाठी इंटरनेटचा वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविणेच योग्य ठरेल.

सोशल नेटवर्किंग हे खरोखरच प्रभावी माध्यम आहे. परंतु त्याच्या आहारी जाणे हेही एक व्यसनच. इंटरनेटमुळे एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र त्यातील धोक्‍यांपासून प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.

इंटरनेटचे फायदे -
- जगभरातील नवनवीन घडामोडी समजण्यास मदत.
- आपले मत मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ.
- सोशल नेटवर्किंगसारखे अनेक पर्याय खुले.
- काही सेकंदातच जगभरातून ई-मेल मिळू शकतात.
- जगभरातील माहिती खजिना उपलब्ध.

इंटरनेटचे तोटे -
- मैदानी खेळामुळे कमी झाल्यामुळे शारीरिक व्याधी.
- मानसिक आजार होण्याची शक्‍यता.
- चिडचिडेपणात वाढ.
- वैयक्तिक माहितीचा इंटरनेट क्षेत्रात गैरवापर होण्याची शक्‍यता.
- इंटरनेटच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांची चर्चा कमी होण्याची शक्‍यता.

संतोष धायबर

Tuesday 25 October 2011

दिव्य मराठीने केला बंद माल सुरु

औरंगाबाद - दिव्य मराठीचे दर रोज मजेदार किस्से समोर येत आहेत. दैनंदिन बातम्या कमी आणि टुकार लेख देण्यात धन्यता मानणारे हे वृत्तपत्र आता बंद पडलेले मालहि सुरु करत आहेत. दिव्य कन्या रोशनी शिंपीला श्रीकांत सराफ यांनी एक टुकार बातमी  करायला सांगितली. आज २५ ऑक्टोबरच्या दिव्य सिटीच्या पान २ वर दिवाळीत हाईटेक  बाजार हाट या शीर्षक खाली ती बातमी प्रसीद झाली आहे. वास्तविक पाहता हे बीट भाग्यश्री बाप्ते नावाच्या ट्रेनी रिपोर्टरचे आहे. पण श्रींच्या मार्जीमुळे रोशनीला वाटेल तेथे शिंपले वेचण्याची परवानगी आहे. असो, नेहमीप्रमाणे ट्रेनी रिपोर्टर शिंपीने या बातमीत भरपूर चुका केल्या. या बातमीत शहरातील प्रमुख मालचे नावे टाकली आहेत. यात सहा  मालची नवे टाकण्यात आली आहेत. दोन नंबरवर विशाल मेगा मार्ट असे नाव आहे.  मात्र हा माल बंद पडून एक वर्ष झाले. सराफ साहेब पूर्वी काम करत असलेल्या सकाळमध्ये याची बातमी आली होती. तसेच सर्वच मेडियाने या घटनेची दाखल घेतली होती. तरीही या मालचे नाव टाकून शिंपल्यासहित तिचा बॉस सराफ आणि त्याचा बॉस देविदास लांजेवार यांनी नकळत बंद पडलेला माल सुरु केला आहे. खास दिवाळी निमित्त असे बंद माल सुरु झाले तर हि खरच आनंदाची बातमी ठरेल. याच बातमीत शिम्पीने reliance फ्रेश माल चा उल्लेख केला आहे. या मालमध्ये भाज्या आणि फळे मिळतात. यात कोणती आली हाईटेक खरीदी असा प्रश्न पडतो. श्रींच्या आशीर्वादानेच हे घडत असल्याचे समजते.
ता.क . आता रोशनी शिंपी हीच शहर प्रतिनिधींवर लक्ष ठेवेते. मीटिंगला जाण्याची सूचना तीच देते आणि परस्पर तीच कामे सांगते. हीच श्रींची इच्छा असावी.

Monday 24 October 2011

विकिलिक्स प्रकाशन थांबवणार

विकिलिक्सनं आपलं प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. आर्थिक अडचणींमुळे आपण प्रकाशन थांबवत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलंय. पैसे जमवण्यासाठी लवकरच एक अभियान सुरू करणार असल्याचंही विकिलिक्सकडून सांगण्यात आलंय.

विकिलिक्सला आर्थिक क्षेत्रातील काही अमेरिकन कंपन्यांनी पैसे देणे बंद केलंय. विकिलिक्सच्या समूहाने अमेरिकन सरकारच्या हजारो गुप्त फाईली आणि राजकीय केबल्सची माहिती इंटरनेटवर प्रकाशित केली होती.

विकिलिक्सनं अमेरिकन सरकारची चिंता वाढवली होती. अमेरिकन सरकारचं नाही तर मनमोहन सिंह सरकारच्या निर्णयांविषयी माहिती विकिलिक्सनं उजेडात आणली. यामुळे भारतीय राजकारणात वादळंही उभं राहिलं होतं.

फक्त काँग्रेसचं नाही तर भाजप आणि हिदुत्ववाद्यांविषयीही विकिलिक्सनं माहिती समोर आणली होती. यामुळेही भारतीय राजकारणात विकिलिक्स चर्चेत आलं होतं.
विकिलिक्सनं आपलं प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. आर्थिक अडचणींमुळे आपण प्रकाशन थांबवत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलंय. पैसे जमवण्यासाठी लवकरच एक अभियान सुरू करणार असल्याचंही विकिलिक्सकडून सांगण्यात आलंय.

विकिलिक्सला आर्थिक क्षेत्रातील काही अमेरिकन कंपन्यांनी पैसे देणे बंद केलंय. विकिलिक्सच्या समूहाने अमेरिकन सरकारच्या हजारो गुप्त फाईली आणि राजकीय केबल्सची माहिती इंटरनेटवर प्रकाशित केली होती.

विकिलिक्सनं अमेरिकन सरकारची चिंता वाढवली होती. अमेरिकन सरकारचं नाही तर मनमोहन सिंह सरकारच्या निर्णयांविषयी माहिती विकिलिक्सनं उजेडात आणली. यामुळे भारतीय राजकारणात वादळंही उभं राहिलं होतं.

फक्त काँग्रेसचं नाही तर भाजप आणि हिदुत्ववाद्यांविषयीही विकिलिक्सनं माहिती समोर आणली होती. यामुळेही भारतीय राजकारणात विकिलिक्स चर्चेत आलं होतं.

Sunday 2 October 2011

वाहिन्यांवरील एरंडाचे गुऱ्हाळ

नको त्या गोष्टींना अनावश्यक महत्त्व देउन वृत्तवाहिन्या किती सुमार कामगिरी करीत आहेत हे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. आपण देत असलेले वृत्त हे विश्वासार्ह नाही तर करमणूक प्रधान असले पाहिजे असल्या विचाराने प्रेरीत होउन बातम्यांचे सादरीकरण केले जात आहे. त्यामध्ये आपल्या अनावश्यक केलेल्या गोष्टींमुळे काही चांगल्या व्य्नितंच्या अवमुल्यनाचा प्रकार होत आहे याचे भान या वाहिन्यांना राहिलेले नाही. काही व्य्नितंना किती महत्त्व द्यायचे हे या वाहिन्या विचारात घेत नाहीत. मागच्या आठवड्यापासून अशीच गाजत असलेली एक बातमी म्हणजे शोएब अख्तरच्या आत्मचरीत्रावरून अनावश्यक वाद निर्माण केला गेला जात आहे. त्यात म्हणे त्याने सचिन तेंडूलकरवर टीका केली आहे. सचिन आपल्याला घाबरतो असे लिखाण केले आहे त्यामुळे त्या बातमीवर लगेच एरंडाचे गुऱ्हाळ सुरू केले. या बातमीला महत्त्व देण्याइतकी ती मोठी बातमी होती काय? कारण नसताना शोएब अख्तरच्या पुस्तकाची फुकटात प्रसिद्धी मात्र या वृत्तवाहिन्यांनी केली. हा सगळा वृत्तवाहिन्यांच्या भोंगळ कारभार आहे. त्या शोएब अख्तरच्या पुस्तकातील एक पानही न वाचता त्यावर चर्चा करणे हा च्नक वेडेपणा म्हणावा लागेल. कोणीतरी सांगतो की शोएब अख्तरने सचिन तेंडूलकर मला घाबरतो असे त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की लगेच शोएबचा निषेध सुरू. सचिन कसा महान आहे. तो कसा स्निसर मारतो. त्याने किती धावा काढल्या आहेत हे सांगण्यासाठी वृत्त वाहिन्यांवर मग चढाओढ सुरू झाली. अत्यंत सवंग आणि सुमार कामगिरी म्हणून या प्रकाराकडे पहावे लागेल. आपण इथं बसून फालतू रटाळ चर्चा करून शोएब अख्तरच्या पुस्तकातला मजकूर बदलणार आहे काय? ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. मार्केटमध्ये आलेही नाही. त्यापुर्वीच हे चर्चाचर्विचरण कशासाठी केले याचे कोणाकडेही उत्तर नाही. पण या चर्चेमुळे सचिनचे अवमूल्यन करण्याचे काम मात्र वाहिन्यांनी केले. शोएब तर दुसऱ्या देशाचा त्यातून पाकीस्तानी माणूस आहे. त्यांच्याकडून भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका येणेच अपेक्षित असताना आपण इथं बसून शोएबला का महत्त्व देत बसलो हे एकाही वृत्तवाहिनीला समजले नाही. दाखवायला चांगल्या बातम्या नाहीत, शोधक आणि कल्पक बुद्धी नाही कसला विचार नाही त्यामुळेच नको त्या कार्यक्रमांना, नको त्या गोष्टींना ठळकपणे प्रसिद्धी देण्याचे काम केले जाते. झी 24 तास, आयबीएन लोकमत आणि स्टार माझा या वाहिन्या अक्षरश: सचिन आणि शोएब याशिवाय दोन दोन दिवस काहीही दाखवत नव्हत्या. त्यानंतर पुन्हा एकदा शोएब अख्तरच्या भूमिकेचे शाहीद अफ्रिदीने समर्थन केले म्हणून त्याच्या टिकेचे सत्र दिवसभर चालवले. शोएब आला की सचिनचे पाय लटपटायचे हे वृत्त दिवसभर दाखवून तथाकथीत तज्ज्ञांची त्यावर मते घेउन सचिन कसा महान आहे हे पटवून देण्याचा आटापिटा वाहिन्यांनी केला. काही गरज नव्हती या गोष्टीची. शेंदाड शिपाई किंवा भेदरट माणसं अशा गोष्टी नेहमीच करतात. एखादं पाप्याचं पितर असतं ते शाळेतून आडदांड मुलाचा मार खाउन येतं. आणि ज्या कोणाला माहित नाही त्यांना ते पाप्याचं पितर सांगतं की मी त्या आडदांड मुलाला मारलं. याला फुशारकी मारणे असे म्हणतात. तोच प्रकार शाहीद अफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनी केलेला आहे. अख्तर काय फ्नत भारताविरोधातच सामने खेळला काय? जगातल्या सर्व देशांबरोबर त्याने सामने खेळले आहेत. पण सचिन मला घाबरायचा असे तो म्हणतो याचा अर्थच सचिन सर्वश्रेष्ठ आहे हे त्याने मान्य केले आहे. त्यामुळे या चर्चा आणि बातम्यांना इतकी प्रसिद्धी देण्याची काहीच गरज नव्हती. आज महाराष्ट्रात असंख्य समस्या आहेत. महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, अनागोंदी आहे. सरकारने शिक्षणाचे वाटोळे केले आहे. शिक्षणात भ्रष्टाचार झाला आहे. या विषयांकडे एकाही वाहिनीचे लक्ष नाही. सरकारला बदलायला लावायची ताकद वृत्त वाहिन्यांमध्ये असताना ते काम न करता फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात या वाहिन्या गुंतल्याने सखेद आश्चर्य वाटल्या वाचून रहात नाही. तोच प्रकार दोन दिवसांपुर्वी पुन्हा एकदा केला गेला. लता मंगेशकर यांना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लता मंगेशकर यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यावे अशी अपेक्षा व्य्नत केली. अपेक्षा व्य्नत केली म्हणजे काही सरकार लगेच त्याची घोषणा करणार नव्हते. पण झी 24 तासवरून त्यावर रोखठोक कार्यक्रम घेतला. त्यात अगदी विश्वास मेहेंदळेंपासून ज्येष्ठ पत्रकारांना समाविष्ट करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. काही आवश्यकता होती काय याची? त्या कार्यक्रमात मग अमिताभ आणि लता मंगेशकर यांच्यावर टीकेचा सूर आला. त्यांनी भरपूर पैसे कमावले आहेत त्यामुळे लता मंगेशकर आणि अमिताभ यांना भारतरत्न देउ नये असे एका विद्वानाने व्य्नत केले. म्हणजे लता मंगेशकर यांना आधिच तो पुरस्कार दिला गेला आहे याचेही भान नव्हते. एका महाशयांनी महात्मा गांधींना हा पुरस्कार का दिला नाही म्हणून मुद्दा उपस्थित केला तर एकाने मेधा पाटकर यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. कशाचाही कशाशीही संबंध नसलेली ही चर्चा घडवली गेली. काही वैचारीक चर्चा करायला या वाहिनीकडे मुद्दे नाहीत काय? शिक्षणातील अनागोंदी प्रकाराबाबत का नाही चर्चा घडवली? या असल्या फालतू चर्चांना रोखठोक काय उधारही पहायला कोणाला आवडत नाहीत. ज्या कोणी मेधा पाटकर यांचे नाव सुचवले त्या मुद्याचा आधार घेउन का नाही अशी एखादी चर्चा वाहिनीवर घडवली गेली की मेधा पाटकर यांचे आंदोलन किती खरे किती पोकळ? पंचवीस वर्ष त्या नर्मदेच्या खोऱ्यात ठाण मांडून बसल्या आहेत. त्याने काय साध्य झाले? मेधा पाटकर यांचे नाव या आंदोलनामुळे गिनीज बुकमध्ये नोंदवा अशी मागणी करायला पाहिजे. पण त्यांचे आंदोलन नेमके काय आहे याबाबत चर्चा का नाही कधी घडवली? आपल्याकडे लोकांच्या अनेक कृतींचे आकलन अनेकांना होत नसते. त्याचे आकलन होण्यासाठी अशा चर्चा घडवणे आवश्यक असते. अण्णांच्या आंदोलनामुळे मागचा बाजार चांगला गेला. पण त्यानंतर काही विषय मिळेनात म्हटल्यावर सचिन, लता, अमिताभ यांना कुठेतरी टच करण्याचा प्रयत्न केला गेला. जितेंद्र आव्हाड नामक राष्ट्रवादीच्या आक्रमक आमदारांनी लगेच शोएब अख्तरचा कोणताही कार्यक्रम होउ देणार नाही. त्याला विरोध केला जाईल. अशी ब्रेकींग न्यूज या वाहिनीने सोडली. ज्या मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत त्या भागातून पाकीस्तानी, बांग्लादेशी घुसखोर हाकलून लावू अशी प्रतिज्ञा का नाही आव्हाडांनी केली? आपली धाव ज्या कुंपणापर्यंत आहे तिथे आपण काही करू शकत नाही आणि कुंपणाबाहेर भुंकायला कशासाठी जायचे? या बातमीला महत्त्व देण्याची गरज होती काय? वृत्त वाहिन्यांच्या अशा सुमार आणि अनावश्यक कामगिरीमुळे चित्रपटांप्रमाणेच एखादे सेन्सॉर बोर्ड नेमावे असे वाटते.

प्रफुल्ल फडके
संपादक कर्नाळा
पनवेल

Monday 26 September 2011

'दर्डा'वणारेच हवालदिल

अलीकडच्या काही लेखांमधून मी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, त्यांचे संपादक व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झोड उठवली होती. त्यांचा खरेखोटेपणा, त्यांचेच शब्द, लेख, उतारे किंवा बोलणे यातून चव्हाटय़ावर आणला. त्यापैकी कुणालाही त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावेसे वाटलेले नाही; म्हणूनच त्यांनी या आक्षेप-आरोपांचा स्वीकार केला, असे मानणे भाग आहे आणि त्यापैकी कुणी तसे धाडस करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण माझी ही लढाई आजची नाही. बारा-पंधरा वर्षे भ्रष्ट, बदमाश प्रवृत्तीच्याविरुद्ध एकाकी लढत देत आलो आहे. ती लढाई मुंबईपुरती आणि माझ्या अल्प साधनांनी लढवली जात असल्याने फारशा लोकांपर्यंत-वाचकांपर्यंत पोहचत नव्हती. 'पुण्यनगरी'ने ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेऊन पोहचवली.

यातले बहुतांश संपादक पत्रकार व्यक्तीश: मला ओळखतात व चांगल्या परिचयाचे सुद्धा आहेत. त्यांचे माझे कोणतेही व्यक्तिगत भांडण नाही. म्हणूनच मी त्यापैकी कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याबद्दल अक्षरही लिहिले नाही. केवळ त्यांच्या जाहीर भूमिका व जाहीर व्यवहारांपुरता विषय मर्यादित ठेवला आहे. यातली बहुतांश मंडळी मात्र तो शिष्टाचार त्यांच्या पत्रकारी व्यवहारात पाळत नाहीत. कुणाच्याही व्यक्तिगत जीवनात डोकावणे, खाजगी आयुष्यातल्या गोष्टी चव्हाटय़ावर आणताना त्यांनी विधिनिषेध बाळगलेला नाही. तरीही त्यांच्याशी ही मुद्यांची लढाई लढताना मी तो विधिनिषेध पाळला आहे. पण त्यांच्याकडे वैचारिक वा मुद्देसूद उत्तरेही नाहीत हे जगासमोर स्पष्ट झाले.

ताजे उदाहरण द्यायचे तर गेल्या गुरुवारी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मंत्रालयातील स्वीय सहायकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. एवढी खळबळजनक बातमी अन्य कुठल्या मंर्त्याबद्दल असती तर तो 'आजचा सवाल' झाला असता. 'दर्डा'वून निखिल वागळे यांनी संबंधित मंर्त्याला खुलासे मागितले असते. पण या बातमीचे नामोनिशाण 'कायबीइन लोकमत' वाहिनीवर नव्हते. यालाच भ्रष्टाचार म्हणतात. तुमच्या आमच्या सामान्यांच्या मराठी भाषेत 'चोराच्या उलटय़ा बोंबा' म्हणतात. एका वर्षापूर्वी सांगली-मिरजचा माजी महापौर बागवान फरारी असताना जयंत पाटील नामक मंर्त्याच्या बंगल्यावर गेला असल्याचे वृत्त सांगताना व जयंतरावांना त्याचा जाब विचारताना निखिलचा आवेश आठवतो का? अर्थात पोलिसांनी त्याला वॉन्टेड वा फरारी घोषित करण्याआधी तो बंगल्यावर गेला होता ही गोष्ट अलाहिदा. म्हणजे आरोप चुकीचा असून देखील निखिल जयवंतरावांना आरोपी लपवला म्हणून दमदाटी करत होता. आता राजेंद्र दर्डाचा स्वीय सहायक मंत्रालयातच पकडला गेलेला असताना 'आजचा सवाल' विचारणारे हवालदिल होऊन भलतेच चराट वळत बसले होते.

भ्रष्टाचार हाच असतो. जे खोटे आहे, गैर आहे, बनावट आहे ते पूर्ण ठाऊक असतानाही दडपशाही करण्याला भ्रष्टाचार म्हणतात ना? मग ती खोटी बातमी, खोटा आरोप असो की कारण नसताना कुणाची अडवणूक करून उकळलेली रक्कम असो. भ्रष्टाचाराची सुरुवात भ्रष्ट बुद्धीतून होत असते. चांगले-वाईट, खरेखोटे, भलेबुरे करण्याच्या कामी माणसाला विवेक मदत करत असतो आणि विवेक हा बुद्धीच्या पायावर उभा असतो. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा विवेक डळमळू लागतो.

आपली निर्भिडता, परखडपणा जगासमोर दाखवायला निखिल वागळे, कुमार केतकर यांच्यासारखे संपादक महेश भट, अमरापूरकर यांच्यासारखे कलावंत किंवा अन्य साहित्यिक, पत्रकार कुणाला धारेवर धरतात तेव्हा तो निकष त्यांनी प्रत्येकाच्या बाबतीत तेवढय़ाच कठोरपणे लावायला हवा. नरेंद्र मोदी भेटला किंवा आपल्याकडे पिस्तुल असते तर आपण त्याला ठार मारले असते, असे विजय तेंडुलकर यांनी म्हटल्यावर या सर्व शहाण्यांची दातखिळी बसली होती. त्यांना तसे म्हणायचे नव्हते, असली सारवासारव सुरू झाली होती. हा भ्रष्ट बुद्धीचा नमुना आहे. जयवंतरावांना आर.आर. आबा पाटलांना संपादकगिरीचा हिसका दाखवीत (आपण मंर्त्यांना घाबरत नाही असा) बोलणारा निखिल वागळे दर्डा नावाचा मंत्री असला मग फुसका बार होतो. हा सर्वात भयंकर भ्रष्टाचार असतो.

समाजात प्रतिष्ठित, मान्यवर, नावाजलेले लोक जेव्हा असे सोयीचे शिष्टाचार दाखवू लागतात तेव्हा लोकही त्यांचे अनुकरण करू लागतात. जशी माणसाची बुद्धी असते तसा समाजातला बुद्धिवादी-प्रतिष्ठित घटक ही समाजाची बुद्धी असते. ती भ्रष्ट झाली, विवेकशून्य वागू लागली मग आपोआप अवघा समाज राजरोस भ्रष्टाचार करू लागतो. आपल्या सोयीचा भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार तर आपल्या गैरसोयीचा शिष्टाचार तोच भ्रष्टाचार, अशी व्यवहारातील भाषा व व्याख्या बदलून जाते. गेल्या दोन दशकात पत्रकार, विचारवंतांनी मोठय़ा प्रमाणात या भ्रष्टाचाराची लागण केली; त्याचेच भीषण परिणाम आज आपण अनुभवत आहोत.

याचा एक पुरावा पुरेसा ठरावा. आजकाल प्रत्येक मोठी कंपनी, संस्था वा राजकीय पक्ष यांनी आपल्या यंत्रणेत मीडिया मॅनेजर हे पद निर्माण केले आहे. प्रसिद्धी हवी असेल तर त्या संस्था-संघटनांना याच मॅनेजर्सकडून त्याची पूर्वतयारी करून घ्यावी लागते. तमाम संबंधित पत्रकारांना आमंत्रण देण्यापासून त्यांची प्रवास, खाण्या-पिण्याची सोय करावी लागते. त्यातली देवाण-घेवाण बाजूला ठेवू. हे मीडिया मॅनेजर्स काय करतात? नावावरून लक्षात येते की ते आपल्या संस्था-यजमानासाठी मीडिया 'मॅनेज' करतात. याचा अर्थ मीडिया 'मॅनेज' केला जातो. मॅनेज करता येतो. ज्याला मॅनेज केले जाते तो स्वतंत्र, परखड, सडेतोड, निर्भिड कसा असू शकेल? अविष्कार स्वातंर्त्याचे झेंडे रात्रंदिवस खांद्यावर घेऊन फिरणार्‍यांनी याचे उत्तर द्यायला नको का? पत्रकारिता व माध्यमे स्वयंभू, निरपेक्ष असतील तर हे मीडिया मॅनेजर्स कशाला असतात?

तेवढेच नाही. पीआर कंपन्याही निघाल्या आहेत. त्या कंपन्या माध्यमे, वृत्तपत्रे यात बातम्या प्रक्षेपित वा छापून आणत असतात. बातम्या सुटसुटीत लिहून वृत्तपत्रांना पाठवत असतात. त्यामुळेच अनेकदा एकच मजकूर शीर्षक बदलून अनेक वृत्तपत्रांत छापून येतो. हे सर्व मॅनेज होते आणि मॅनेज झालेले आजचे सवाल विचारून विनाकारण आवेशपूर्ण अभिनय करीत असतात. तिथून भ्रष्टाचार सुरू होतो.

भारतीय समाजाची आज जी बौद्धिक घसरगुंडी झालेली आहे त्यातच भ्रष्टाचाराचा उगम आहे. माहिती देणार्‍या अधिकाराबद्दल खूप बोलले जाते, पण माहिती 'लपवण्याचा' विशेषाधिकार राबवला जातो त्याचे काय? राजेंद्र दर्डाच्या स्वीय सहायकाच्या धरपकडीवर लोकमत वृत्तपत्र वा वाहिनी मौन धारण करतात, हा शिष्टाचार आहे की भ्रष्टाचार? आपले पाप लपवणारा प्रत्येकजण सदाचारी असतो. भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायची जबाबदारी घेतलेलेच असा निर्ढावलेपणाने बौद्धिक वैचारिक भ्रष्टाचार करणार असतील तर सर्वसामान्य माणसाचे आदर्शच भ्रष्ट होऊन जातात ना? आज सर्वत्र बोकाळलेला जो भ्रष्टाचार दिसतो त्याचे मूळ म्हणूनच बौद्धिक भ्रष्टाचारात रुजलेले आहे. 

भाऊ तोरसेकर
मो. 9702134624

Sunday 25 September 2011

मिडीया मुग़लों की नई सल्तनत में त्यागपत्रो का दौर

दिव्य भास्करने महाराष्ट्र के औरंगाबाद में बडे तामझाम के साथ अपना नया संस्करण शुरू तो किया, लेकीन अखबार शुरू होने के  चार-पांच महिनों के भीतर ही मिडीया मुग़लों की ईस नई सल्तनत में त्यागपत्रो का दौर चल पडा है.
दिव्य भास्करने महाराष्ट्र की पत्रकारिता में क्रांती लाने की बात की, लेकीन ऐसी क्रांती को लानेवाले प्रणेता भास्कर नहीं दे सका है. स्टेट एडिटर के तौर पर आसीन अभिलाष खांडेकर को केवल दिन काटने की पडी है, कुमार केतकर जैसे वरिय संपादक की भास्कर की इस "मदर एडीशन" में स्थानीय  तौर पर कोई भूमिका नहीं है. बाल ठाकरे के सामना से लाये गये धनंजय लांबे जैसे किं कर्तव्यविमूढ स्थानीय संपादक मातहतों को गालीगलौच के सिवाय और कुछ नहीं दे पा रहे है.
अजित वडनेरकर, जो की भाषाशास्त्री समझे जाते है ( और जिन्हे मराठी की गंध न होने पर भी "न्यूजरूम इंचार्ज" बनाया गया है) मराठी पत्रकारिता में कोई भी वास्तविक आदर्श बनाये बिना सपनों की पत्रकारिता की चाह में वृत्त संपादक, उप संपादक और अन्य कार्मिकों को देशभर से जमा किये गये कटू से कटू शब्दों में क्लास लेने के सिवाय कुछ कर नहीं पा रहे है. एक दिन बात तो इतनी बिगड गई की एक अनुवादक जैसे कनिष्ट कार्मिक ने अजित वडनेरकर की माथापच्ची से तंग आकर "तू कर के दिखा" कह डाला. ऐसे में और हो भी क्या सकता है? रोज रोज की उसी सरदर्दी से उबकर दिव्य भास्कर के साथ आये लोग निराशा हाथ लगने से अपने त्यागपत्र सौंप रहे है.
वितरण विभाग की आक्रमक मार्केटिंग के फल स्वरूप साल भर के लिये सबस्क्रिप्शन तो पा लिया, लेकीन जो वादे दिव्य भास्कर ने किये है, वो तो संपादकीय विभाग को पुरे करने है. इन वादों को पूरा कर सकनेवाली टीम अभिलाष खांडेकर नही चुन पाये है. अब हाल यह है की, स्थानीय संपादक से लेकर प्यून तक लोगों का जमावडा तो खडा हो गया लेकीन इसको ठीक से हांके कौन?अभिलाष खांडेकर अपनी कार से उतर कर केबीन में जाने तक और केबीन से निकल कर कार में घुसने तक ही कार्मिको के बीच होते है. आरई धनंजय लांबे इन दिनों उनका पुराना अखबार "सामना" में सीखी गई तिखी गालीयां बकने का अभ्यास कर रहे है. अर्थात उनको 
अजित वडनेरकर जैसे भाषाशास्त्री ट्यूशन न देते तो आश्चर्य था. ये भी ठीक! ऐसी बातें किसी भी संस्था मी होती रहती है. लेकीन ऐसी बाते उस संस्था में होना कतई लाजीमी नहीं है जिसे एक दुसरे राज्य में अपने संचार की नींव डालनी है. रमेशचंद्र अगरवाल, सुधीर अगरवाल और कंपनी के संचालको की खुशी के लिये एक के बाद एक
संस्करण शुरू कर "ऑल इज वेल" का चित्र बनाया जा रहा है, वह केवल एक झूठ है.
महाराष्ट्र की पत्रकारिता में इतिहास में पहली बार दिव्य भास्करने इतना उंचा वेतनमान दिया. दिव्य भास्कर की पत्रकारिता से अवगत कराने के लिये मराठी पत्रकारों को दी गई ट्रेनिंग भी तीन सितारा होटल में दी. औरंगाबाद के केंद्रवर्ती रोड जालना रोड पर काफी बडा और चकाचक ऑफिस दिया गया. सबसे महत्वपूर्ण बात, वेतन समय पर और शहर के अन्य किसी भी अखबार से पहले होने लगे.इतने सारे सुख मिलने पर भी लोग दिव्य मराठी को त्यागपत्र थमा रहे है -
आखीर क्यों?
क्या किया अभिलाष खांडेकर ने महाराष्ट्र में आकर? 
इसके लिये उत्तरदायी है अभिलाष खांडेकर की वह कमी जो उन्हें गलत स्थान पर गलत व्यक्ती को चुनने के लिये मजबूर कर देती है.
१. इन जनाब ने औरंगाबाद शहर की किसी भी गली का पता न होनेवाले, पुना से आये, आईएएस पद को पाने में असफल रहे देविदास लांजेवार नामक युवा को डीएनइ बना दिया.
२. रामोजी राव के ई टीवी से आये रुपेश कलंत्री को डीबी स्टार का जिम्मा थमा दिया - इन कलंत्री साहब की करतुत सिर्फ इतनी है की इनकी शिक्षा औरंगाबाद में हुई है और चमकूगिरी में माहीर है.
३. मुंबई की निवासी मृण्मयी रानडे जो की कामुक लिखावट में ज्यादा रुची लेती है उन्हें अब "मधुरिमा" का जिम्मा सोपा जायेगा.    
४. सबसे महत्वपूर्ण नियुक्ति जिसके लिये पुरी तरह से अभिलाष खांडेकर को उत्तरदायि नहीं माना जा सकता वह है धनंजय लांबे जैसे गैर-अनुभवी और मुंहफट व्यक्ति को आरई बनाना. आंख फोड दुंगा, टांग तोड दुंगा जैसे और अन्य कई शब्द जो लिखे नहीं जा सकते  को लोगों को सुनाना इनकी विशेषता है.     
५. रही सही कसर अजित वडनेरकर के न्यूजरूम इंचार्ज बनने से पुरी हुई है. इन जनाब को मराठी तो आती नहीं, लेकीन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भाषाशास्त्री होने से इन्हें चूप रहा भी नहीं जाता. दिव्य भास्कर के पुरे संस्करणो से खबरें चुनकर "भास्कर स्पेशल" नामक पन्ना बनाना इनकी मुख्य जिम्मेवारी है - बाकी समय में आरई धनंजय लांबे से स्तुतीसुमन लेना और अपनी आनेवाली किताबों की पंडूलीपी बनाने में गुजारते है.                           
इन सब बातों की बदौलत दिव्य मराठी को कार्मिक अलविदा कर रहे है, जिनमे अबतक शामिल है -  
१. सुशील कुलकर्णी -(डीबी स्टार थे, असल काम शुरू होने से पहले ही "पुण्यनगरी" में चले गये )
२. चंद्रकांत यादव  ( डीएनई थे, सकाळ में चले गये )
३. माधवी कुलकर्णी (उप संपादिका को यहां अनुवादक बनाया गया था, काम के बोझ से तंग आकर छोड गयी)
४. यशवंत कुलकर्णी  (अनुवादक थे, अजित वडनेरकर की भोपाली गालीगलौच को कडा जवाब देने से त्यागपत्र देने के लिये बाध्य किया गया, वेबदुनिया इंदौर को चले गये)
५. आरती जोशी ( कल्चरल खबरें देखती थी, अब लोकमत में जाने की खबर है)
और भी लोग छोडने की ताक में है, लेकीन उनके नाम देना सही नहीं होगा.
इन सब बातों को केवल इसलिये लिखा गया है की महाराष्ट्र में जो पत्रकारिता का नया दौर शुरू होने जा रहा था, वह चंद लोगों की नालायकी के कारण एक अव्यवस्था में बदल गया. दिव्य भास्कर प्रबंधन के धन के निवेश के बतौर जो नौटंकी चल रही है वह रुके, अब भी समय है.

शांतकुमार मोरे सोलापूर पुढारीत रूजू होणार; अभय दिवाणजींची पर्यायी शोध मोहीम सुरू


सोलापूर -लोकमत  सोडल्यापासून( की काढल्यापासून? ) ‘बस’  खात्यात असणारे शांतकुमार मोरे ‘पद्मश्रीं’ चे ‘पुढारी’  होणार असून ते लवकरच सोलापूर कार्यालयात रूजू होणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. दरम्यान, ‘मीच सोलापूरचा पुढारी’  अशा तो-यात वावरणारे आवृत्तीप्रमुख अभय दिवाणजी हे अन्य पर्यायाच्या शोधात असल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या थकबाकीमुळे  ‘पद्मश्री’  सोलापूर कार्यालयाच्या कामकाजावर नाखूष होते.  त्यातच दिवाणजी व चौधरी यांच्यातील शीतयुध्दाच्या अनेक तक्रारी कोल्हापूरपर्यंत पोहचल्या होत्या. हेमंत चौधरी हे ‘पद्मश्रीं’ चे जुनेजाणते सहकारी असून त्यांचे ‘ फॅमेलीमेंबर’  म्हणून ओळखले जातात.  मात्र दिवाणजींनी  पुढारीच्या सोलापूर कार्यालयात रूजू झाल्यापासून चौधरींच्या साम्राज्याला सुरूंग लावला होता. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नव्हता.
 या पाश्र्वभूमीवर दिवाणजींना धक्का देण्याची खलबते कोल्हापुरात चालली होती. दरम्यानच्या काळात  लोकमत सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक  शांतकुमार  मोरे   लोकमतमधून बाहेर पडले.(लोकमतने त्यांना काढले  की त्यांनीच लोकमतला सोडले हे लोकमत आणि मोरे यांनाच माहित) त्यामुळे ते निवांतच होते. त्यातच सोलापूर लोकमतमधील त्यांचे एकेकाळचे वरिष्ठ अरूण खोरे पुणे पुढारीत दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून(व्हाया चौधरी) मोरे ‘पद्मश्रीं’ च्या कोल्हापुरात पोहचले.  ‘पद्मश्रीं’ नी मोरे यांना सोलापूर पुढारीचे निवासी संपादकपद दिले असून ते १ ऑक्टोबर रोजी सोलापूर कार्यालयाचा पदभार स्विकारणार असल्याची खबर ‘बेरक्या’ पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, मोरे हे एकेकाळचे दिवाणजींचे लोकमतमधील वरिष्ठ असूनही त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे दिवाणजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळचे लोकमतचे ‘बॉस’  मधुकर भावे यांच्या वशिल्याने ‘डी.एम.’  च्या संपर्कात असल्याची चर्चासुध्दा सोलापुरात  सुरू झाली आहे.

Friday 23 September 2011

राजेंद्र दर्डांच्या पीएला लाच घेताना अटक

मुंबई -नाशिक येथील एका इंग्रजी शाळेला परवानगी देण्याच्या बदल्यात 65 हजार रुपयांची लाच घेताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा स्वीय सहायक आणि त्यांच्या कार्यालयातील इतर दोन कर्मचार्‍यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दर्डा यांच्या दालनातच गुरुवारी ही धडाकेबाज कारवाई केली. या घटनेमुळे मंत्रालय कर्मचार्‍यांसह राजकीय वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजेंद्र दर्डा यांचे स्वीय सहायक दीपक रामचंद्र कारंडे, सहायक प्रशांत दादासाहेब अंधारे आणि लिपिक प्रवीण कचेश्वर बोडके अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, गुरुवारी संध्याकाळी मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या दर्डा यांच्या दालनात त्यांना पकडण्यात आले. नाशिक येथील एका शिक्षण संस्थेची सातवीपर्यंत शाळा आहे. त्याला जोडूनच इंग्रजी माध्यमाच्या आठवी ते बारावीपर्यंतच्या तुकड्यांची कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळा सुरू करण्यासाठी संस्थेच्या सचिवांनी 2010-11मध्ये शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली होती. परंतु शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून पूर्तता करण्यास संस्थेला कळविले. त्यानुसार संस्थेने त्रुटींची पूर्तता करून अहवालही सादर केला होता. मात्र, मान्यतेची फाईल दाबून ठेवण्यात आली.

परिणामी संस्थेच्या सचिवांनी शिक्षण विभागातील सहायक अंधारे यांची भेट घेतली. त्यांनी प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम देण्यास सचिवांनी नकार दिल्याने तडजोडीअंती अंधारे यांना 30 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील 15 हजार रुपये अंधारे यांना देण्यातही आले. त्यानंतर हे काम आपल्या पातळीपर्यंतच असून प्रस्ताव पुढे जाण्यासाठी शिक्षणमंत्र्यांचे स्वीय सहायक कारंडे यांच्याशी बोलून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यानंतर अंधारे यांनी संस्थेची फाईल तपासून शिक्षक सूची मंजुरीची पूर्तता करण्यास सांगून परत येताना
उर्वरित 15 हजार रूपये आणण्याचे बजावले. कारंडे यांनी प्रस्तावाची फाईल पुढे पाठविण्यासाठी 90 हजार रूपयांची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये मागितले होते. त्यावर संस्थेच्या सचिवांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात दर्डा यांच्याच कार्यालयात सापळा रचला. यावेळी अंधारे यांनी लाचेची रक्कम प्रविण बोडके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीण यांनी 15 हजार रूपये स्विकारले, तर कारंडे यांने 50 हजार रूपये स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या तिघांनाही रंगेहात पकडले.

उर्वरित 15 हजार रूपये आणण्याचे बजावले.

कारंडे यांनी प्रस्तावाची फाईल पुढे पाठविण्यासाठी 90 हजार रूपयांची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये मागितले होते. त्यावर संस्थेच्या सचिवांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात दर्डा यांच्याच कार्यालयात सापळा रचला. यावेळी अंधारे यांनी लाचेची रक्कम प्रविण बोडके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीण यांनी 15 हजार रूपये स्विकारले, तर कारंडे यांने 50 हजार रूपये स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या तिघांनाही रंगेहात पकडले.

पीए कारंडे दर्डांचा खास माणूस  

राज्यात ज्या ज्या वेळी दर्डा कटूंबीय सत्तेत सहभागी झाले. त्या प्रत्येक वेळी दीपक कारंडे त्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करीत असे. अन्य स्वीय सहायकांपेक्षा कारंडे हे दर्डांच्या खास विश्वासातील होते, अशी चर्चा मंत्रालयात एकावयास मिळत होती. 
 दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे
 
काल रात्रीपासून मी औरंगाबादच्या दौर्‍यावर आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी वर्षानुवर्षे सुरू आहेत त्याविरुद्ध मी आणि माझा विभाग सातत्याने काम करत आहे. आज घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिसांच्या तपासात संपूर्ण सत्य बाहेर येईल. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 

राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री