Thursday 22 September 2011

शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पीएला लाच घेताना रंगेहात पकडले

मुंबई. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा पी.ए. दीपक करांडे याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. करांडे हा ६५ हजारांची लाच स्वीकारताना चतुर्भुज झाला आहे. शिक्षण विभागातील अन्य एका कर्मचा-यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एज्युकेशन सोसायटीला काही गोष्टींची मान्यता हवी होती, त्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आली होती. सोसायटीने लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दर्डा यांनी व्यक्त केली आहे. 'मी काल रात्रीपासूनच औरंगाबादेत असल्याने मला अधिक माहिती नाही. माझ्या पीएबद्दल आजपर्यंत मला कधीही मनात शंका आली नाही', असे दर्डा यांनी म्हटले आहे.