Monday, 26 September 2011

'दर्डा'वणारेच हवालदिल

अलीकडच्या काही लेखांमधून मी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, त्यांचे संपादक व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झोड उठवली होती. त्यांचा खरेखोटेपणा, त्यांचेच शब्द, लेख, उतारे किंवा बोलणे यातून चव्हाटय़ावर आणला. त्यापैकी कुणालाही त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावेसे वाटलेले नाही; म्हणूनच त्यांनी या आक्षेप-आरोपांचा स्वीकार केला, असे मानणे भाग आहे आणि त्यापैकी कुणी तसे धाडस करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण माझी ही लढाई आजची नाही. बारा-पंधरा वर्षे भ्रष्ट, बदमाश प्रवृत्तीच्याविरुद्ध एकाकी लढत देत आलो आहे. ती लढाई मुंबईपुरती आणि माझ्या अल्प साधनांनी लढवली जात असल्याने फारशा लोकांपर्यंत-वाचकांपर्यंत पोहचत नव्हती. 'पुण्यनगरी'ने ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेऊन पोहचवली.

यातले बहुतांश संपादक पत्रकार व्यक्तीश: मला ओळखतात व चांगल्या परिचयाचे सुद्धा आहेत. त्यांचे माझे कोणतेही व्यक्तिगत भांडण नाही. म्हणूनच मी त्यापैकी कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याबद्दल अक्षरही लिहिले नाही. केवळ त्यांच्या जाहीर भूमिका व जाहीर व्यवहारांपुरता विषय मर्यादित ठेवला आहे. यातली बहुतांश मंडळी मात्र तो शिष्टाचार त्यांच्या पत्रकारी व्यवहारात पाळत नाहीत. कुणाच्याही व्यक्तिगत जीवनात डोकावणे, खाजगी आयुष्यातल्या गोष्टी चव्हाटय़ावर आणताना त्यांनी विधिनिषेध बाळगलेला नाही. तरीही त्यांच्याशी ही मुद्यांची लढाई लढताना मी तो विधिनिषेध पाळला आहे. पण त्यांच्याकडे वैचारिक वा मुद्देसूद उत्तरेही नाहीत हे जगासमोर स्पष्ट झाले.

ताजे उदाहरण द्यायचे तर गेल्या गुरुवारी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मंत्रालयातील स्वीय सहायकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. एवढी खळबळजनक बातमी अन्य कुठल्या मंर्त्याबद्दल असती तर तो 'आजचा सवाल' झाला असता. 'दर्डा'वून निखिल वागळे यांनी संबंधित मंर्त्याला खुलासे मागितले असते. पण या बातमीचे नामोनिशाण 'कायबीइन लोकमत' वाहिनीवर नव्हते. यालाच भ्रष्टाचार म्हणतात. तुमच्या आमच्या सामान्यांच्या मराठी भाषेत 'चोराच्या उलटय़ा बोंबा' म्हणतात. एका वर्षापूर्वी सांगली-मिरजचा माजी महापौर बागवान फरारी असताना जयंत पाटील नामक मंर्त्याच्या बंगल्यावर गेला असल्याचे वृत्त सांगताना व जयंतरावांना त्याचा जाब विचारताना निखिलचा आवेश आठवतो का? अर्थात पोलिसांनी त्याला वॉन्टेड वा फरारी घोषित करण्याआधी तो बंगल्यावर गेला होता ही गोष्ट अलाहिदा. म्हणजे आरोप चुकीचा असून देखील निखिल जयवंतरावांना आरोपी लपवला म्हणून दमदाटी करत होता. आता राजेंद्र दर्डाचा स्वीय सहायक मंत्रालयातच पकडला गेलेला असताना 'आजचा सवाल' विचारणारे हवालदिल होऊन भलतेच चराट वळत बसले होते.

भ्रष्टाचार हाच असतो. जे खोटे आहे, गैर आहे, बनावट आहे ते पूर्ण ठाऊक असतानाही दडपशाही करण्याला भ्रष्टाचार म्हणतात ना? मग ती खोटी बातमी, खोटा आरोप असो की कारण नसताना कुणाची अडवणूक करून उकळलेली रक्कम असो. भ्रष्टाचाराची सुरुवात भ्रष्ट बुद्धीतून होत असते. चांगले-वाईट, खरेखोटे, भलेबुरे करण्याच्या कामी माणसाला विवेक मदत करत असतो आणि विवेक हा बुद्धीच्या पायावर उभा असतो. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा विवेक डळमळू लागतो.

आपली निर्भिडता, परखडपणा जगासमोर दाखवायला निखिल वागळे, कुमार केतकर यांच्यासारखे संपादक महेश भट, अमरापूरकर यांच्यासारखे कलावंत किंवा अन्य साहित्यिक, पत्रकार कुणाला धारेवर धरतात तेव्हा तो निकष त्यांनी प्रत्येकाच्या बाबतीत तेवढय़ाच कठोरपणे लावायला हवा. नरेंद्र मोदी भेटला किंवा आपल्याकडे पिस्तुल असते तर आपण त्याला ठार मारले असते, असे विजय तेंडुलकर यांनी म्हटल्यावर या सर्व शहाण्यांची दातखिळी बसली होती. त्यांना तसे म्हणायचे नव्हते, असली सारवासारव सुरू झाली होती. हा भ्रष्ट बुद्धीचा नमुना आहे. जयवंतरावांना आर.आर. आबा पाटलांना संपादकगिरीचा हिसका दाखवीत (आपण मंर्त्यांना घाबरत नाही असा) बोलणारा निखिल वागळे दर्डा नावाचा मंत्री असला मग फुसका बार होतो. हा सर्वात भयंकर भ्रष्टाचार असतो.

समाजात प्रतिष्ठित, मान्यवर, नावाजलेले लोक जेव्हा असे सोयीचे शिष्टाचार दाखवू लागतात तेव्हा लोकही त्यांचे अनुकरण करू लागतात. जशी माणसाची बुद्धी असते तसा समाजातला बुद्धिवादी-प्रतिष्ठित घटक ही समाजाची बुद्धी असते. ती भ्रष्ट झाली, विवेकशून्य वागू लागली मग आपोआप अवघा समाज राजरोस भ्रष्टाचार करू लागतो. आपल्या सोयीचा भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार तर आपल्या गैरसोयीचा शिष्टाचार तोच भ्रष्टाचार, अशी व्यवहारातील भाषा व व्याख्या बदलून जाते. गेल्या दोन दशकात पत्रकार, विचारवंतांनी मोठय़ा प्रमाणात या भ्रष्टाचाराची लागण केली; त्याचेच भीषण परिणाम आज आपण अनुभवत आहोत.

याचा एक पुरावा पुरेसा ठरावा. आजकाल प्रत्येक मोठी कंपनी, संस्था वा राजकीय पक्ष यांनी आपल्या यंत्रणेत मीडिया मॅनेजर हे पद निर्माण केले आहे. प्रसिद्धी हवी असेल तर त्या संस्था-संघटनांना याच मॅनेजर्सकडून त्याची पूर्वतयारी करून घ्यावी लागते. तमाम संबंधित पत्रकारांना आमंत्रण देण्यापासून त्यांची प्रवास, खाण्या-पिण्याची सोय करावी लागते. त्यातली देवाण-घेवाण बाजूला ठेवू. हे मीडिया मॅनेजर्स काय करतात? नावावरून लक्षात येते की ते आपल्या संस्था-यजमानासाठी मीडिया 'मॅनेज' करतात. याचा अर्थ मीडिया 'मॅनेज' केला जातो. मॅनेज करता येतो. ज्याला मॅनेज केले जाते तो स्वतंत्र, परखड, सडेतोड, निर्भिड कसा असू शकेल? अविष्कार स्वातंर्त्याचे झेंडे रात्रंदिवस खांद्यावर घेऊन फिरणार्‍यांनी याचे उत्तर द्यायला नको का? पत्रकारिता व माध्यमे स्वयंभू, निरपेक्ष असतील तर हे मीडिया मॅनेजर्स कशाला असतात?

तेवढेच नाही. पीआर कंपन्याही निघाल्या आहेत. त्या कंपन्या माध्यमे, वृत्तपत्रे यात बातम्या प्रक्षेपित वा छापून आणत असतात. बातम्या सुटसुटीत लिहून वृत्तपत्रांना पाठवत असतात. त्यामुळेच अनेकदा एकच मजकूर शीर्षक बदलून अनेक वृत्तपत्रांत छापून येतो. हे सर्व मॅनेज होते आणि मॅनेज झालेले आजचे सवाल विचारून विनाकारण आवेशपूर्ण अभिनय करीत असतात. तिथून भ्रष्टाचार सुरू होतो.

भारतीय समाजाची आज जी बौद्धिक घसरगुंडी झालेली आहे त्यातच भ्रष्टाचाराचा उगम आहे. माहिती देणार्‍या अधिकाराबद्दल खूप बोलले जाते, पण माहिती 'लपवण्याचा' विशेषाधिकार राबवला जातो त्याचे काय? राजेंद्र दर्डाच्या स्वीय सहायकाच्या धरपकडीवर लोकमत वृत्तपत्र वा वाहिनी मौन धारण करतात, हा शिष्टाचार आहे की भ्रष्टाचार? आपले पाप लपवणारा प्रत्येकजण सदाचारी असतो. भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायची जबाबदारी घेतलेलेच असा निर्ढावलेपणाने बौद्धिक वैचारिक भ्रष्टाचार करणार असतील तर सर्वसामान्य माणसाचे आदर्शच भ्रष्ट होऊन जातात ना? आज सर्वत्र बोकाळलेला जो भ्रष्टाचार दिसतो त्याचे मूळ म्हणूनच बौद्धिक भ्रष्टाचारात रुजलेले आहे. 

भाऊ तोरसेकर
मो. 9702134624

Sunday, 25 September 2011

मिडीया मुग़लों की नई सल्तनत में त्यागपत्रो का दौर

दिव्य भास्करने महाराष्ट्र के औरंगाबाद में बडे तामझाम के साथ अपना नया संस्करण शुरू तो किया, लेकीन अखबार शुरू होने के  चार-पांच महिनों के भीतर ही मिडीया मुग़लों की ईस नई सल्तनत में त्यागपत्रो का दौर चल पडा है.
दिव्य भास्करने महाराष्ट्र की पत्रकारिता में क्रांती लाने की बात की, लेकीन ऐसी क्रांती को लानेवाले प्रणेता भास्कर नहीं दे सका है. स्टेट एडिटर के तौर पर आसीन अभिलाष खांडेकर को केवल दिन काटने की पडी है, कुमार केतकर जैसे वरिय संपादक की भास्कर की इस "मदर एडीशन" में स्थानीय  तौर पर कोई भूमिका नहीं है. बाल ठाकरे के सामना से लाये गये धनंजय लांबे जैसे किं कर्तव्यविमूढ स्थानीय संपादक मातहतों को गालीगलौच के सिवाय और कुछ नहीं दे पा रहे है.
अजित वडनेरकर, जो की भाषाशास्त्री समझे जाते है ( और जिन्हे मराठी की गंध न होने पर भी "न्यूजरूम इंचार्ज" बनाया गया है) मराठी पत्रकारिता में कोई भी वास्तविक आदर्श बनाये बिना सपनों की पत्रकारिता की चाह में वृत्त संपादक, उप संपादक और अन्य कार्मिकों को देशभर से जमा किये गये कटू से कटू शब्दों में क्लास लेने के सिवाय कुछ कर नहीं पा रहे है. एक दिन बात तो इतनी बिगड गई की एक अनुवादक जैसे कनिष्ट कार्मिक ने अजित वडनेरकर की माथापच्ची से तंग आकर "तू कर के दिखा" कह डाला. ऐसे में और हो भी क्या सकता है? रोज रोज की उसी सरदर्दी से उबकर दिव्य भास्कर के साथ आये लोग निराशा हाथ लगने से अपने त्यागपत्र सौंप रहे है.
वितरण विभाग की आक्रमक मार्केटिंग के फल स्वरूप साल भर के लिये सबस्क्रिप्शन तो पा लिया, लेकीन जो वादे दिव्य भास्कर ने किये है, वो तो संपादकीय विभाग को पुरे करने है. इन वादों को पूरा कर सकनेवाली टीम अभिलाष खांडेकर नही चुन पाये है. अब हाल यह है की, स्थानीय संपादक से लेकर प्यून तक लोगों का जमावडा तो खडा हो गया लेकीन इसको ठीक से हांके कौन?अभिलाष खांडेकर अपनी कार से उतर कर केबीन में जाने तक और केबीन से निकल कर कार में घुसने तक ही कार्मिको के बीच होते है. आरई धनंजय लांबे इन दिनों उनका पुराना अखबार "सामना" में सीखी गई तिखी गालीयां बकने का अभ्यास कर रहे है. अर्थात उनको 
अजित वडनेरकर जैसे भाषाशास्त्री ट्यूशन न देते तो आश्चर्य था. ये भी ठीक! ऐसी बातें किसी भी संस्था मी होती रहती है. लेकीन ऐसी बाते उस संस्था में होना कतई लाजीमी नहीं है जिसे एक दुसरे राज्य में अपने संचार की नींव डालनी है. रमेशचंद्र अगरवाल, सुधीर अगरवाल और कंपनी के संचालको की खुशी के लिये एक के बाद एक
संस्करण शुरू कर "ऑल इज वेल" का चित्र बनाया जा रहा है, वह केवल एक झूठ है.
महाराष्ट्र की पत्रकारिता में इतिहास में पहली बार दिव्य भास्करने इतना उंचा वेतनमान दिया. दिव्य भास्कर की पत्रकारिता से अवगत कराने के लिये मराठी पत्रकारों को दी गई ट्रेनिंग भी तीन सितारा होटल में दी. औरंगाबाद के केंद्रवर्ती रोड जालना रोड पर काफी बडा और चकाचक ऑफिस दिया गया. सबसे महत्वपूर्ण बात, वेतन समय पर और शहर के अन्य किसी भी अखबार से पहले होने लगे.इतने सारे सुख मिलने पर भी लोग दिव्य मराठी को त्यागपत्र थमा रहे है -
आखीर क्यों?
क्या किया अभिलाष खांडेकर ने महाराष्ट्र में आकर? 
इसके लिये उत्तरदायी है अभिलाष खांडेकर की वह कमी जो उन्हें गलत स्थान पर गलत व्यक्ती को चुनने के लिये मजबूर कर देती है.
१. इन जनाब ने औरंगाबाद शहर की किसी भी गली का पता न होनेवाले, पुना से आये, आईएएस पद को पाने में असफल रहे देविदास लांजेवार नामक युवा को डीएनइ बना दिया.
२. रामोजी राव के ई टीवी से आये रुपेश कलंत्री को डीबी स्टार का जिम्मा थमा दिया - इन कलंत्री साहब की करतुत सिर्फ इतनी है की इनकी शिक्षा औरंगाबाद में हुई है और चमकूगिरी में माहीर है.
३. मुंबई की निवासी मृण्मयी रानडे जो की कामुक लिखावट में ज्यादा रुची लेती है उन्हें अब "मधुरिमा" का जिम्मा सोपा जायेगा.    
४. सबसे महत्वपूर्ण नियुक्ति जिसके लिये पुरी तरह से अभिलाष खांडेकर को उत्तरदायि नहीं माना जा सकता वह है धनंजय लांबे जैसे गैर-अनुभवी और मुंहफट व्यक्ति को आरई बनाना. आंख फोड दुंगा, टांग तोड दुंगा जैसे और अन्य कई शब्द जो लिखे नहीं जा सकते  को लोगों को सुनाना इनकी विशेषता है.     
५. रही सही कसर अजित वडनेरकर के न्यूजरूम इंचार्ज बनने से पुरी हुई है. इन जनाब को मराठी तो आती नहीं, लेकीन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भाषाशास्त्री होने से इन्हें चूप रहा भी नहीं जाता. दिव्य भास्कर के पुरे संस्करणो से खबरें चुनकर "भास्कर स्पेशल" नामक पन्ना बनाना इनकी मुख्य जिम्मेवारी है - बाकी समय में आरई धनंजय लांबे से स्तुतीसुमन लेना और अपनी आनेवाली किताबों की पंडूलीपी बनाने में गुजारते है.                           
इन सब बातों की बदौलत दिव्य मराठी को कार्मिक अलविदा कर रहे है, जिनमे अबतक शामिल है -  
१. सुशील कुलकर्णी -(डीबी स्टार थे, असल काम शुरू होने से पहले ही "पुण्यनगरी" में चले गये )
२. चंद्रकांत यादव  ( डीएनई थे, सकाळ में चले गये )
३. माधवी कुलकर्णी (उप संपादिका को यहां अनुवादक बनाया गया था, काम के बोझ से तंग आकर छोड गयी)
४. यशवंत कुलकर्णी  (अनुवादक थे, अजित वडनेरकर की भोपाली गालीगलौच को कडा जवाब देने से त्यागपत्र देने के लिये बाध्य किया गया, वेबदुनिया इंदौर को चले गये)
५. आरती जोशी ( कल्चरल खबरें देखती थी, अब लोकमत में जाने की खबर है)
और भी लोग छोडने की ताक में है, लेकीन उनके नाम देना सही नहीं होगा.
इन सब बातों को केवल इसलिये लिखा गया है की महाराष्ट्र में जो पत्रकारिता का नया दौर शुरू होने जा रहा था, वह चंद लोगों की नालायकी के कारण एक अव्यवस्था में बदल गया. दिव्य भास्कर प्रबंधन के धन के निवेश के बतौर जो नौटंकी चल रही है वह रुके, अब भी समय है.

शांतकुमार मोरे सोलापूर पुढारीत रूजू होणार; अभय दिवाणजींची पर्यायी शोध मोहीम सुरू


सोलापूर -लोकमत  सोडल्यापासून( की काढल्यापासून? ) ‘बस’  खात्यात असणारे शांतकुमार मोरे ‘पद्मश्रीं’ चे ‘पुढारी’  होणार असून ते लवकरच सोलापूर कार्यालयात रूजू होणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. दरम्यान, ‘मीच सोलापूरचा पुढारी’  अशा तो-यात वावरणारे आवृत्तीप्रमुख अभय दिवाणजी हे अन्य पर्यायाच्या शोधात असल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या थकबाकीमुळे  ‘पद्मश्री’  सोलापूर कार्यालयाच्या कामकाजावर नाखूष होते.  त्यातच दिवाणजी व चौधरी यांच्यातील शीतयुध्दाच्या अनेक तक्रारी कोल्हापूरपर्यंत पोहचल्या होत्या. हेमंत चौधरी हे ‘पद्मश्रीं’ चे जुनेजाणते सहकारी असून त्यांचे ‘ फॅमेलीमेंबर’  म्हणून ओळखले जातात.  मात्र दिवाणजींनी  पुढारीच्या सोलापूर कार्यालयात रूजू झाल्यापासून चौधरींच्या साम्राज्याला सुरूंग लावला होता. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नव्हता.
 या पाश्र्वभूमीवर दिवाणजींना धक्का देण्याची खलबते कोल्हापुरात चालली होती. दरम्यानच्या काळात  लोकमत सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक  शांतकुमार  मोरे   लोकमतमधून बाहेर पडले.(लोकमतने त्यांना काढले  की त्यांनीच लोकमतला सोडले हे लोकमत आणि मोरे यांनाच माहित) त्यामुळे ते निवांतच होते. त्यातच सोलापूर लोकमतमधील त्यांचे एकेकाळचे वरिष्ठ अरूण खोरे पुणे पुढारीत दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून(व्हाया चौधरी) मोरे ‘पद्मश्रीं’ च्या कोल्हापुरात पोहचले.  ‘पद्मश्रीं’ नी मोरे यांना सोलापूर पुढारीचे निवासी संपादकपद दिले असून ते १ ऑक्टोबर रोजी सोलापूर कार्यालयाचा पदभार स्विकारणार असल्याची खबर ‘बेरक्या’ पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, मोरे हे एकेकाळचे दिवाणजींचे लोकमतमधील वरिष्ठ असूनही त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे दिवाणजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळचे लोकमतचे ‘बॉस’  मधुकर भावे यांच्या वशिल्याने ‘डी.एम.’  च्या संपर्कात असल्याची चर्चासुध्दा सोलापुरात  सुरू झाली आहे.

Friday, 23 September 2011

राजेंद्र दर्डांच्या पीएला लाच घेताना अटक

मुंबई -नाशिक येथील एका इंग्रजी शाळेला परवानगी देण्याच्या बदल्यात 65 हजार रुपयांची लाच घेताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा स्वीय सहायक आणि त्यांच्या कार्यालयातील इतर दोन कर्मचार्‍यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दर्डा यांच्या दालनातच गुरुवारी ही धडाकेबाज कारवाई केली. या घटनेमुळे मंत्रालय कर्मचार्‍यांसह राजकीय वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजेंद्र दर्डा यांचे स्वीय सहायक दीपक रामचंद्र कारंडे, सहायक प्रशांत दादासाहेब अंधारे आणि लिपिक प्रवीण कचेश्वर बोडके अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, गुरुवारी संध्याकाळी मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या दर्डा यांच्या दालनात त्यांना पकडण्यात आले. नाशिक येथील एका शिक्षण संस्थेची सातवीपर्यंत शाळा आहे. त्याला जोडूनच इंग्रजी माध्यमाच्या आठवी ते बारावीपर्यंतच्या तुकड्यांची कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळा सुरू करण्यासाठी संस्थेच्या सचिवांनी 2010-11मध्ये शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली होती. परंतु शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून पूर्तता करण्यास संस्थेला कळविले. त्यानुसार संस्थेने त्रुटींची पूर्तता करून अहवालही सादर केला होता. मात्र, मान्यतेची फाईल दाबून ठेवण्यात आली.

परिणामी संस्थेच्या सचिवांनी शिक्षण विभागातील सहायक अंधारे यांची भेट घेतली. त्यांनी प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम देण्यास सचिवांनी नकार दिल्याने तडजोडीअंती अंधारे यांना 30 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील 15 हजार रुपये अंधारे यांना देण्यातही आले. त्यानंतर हे काम आपल्या पातळीपर्यंतच असून प्रस्ताव पुढे जाण्यासाठी शिक्षणमंत्र्यांचे स्वीय सहायक कारंडे यांच्याशी बोलून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यानंतर अंधारे यांनी संस्थेची फाईल तपासून शिक्षक सूची मंजुरीची पूर्तता करण्यास सांगून परत येताना
उर्वरित 15 हजार रूपये आणण्याचे बजावले. कारंडे यांनी प्रस्तावाची फाईल पुढे पाठविण्यासाठी 90 हजार रूपयांची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये मागितले होते. त्यावर संस्थेच्या सचिवांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात दर्डा यांच्याच कार्यालयात सापळा रचला. यावेळी अंधारे यांनी लाचेची रक्कम प्रविण बोडके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीण यांनी 15 हजार रूपये स्विकारले, तर कारंडे यांने 50 हजार रूपये स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या तिघांनाही रंगेहात पकडले.

उर्वरित 15 हजार रूपये आणण्याचे बजावले.

कारंडे यांनी प्रस्तावाची फाईल पुढे पाठविण्यासाठी 90 हजार रूपयांची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये मागितले होते. त्यावर संस्थेच्या सचिवांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात दर्डा यांच्याच कार्यालयात सापळा रचला. यावेळी अंधारे यांनी लाचेची रक्कम प्रविण बोडके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीण यांनी 15 हजार रूपये स्विकारले, तर कारंडे यांने 50 हजार रूपये स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या तिघांनाही रंगेहात पकडले.

पीए कारंडे दर्डांचा खास माणूस  

राज्यात ज्या ज्या वेळी दर्डा कटूंबीय सत्तेत सहभागी झाले. त्या प्रत्येक वेळी दीपक कारंडे त्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करीत असे. अन्य स्वीय सहायकांपेक्षा कारंडे हे दर्डांच्या खास विश्वासातील होते, अशी चर्चा मंत्रालयात एकावयास मिळत होती. 
 दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे
 
काल रात्रीपासून मी औरंगाबादच्या दौर्‍यावर आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी वर्षानुवर्षे सुरू आहेत त्याविरुद्ध मी आणि माझा विभाग सातत्याने काम करत आहे. आज घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिसांच्या तपासात संपूर्ण सत्य बाहेर येईल. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 

राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री

Thursday, 22 September 2011

शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पीएला लाच घेताना रंगेहात पकडले

मुंबई. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा पी.ए. दीपक करांडे याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. करांडे हा ६५ हजारांची लाच स्वीकारताना चतुर्भुज झाला आहे. शिक्षण विभागातील अन्य एका कर्मचा-यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एज्युकेशन सोसायटीला काही गोष्टींची मान्यता हवी होती, त्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आली होती. सोसायटीने लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दर्डा यांनी व्यक्त केली आहे. 'मी काल रात्रीपासूनच औरंगाबादेत असल्याने मला अधिक माहिती नाही. माझ्या पीएबद्दल आजपर्यंत मला कधीही मनात शंका आली नाही', असे दर्डा यांनी म्हटले आहे.

भारतकुमार राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार

मुंबई - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. माधवराव अंभोरे यांनी आज येथे केली. ९ ऑक्टोबर रोजी वासिम येथे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे परिषदेच्या प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार खा.भारतकुमार राऊत यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्रात आला आहे. दैनिक देशोन्नतीने हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, पां.वा.गाडगीळ पुरस्कार सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, ग.त्र्य. माडखोलकर पुरस्कार देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले, आचार्य अत्रे पुरस्कार सामनाचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अरुण निगवेकर यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार आय.बी.एन.चे औरंगाबाद ब्युरो चीफ संजय वरकड यांना, उद्योगपती रावसाहेब गोगटे पुरस्कार ‘लोकमत’ चे संगमेश्वर येथील पत्रकार जे.डी.पराडकर यांना, कृषीवलकर प्रभाकर पाटील स्मृती पुरस्कार माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना, तर सावित्रीबाइ फुले पुरस्कार स्टार माझा च्या नागपूर ब्युरो चीफ सरिता कौशिक यांना जाहीर करण्यात आला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश डहाके, आमदार सुभाष झनक, आमदार लखन मलिक, माहिती संचालक श्रध्दा बेलसरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, वाशिम नगरपालिकेचे अध्यक्ष अशोक हेडा आदी उपस्थित राहणार आहेत.वाशिम येथे होणा-या या कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संख्यंने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे किरण नाईक यांनी केले आहे.

Monday, 19 September 2011

‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग हवे’ दिव्य मराठीने पाजळले अकलेचे दिवे

दैनिक दिव्य मराठीने 17 सप्टेंबरच्या मुहुर्तावर ‘हैदराबाद मुक्तीलढा आणि मराठवाडा’ या नावाने एक कॉफीबुक (टपरीवर काचेच्या गिल्लासात कट चहा पिणार्‍या आम्हा मराठवाड्यातील जन्तेला कॉफी कशी माहिती असणार? कॉफीबुक म्हणजे काय ते कसे कळणार?) प्रकाशित केले. मराठवाडी जनतेच्या भावनांना हा विषय नेहेमीच हात घालणारा आहे. मराठवाडी अस्मितेला चुचकारताना मात्र ‘दिव्य मराठीकारांनी’ ज्या असंख्य चुका करून ठेवल्या आहेत, त्या पाहता ‘दिव्य मराठी’चे मार्केटिंग करताना त्यांनी काहीच तारतम्य बाळगलेले नाही, असेच स्पष्ट होते आहे.
1) या ‘कॉफीटेबल बुक’च्या मुखपृष्ठावरील शीर्षकापासूनच चुकांना सुरवात झाली आहे. ‘हैदर अलीने आबाद केलेले ते हैदराबाद’ असा संदर्भ असताना इथे तो शब्द चक्क ‘हैद्राबाद’ असाच आला आहे. हे ‘हैद्रा’ कोण? ही चूक आतील पानांवर मात्र दुरूस्त झालेली दिसते!
2) ‘स्टेट एडिटर’ हे पद भूषविणारे श्री. अभिलाष खांडेकर यांना भारताचा नकाशा वाचता येत नसावा. त्यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी लिहिलेल्या प्रस्तावनेत हैदराबाद संस्थानाचा ‘देशातील हा असा एक कोपरा होता, जो निजामाच्या जोखडातच राहिला’ असा उल्लेख केला आहे. कोणत्या अर्थाने हैदराबाद संस्थान ‘कोपरा’ ठरते?
3) ‘आपण खेकड्याची वृत्ती स्वीकारल्याने मुक्तीलढ्याचे स्मारक अद्याप होऊ शकले नाही, हे एक कारण हे पुस्तक लिहिण्यामागे आहे’ (‘कॉफीटेबल बुक’ - प्रकरण पहिले - पृष्ठ 13) असे एक वाक्य यात आहे. यामधील ‘आपण’ म्हणजे कोण? मराठवाड्यातील जनता हे पुस्तक लिहिते आहे का?
4) ‘पर्यटनाचे वा पेंग्विन नॅशनल जिऑग्राफीचे आकर्षक प्रत्येक पान ग्लॉसी. सुंदर छायाचित्रांसह असावे, जेणेकरून लोक कुतुहलापोटी पाहतील, त्याची जास्त जाहिरात होईल. तरुण पिढी, परप्रांतीय व मराठवाड्याबाहेरील लोकही हे पुस्तक चाळतील ही देखील एक कल्पना. अगदीच व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले तर ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग वा ब्रँडिंग होईल.’ इथे ‘दिव्य मराठी’ नेमके कशाचे मार्केटिंग करू पाहत आहे? मुक्तीसंग्रामाचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले तर नेमके कोणाचे आणि काय भले होणार आहे? अण्णा हजारेंच्या आंदोलनात कुठलेही मार्केटिंग व ब्रँडिंग नसताना उत्स्फुर्तपणे लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी तरुण पिढी ‘दिव्य मराठी’च्या मार्केटिंगमुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे आस्थेने बघेल, असे त्यांना वाटते! जणू हे दैनिक नसल्याने आजवर मुक्तीलढ्याची काहीच माहिती जनतेला झाली नव्हती!
5) या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्रमांक 14 वर ‘का हा अन्याय? याचं कारण एकच की याचं मार्केटिंग स्टेट, राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे कधी झालंच नाही. ते व्हावे म्हणून हा प्रपंच.’ ... ‘माझ्या मते मुक्तीलढ्याला प्रसिद्ध तंत्र नसल्याने या लढ्याबद्दल अधिक माहिती पुढे यावी’ या वाक्यांचा अर्थ काय? पहिले संपूर्ण प्रकरण अशा अनेक विसंगत व अप्रस्तुत विधानांनी भरलेले आहे. 
6)  या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्र. 15 वर ‘गोविंदभाई श्रॉफ यांनी सोशालिस्ट (समाजवादी पक्ष) पार्टी काढली.’ असा उल्लेख आहे. खरं तर गोविंदभाईंनी काढलेल्या पक्षाचे नाव ‘लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स’ असे आहे. याच पानावर पुढे असे म्हटले आहे, की ‘स्वातंत्र्यसैनिकांचे सत्तेतील व सत्तेबाहेरील असे समाजवादी विरुद्ध कॉंग्रेस असे गट पडले. त्यांनी एकमेकांकडे, त्यांच्या मुक्तीसंग्रामातील कामगिरीकडे दुर्लक्ष केले. मात्र, गोविंदभाई श्रॉफ हे टॉवरिंग पर्सनॅलिटी असल्यामुळे व नंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यर्‍त झाल्यामुळे नेहेमी चर्चेत व पुस्तकात राहिले. इतर मात्र तेवढे राहिले नाहीत.’ या वाक्यातून दिव्य मराठीच्या विद्वानांना आपले नेमके कुठले ज्ञान पाजळायचे आहे? सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत पार आधीपासून गोविंदभाई सक्रीय होते. आणि दिव्य मराठी मात्र ते नंतर कार्यरत झाल्याचे सांगते!
7) या ‘कॉफीटेबल बुक’च्या दुसर्‍या प्रकरणातील दुसर्‍याच ओळीत ‘14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले’ म्हटले आहे. यापुढे ‘नकाशात पाहा’ असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात नकाशात पाहिल्यानंतर तेथे मात्र 15 जिल्हे नोंदविलेले दिसतात. नकाशातील एकूण जिल्हे तीन पाने मागे आल्यानंतर 1 ने कमी होतात, ही जादू कुठल्या स्टॅटिस्टिक्सचे द्योतक आहे? यापुढे या दैनिकाने उपसंपादक, प्रुफरीडर, आर्टिस्ट यांच्याबरोबरच एक ‘स्टॅटेस्टिशियन’ही नेमायचा का?
8) या एकंदर 122 पानी पुस्तकात अक्षरशः पानोपानी चुका आहेत. केवळ वानगीदाखल वरील उल्लेख केलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचे या लढ्यावरील मूळ पुस्तक ‘हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणी’ याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. अखेरच्या पानावर दिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या यादीतही. या लढ्याच्या सेनापतीने लिहिलेल्या पुस्तकाचीही दखल दिव्य मराठीला घ्यावीशी वाटली नाही. बहुधा स्वामीजींचे ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’ कमी पडले असावे!
9) हे संपूर्ण पुस्तक मराठीत लिहिले गेले आहे. (यातील काही इंग्रजी शब्दही - उदा. : ‘शो’, ‘टॉवरिंग पर्सनॅलिटी’, ‘ग्लॉसी’, ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’, ‘ऑप्शनला’, ‘पोलिस ऍक्शन’ इ. - देवनागरी लिपीतच लिहिले गेल्याने या पुस्तकाला मराठीतील पुस्तकाचा दर्जा देण्यास हरकत नाही. पण सहाव्या पानावर ‘प्रोजेक्ट टीम’ अशा इंग्रजी शीर्षकाखाली ‘प्रोजेक्ट कोआर्डिनेटर - वृषाली घाटणेकर, रिसर्च - डॉ. महेश सरवदे, एडिटोरियल टीम - रमेश धाबे, प्रवीण देशपांडे, रोहन पावडे, शरद काटकर, बाबासाहेब डोंगरे, सय्यद नजाकत, दिनेश लिंबेकर, फोटोग्राफी - किशोर निकम, माजीद खान आणि डिझाईन व छपाईवाला अशी सर्व नावे शुद्ध इंग्रजीतून दिली आहेत. हे का म्हणून बरे? पान 5 वर या वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष अग्रवालसेठ स्वतः आपले मनोगत ‘लढवय्यांबद्दल कृतज्ञता’ मराठीत व्यक्त करतात. पण इतरांना इंग्रजीचा आधार का घ्यावासा वाटतो? अशामुळे हे पुस्तक - सॉरी कॉफीटेबल बुक - इंटरनॅशनल दर्जाचे होईल, असे वाटते का?
या ‘कॉफीटेबल बुक’ला ‘महात्मा गांधी मिशन’ या संस्थेने प्रायोजित केले आहे. यात काय व्यवहार झाला, याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. पण जेव्हा या संस्थेचे सचिव अं. ना. कदम आपल्या छायाचित्रासह या ‘कॉफीटेबल बुक’च्या सातव्या पृष्ठावर ‘स्मरण हुतात्म्यांचे’ व्यक्त करतात, तेव्हा या पुस्तकात काय छापून येते आहे या विषयीही त्यांनी तज्ज्ञांकरवी खातरजमा करून घ्यावयास हवी होती. दान सत्पात्री पडावे, असे थोरामोठ्यांनीच सांगून ठेवले आहे...!
- एक जागरूक वाचक

Sunday, 18 September 2011

‘बाजीराव सिंघम’रुपी कृष्णप्रकाश

राजकारणातल्या गुन्हेगारांची अवस्था काय होते ते दाखवतोच...‘अभी के अभी’, ‘सबको सिधा करूंगा ...अभी के अभी’...‘आता माझी सटकलीय... गुंडांच्या आईच्या गावात...आली रे आली... आता माझी बारी आली... जिस में है दम... तो फक्त कृष्णप्रकाश सिंघम...आता कृष्णप्रकाशची सटकलीय, आली रे आली आता गुंडांची बारी आली...! पुलिसवाले अगर तय करे तो कोई मंदिर के सामनेसे चप्पल भी नही चुरा सकता,’. ‘सिंघम’ सिनेमात अजय देवगणच्या तोंडातून बाहेर पडणारे हे हिंदी डायलॉग आणि सिनेमाची स्टोरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्हावासीयांच्या चर्चेचा विषय झालीय. अनेकांच्या मोबाईलवर गेल्या दोन दिवसात अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड होऊ लागलेेत. नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी कृष्णप्रकाश प्रसाद नावाचा ‘सिंघम’ पुढे आलाय. नगरकरांनी त्यांना डोक्यावर घेतलंय. सामान्य नगरकरांच्या अपेक्षा आता वाढल्यात. या अपेक्षांना तडा जाणार नाही याची काळजी नगरकरांना सापडलेल्या ‘बाजीराव सिंघम’रुपी कृष्णप्रकाश यांना घ्यावी लागणार आहे. वाचा दैनिक देशदूत रविवार शब्दगंध पुरवणी (दि. १८ सप्टेंबर २०११)
 http://www.deshdoot.com/enewspaper.php?region=Ahmednagar&date=&id=11323

क्षण एक पुरे ‘प्रेमा’चा... मजनू होतो प्रेम‘दासा’चा...


पेपरवाल्यांनी पेपर काढून विकण्याबरोबरच इतर अनेक उद्योग सुरू केल्याने वृत्तपत्रांच्या कचेरीमध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची बरीच भाऊगर्दी (आणि बहिणगर्दी) दिसू लागली आहे. एकेकाळी युवामंच असत. आता सख्यांचे मंच असतात. व्यापार्‍यांचे मंच असतात. उद्योगांचे मंच असतात. वाचक सोडून सगळ्यांचेच मंच असतात. (वाचक आपले ‘मुकी बिचारी कुणीही हाका’टाईप असतात. मध्येच ‘मर्जी’ जाणून घेण्याची उबळ काही जणांना येते. पुन्हा सारे काही शांत शांत)

तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्‍या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.

Tuesday, 13 September 2011

स्मार्ट मित्रच्या नावाखाली मंत्र्याला घातली टोपी

उस्मानाबाद - मुंबई,पुणे पाठोपाठ आता नशिकमध्ये सुरू झालेल्या स्मार्ट मित्र पेपरच्या एका वार्ताहराने काँग्रेसच्या एका मंत्र्याला कशी टोपी घातली,याची रसभरीत चर्चा उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्यात चालू आहे.
या वार्ताहराला उस्मानाबाद शहर व जिल्ह्यात शेठजी म्हणून संबोधले जाते.पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना कार्यक्रमाच्या नावाखाली अधिकारी, पुढा-यांना कसा गंडा घातला याचे किस्से अजूनही चर्चेत असताना, चक्क स्मार्ट मित्रच्या नावाखाली काँग्रेसच्या एका मंत्र्याला त्याने कशी टोपी  घातली,याचा किस्सा या मंत्र्याचे पीए असलेले तुळजापूरचे जाधव चांगल्या प्रकारे सांगू शकतात.
घडले असे की,काँग्रेसचे युवराज  राहूल गांधी हे सहा महिन्यापुर्वी उस्मानाबादच्या दौ-यावर आले होते.त्यावेळी काँग्रेसच्या एका मंत्र्याने स्मार्ट मित्र पेपरला १ लाख २० हजार रूपयाची जाहिरात दिली होती.या जाहिरातीची रोख रक्कम या मंत्र्याच्या पी.ए.ने या शेठजीकडे दिले होते.गंमत अशी की, ही जाहिरातच स्मार्ट मित्रमध्ये प्रसिध्द झाली नाही.नंतर या मंत्र्याच्या पी.ए.ने जाहिरात आली नाही म्हणून १ लाख २० हजार रूपये रक्कम परत मागितली असता,त्यांनी मी डी.डी.करून पेपरकडे पाठविला आहे, थोडे थांबा म्हणून दोन महिने घालविले.दोन महिन्यानंतर या पी.ए.बरोबर बाचाबाची झाल्यानंतर त्याने ४० हजार रूपये काढून दिले.नंतर चार महिन्यांनतर मोठा राडा झाल्यानंतर परत ४० हजार दिले.आता उर्वरित ४० हजार रूपये देण्याचे नाव काढल्यानंतर हे शेठजी म्हणतात, माझ्याकडे तीन - चार पेपर असून,माझ्या मागे पाच - सहा पत्रकार आहेत, तुमच्या साहेबांच्या बातम्या फुकट छापायच्या का, असा उलटा दम देत आहेत.कंटाळलेले जाधव ...साहेबांनाही सांगू शकत नाहीत व शेठजीबरोबर जास्त पंगाही घेवू शकत नाहीत, कारण उलट - सुलट बातम्या छापण्याचा खानदानी पेशा या शेठजीचा चालू आहे.
औरंगाबादच्या शेठजीच्या पेपरमध्ये या शेठजीचे बंधुराज जिल्हा प्रतिनिधी होते.परंतु बंधुराजचे सर्व काम तेच करायचे.वाशी तालुक्यातील इंदापूरच्या मुंबई निवासी एका उद्योगपतीला विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी पुरवणीच्या नावाखाली कसे फसविले याची किर्ती पार ऋषीबाबूपर्यंत पोहचली,तेव्हा राजेंद्र बाबूजींनी पोसलेल्या या उस्मानाबादच्या बाबूजीला त्यांनी झटक्यात दूर करून विशाल निर्णय घेतला.नंतर उस्मानाबादचे हे बाबूजी कोल्हापूरच्या पद्मश्रीकडे गेले व आपण महाराष्ट्राच्या मानबिंदूची अख्खी टीप फोडतो, संपूर्ण जाहिरात व्यवसाय तुमच्याकडे वळवितो अशी खोटी आश्वासने देवून, वार्ताहरपद मिळविले.परंतु पद्मश्रीची औरंगाबाद आवृत्तीच सुरू न झाल्यामुळे बाबूजींचा व त्यांच्या शेठजी भाऊचा चेहरा पार काळवंडला आहे.
पत्रकार संघाचे अध्यक्षपद गेल्यामुळे तसेच महाराष्ट्राचा मानबिंदू हातचा गेल्यामुळे शेठजीची सद्दी संपली असून, त्यामुळेच  सोलापूरच्या एका रद्दी पेपरचेही त्यांनी काम  सुरू केले आहे.ढापाढापीत मास्टर माईंड असलेल्या शेठजीच्या मागे आता कोणतेही पत्रकार पाठबळ देत नसल्यामुळे त्यांनी इतर पत्रकारांच्या खोट्या तक्रारी खोटया तक्रारदाराच्या नावे पाठविण्याचा कुटीरउद्योग सुरू केला आहे.अशाच भानगडीमुळे उस्मानाबादच्या काही पोरांनी त्यांना त्यांच्या दुकानातच चांगलेच ठोकले होते.अनेकवेळा काहींना काही कारणामुळे मार खालेल्या या शेठजीच्या असंख्य भानगडी आमच्याकडे उपलब्ध झाल्या असून,त्या यथाअवकाश प्रसिध्द करू...

ता.क. - एका पत्रकार परिषदेत बूट चोरीला गेल्यानंतर संयोजकाकडून ९०० रूपये कसे वसूल केले, सोलापूरच्या लोकमंगलने उस्मानाबादच्या पत्रकारांसाठी पाठविलेल्या तुपाचे डबे कसे एकट्याने हाणले, रांजनीच्या कारखान्याने  पत्रकारांसाठी पाठविलेली साखर कशी गिळंकृत केली, याचा सविस्तर पंचनामा लवकरच.... 

Sunday, 11 September 2011

बोरुबहाद्दरांनी तोडले अकलेचे तारे ...

अकलेची ठेकेदारी जणू आमच्याकडेच असल्यासारखे मुंबई- पुण्यातील बोरुबहाद्दर विद्वान वागत आलीय. तीन हजार लोकसंख्येच्या छोट्याशा गावातील अण्णा हजारे नावाचा छटाक माणूस देशपातळीवर चमकू शकतो हेच या तथाकथीत बोरुबहाद्दर विद्वानांना खटकले. अण्णांच्या रुपातील मराठी माणसानं दिल्लीचं तख्त हलवलं. आंदोलनाच्या यशाचे श्रेय अण्णा आणि त्यांच्या टीमने मिडियाला दिलं असताना या आंदोलनाबाबत साशंकतेचे वातावरण तयार करण्याचा नतद्रष्टपणा काही मराठी भाषिक पत्रकारांनी केला. अण्णांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोकशाही, संसदेला आव्हान दिेल्याची चुकीची चर्चा सोयीस्करपणे पसरविण्यात आली. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशामध्ये जाणिवा निर्माण करणारे आंदोलन जयप्रकाश यांच्यानंतर अण्णांनी केलं असताना महाराष्ट्रातील हे नतद्रष्ट बोरुबहाद्दर सरकारी तळी उचलण्याचं काम सोयीस्कपणं करीत आली. अवास्तव, अनावश्यक बातम्यांमुळे लोकांच्या नजरेतून उतरलेला ‘हिंदी मिडीया’ अण्णांच्या जनाआंदोलनास ताकद देऊन गेला. दुसरीकडे दूरचित्रवाहिन्यांवरील काही ‘मराठी चॅनल्स’ अण्णांच्या आंदोलनात विघ्न आणण्याचं पाप करीत राहिली. सर्व न्यूज चॅनल्सवर अण्णांचा जयजयकार. विरोधी पक्षही जनभावनेची दिशा लक्षात घेऊन आपली वाटचाल ठरवू लागला असताना अण्णा विरोधी भूमिका घेणार्‍या या बोरुबहाद्दरांचे कारस्थान यशस्वी होऊन त्यांचे नतद्रष्ट विचार लोकांच्या गळी उतरण्याची सुतराम शक्यता नाही. चाटूगिरी करणार्‍या काही बोरुबहाद्दरांकडून या आंदोलनाला उगाचच अण्णा विरुद्ध संसद असा रंग देण्याचा धुर्त प्रयत्न सुरु आहे. सामान्य माणूस भोळा असला, तरी तो मूर्ख नाही. लोकांमध्ये आत्ता कुठे आपल्या लोकशाही हक्कांबद्दल जाणिव निर्माण होऊ लागली आहे. ही जाणिवच भ्रष्ट नेत्यांच्या नजरेत खुपत असताना तथाकथीत बोरुबहाद्दरांनाही त्याचीच लागण झाली की काय अशी शंका व्यक्त होते. खरं तर नागरी आणि ग्रामीण भागात दरी वाढविण्याचे काम मुंबई-पुण्यातील काही बोरुबहाद्दर अक्कलवंत प्रामाणिकपणे करीत आलेत. अण्णांच्या आंदोलन काळात आणि आंदोलनानंतर या बोरुबहाद्दरांनी अकलेचे तारे तोडले. लोकमान्य लोकशक्ती म्हणवून घेणारा लोकसत्ता काय अन् महाराष्ट्र टाईम्स काय?
वाचा दैनिक देशदूत रविवार (दि. ११ सप्टेंबर) शब्दगंध पुरवणी
www.deshdoot.com

Saturday, 10 September 2011

"डोंगराएवढा माणूस"

एका आयुष्यात माणसाने काय काय करायचे... किंबहुना तो काय काय करू शकतो...

करा विचार..
प्रत्येकाला वाटेल अमुक करेल, कोणी म्हणेल तमुक करेल.. कोणी म्हणेल अरे आता तर घर आणि नोकरी सोडून दुसरे काही कोणी करेल का?? 

पण एकाचा वेळी अनेक विषयात गती असणारा..त्या सा-याच विषयावर भरभरून लिहणारा. असा एक माणूस होता...त्या सा-या गोष्टींचा मनस्वी आनंदपण घेणारा होता.. इतकेच नाही तर सहभागी होणारादेखील होता...... हो होता कारण 

प्रो. रमेश देसाई गेले.. 
एका आयुष्यात या माणसाने काय काय करावे 

गिर्यारोहण, पर्यावरण, विज्ञान, संगीत, गोवा मुक्ती संग्राम, पश्चिम घाट बचाव मोहीम वैगरे. या माहितीत आज नव्याने भर पडली ती म्हणजे कामगार चळवळ... म्हणूनच म्हणतो हे मला माहित असलेले... त्याशिवाय आणखीन अजून किती ठिकाणी काय काय योगदान दिले परमेश्वरालाच माहित... .



प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन व्यासंग, प्रचंड भटकंती आणि या सर्वामुळे प्रचंड असे अभ्यासू लेखन... अक्षरश: डोंगराएवढे.. पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बरेच छापले गेलंय ..पण मला वाटते अजून तेवढेच छापता येईल इतके लिखाण शिल्लक आहे त्यांचे. 

ट्रेकर्स सह्याद्री 
नकाशा रेखाटन हा तर सरांचा सर्वात महत्वाचा असा पैलू म्हणावा लागेल. तुम्हाला संपूर्ण सह्याद्रीचा ट्रेकर्स नकाशा पहायचा आहे... हे कमी म्हणून कि काय महाराष्ट्रात किल्ले कोठे कोठे आहेत याचा नकाशादेखील सरांनी बनवला...सह्याद्रीतल्या भटक्यांच्या वाटा, घाट रस्ते नोंदवले ते देखील ५० - ६० च्या दशकात.. आजही हे सारे तुम्हाला ट्रेसिंग पेपरवर पाहायला मिळेल.
तेव्हा काहीच नव्हते हो उपलब्ध.. आज काय एका किल्ल्याचे ट्रेकचे नाव टाकले ढिगाने लिंक्स मिळतात..... पण तेव्हा तसली सोय नव्हती.. सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे घ्यायचे आणि डोंगरात जायचे... मग आल्यावर विस्तृत नोंदी.. आजकाल अशा नोंदी दुर्मिळच झाल्यात... उरले आहेत फक्त फेसबुकचे स्टेटस 

'दिव्य मराठी'च्या जळगाव आवृत्तीचे शानदार लोकार्पण

जळगाव - औरंगाबाद, नाशिक वाचकांशी दृढ नातं प्रस्थापित केल्यानंतर दैनिक 'दिव्य मराठी'च्या जळगाव आवृत्तीचा लोकार्पण सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि असंख्य जळगावकरांच्या साक्षीने झाला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. औरंगाबाद, नाशिकनंतर भास्कर समूहाची देशातील ही ६४ वी आवृत्ती आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ईश्वरलाल जैन, उद्योगपती आणि पद्मश्री भवंरलाल जैन, पद्मश्री आणि कविवर्य ना. धों. महानोर, दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी -
सुनील तटकरे (राज्य जलसंपदा मंत्री)

स्वातंत्र्य काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांनी मोलाची भूमिका बजावली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेने लोकशाहीचे अन्य तीन आधारस्तंभ डगमगू नये, याकडे लक्ष दिले. 'दिव्य मराठी'च्या माध्यमातून शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी. राजकारणातील भूमिकाही वृत्तपत्राने जनतेसमोर स्पष्टपणे मांडावी. जळगावबरोबर आता कोकणात आणि त्यातही रायगडमध्ये 'दिव्य मराठी' लवकरात लवकर सुरू करावा.

वृत्तपत्रांमध्ये मोकळी स्पर्धा हवीच - एकनाथ खडसे (विधानसभा विरोधी पक्षनेते)

जळगावमधील वाचकांना सातत्याने नवं काहीतरी हवं आहे आणि ते 'दिव्य मराठी' नक्की देईल. निर्भीडपणे पत्रकारिता करताना समाजातील सगळ्या समूहांना बरोबर घेतले पाहिजे. शेतक-यांना यामध्ये विशेष महत्त्व दिले पाहिजे. वाचकांच्या विश्वासाहर्तेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ देऊ नये. वृत्तपत्रांमध्ये मोकळी स्पर्धा निश्चितपणे असायला हवी.

जळगावमधील रखडलेले प्रकल्प ४-५ वर्षांत मार्गी लावू - गुलाबराव देवकर(जळगावचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री)

'दिव्य मराठी'मुळे आशेचा किरण जळगावकरांना मिळाला आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला जाईल. येत्या ४-५ वर्षांत जळगावमधील  रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू. अतिवृष्टीने खान्देशातील कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये  शेतकऱयांना मदत देण्यामध्ये राज्य सरकार नक्की लक्ष घालेल.

'दिव्य मराठी'नेच जळगावकरांच्या दिवसाची सुरुवात व्हावी - हरिभाऊ जावळे (लोकसभा खासदार)

'दिव्य मराठी'च्या माध्यमातून शेतकऱयांना मार्गदर्शन केले गेले पाहिजे. दिल्लीमध्ये अधिवेशन काळात मुक्काम असताना आमच्या निवासस्थानी पहाटे सर्वांत पहिले 'दैनिक भास्कर' हेच वृत्तपत्र येते. त्याप्रमाणे जळगावातही सूर्याच्या पहिल्या किरणासोबत 'दिव्य मराठी' यावा आणि जळगावकरांच्या दिवसाची सुरुवात व्हावी. जळगाव शहरासोबत जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. वृत्तपत्रातून नात्यागोत्याची विचारधारा व्यक्त होऊ देऊ नये.

नवं स्वीकारणं हा जळगावकरांचा छंद - ईश्वरलाल जैन(जैन उद्योगसमुहाचे अध्यक्ष)

नवं स्वीकारणं हा जळगावकरांचा छंद आहे. जळगावात अनेक वृत्तपत्र असली तरी जळगावकरांच्या वाचनाची भूक अजून शमलेली नाही. वाचकांच्या आवडी-निवडी, त्यांना काय हवं आहे, ते जाणून 'दिव्य मराठी'ने दररोज दर्जेदार अंक प्रसिद्ध करावा.

... त्यामुळे जळगावचा विकास रखडला - पद्मश्री भवरलाल जैन (उद्योगपती)

जैन उद्योग समूहाचे राज्य सरकारकडून ५१२ कोटी रुपयांचे येणे आहे. त्याचा भुर्दंड सामान्य शेतकऱयांना बसतो आहे. तै पैसे न आल्यामुळे ठिंबक सिंचनसाठी लागणाऱया साहित्याचे दर नाईलाजाने वाढवावे लागले. वृत्तपत्राने शेतकऱयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ऐरणीवर आणल्या पाहिजे. कोरडवाहू शेतीचे तंत्र शेतकऱयांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱया पत्रकारांना शेतीचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतीविषयक स्वतंत्र सदर 'दिव्य मराठी'ने सुरू करावे. गेल्या अनेक वर्षांत केंद्र किंवा राज्य सरकारचा एकही प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आला नाही. त्यामुळे जळगावचा विकास रखडला आहे.

बातमीसोबत वाचक संस्कृती, साहित्य, परंपरा यांचाही भुकेला - पद्मश्री ना.धों. महानोर (ज्येष्ठ कवी)

बातमीसोबत वाचक संस्कृती, साहित्य, परंपरा याविषयावरील वाचनासाठी भुकेलाआहे. वृत्तपत्र आणि इतर पुरवण्यांमधून याबद्दल लिखाण झाले पाहिजे. देशातील शेतकऱयांचे प्रश्न कमी झालेत. मात्र, ते संपलेले नाहीत, याचा पाठपुरावा वृत्तपत्रांनी केला पाहिजे. कारण शासनाला केवळ वृत्तपत्राचीच भाषा कळते. जळगाव जिल्ह्यात धरणांच्या जागांचे भूमिपूजन झाले. परंतु, गेल्या कित्येक वर्षांत एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. खान्देशाला सातपुडा आणि अजिंठा या डोंगरमाथ्यामधून वाहणाऱया नद्यांचा समृद्ध परिसर लाभला आहे. परंतु, त्यानंतरही या प्रदेशाचा विकास झालेला नाही. येथील विमानतळाचा प्रकल्पही १९५५ पासून रखडलेलाच आहे. त्याचप्रमाणे जळगाव-सोलापूर  रेल्वेमार्ग ३० वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार केतकर यांनी दैनिक 'दिव्य मराठी' सुरू करण्यामागील भूमिका मांडली. भास्कर समूहाचा हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, जम्मू, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये विस्तार आहे. मे महिन्यात 'दिव्य मराठीह्'च्या महाराष्ट्रातील पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन औरंगाबाद येथे मोठय़ा दिमाखात पार पडले. त्यानंतर नाशिक आणि आता जळगाव आवृत्तीचे प्रकाशन झाले. रविवारपासून (११ सप्टेंबर) जळगावमधील घराघरांत दैनिक 'दिव्य मराठी'चा अंक दररोज पोचणार आहे.

Friday, 9 September 2011

मराठवाड्यात दैनिक भास्करने पाय रोवले

औरंगाबाद - मराठवाडा व खान्देशात हिंदी वाचक नसून, या दोन्ही विभागात हिंदी दैनिक चालत नाही, हा गोड गैरसमज दूर करीत दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्तीने केवळ दहा - बारा दिवसांत चांगलीच भरारी घेतली आहे.
मराठवाड्यात दैनिक लोकमतने दहा वर्षापुर्वी लोकमत समाचार हे हिंदी दैनिक सुरू आहे, परंतु त्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे मराठवाडयात हिंदी वाचक नसून, हिंदी दैनिक चालू शकत नाही, असा गोडगैरसमज निर्माण झाला होता.परंतु भारतातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह म्हणून ओळखल्या जाणा-या दैनिक भास्करने हा गोडगैरज दूर करीत मराठवाडा व खान्देशात चांगलेच पाय रोवले आहेत.
दैनिक भास्करच्या १३ राज्यात ६२ आवृत्त्या सुरू होत्या.औरंगाबादची ६३ वी आवृत्ती दि.२७ ऑगस्ट रोजी  सुरू झाली. नागपूर,अकोला नंतर महाराष्ट्रातील औरंगाबादची तिसरी आवृत्ती आहे.ही आवृत्ती औंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली या आठही जिल्ह्यात वितरीत केली जाते,त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात तसेच खान्देशातील जळगाव,धुळे,भुसावळ या जिल्ह्यातीलही वितरीत केली जाते.सध्या औरंगाबादहून तीन आवृत्त्या सुरू आहेत.
दररोज किमान पाने १६ व आठवडयातून ३ पुरवण्या सुरू आहेत.अंकाची किंमत दररोज २ रूपये व रविवारी ३ रूपये  आहे.वार्षिक वर्गणीदाराचा फॉर्म भरून दिल्यास भेट वस्तू, जाहिरात कुपन व लकी ड्रॉचे कुपन देण्यात येते.दर्जेदार अंक,वाचणीय पुरवण्यामुळे व विविध स्कीममुळे दैनिक भास्करने मराठवाडा,नगर व खान्देशात चांगलीच भरारी घेतली आहे.
'दैनिक भास्कर' इंटरनेट आवृत्ती

Tuesday, 6 September 2011

व्यवस्थेच्या ठेकेदारांची अस्वस्थता


 अण्णा हजारेंच्या आंदोलनाची सांगता होऊन आठवडा लोटला असला तरी देशातील तथाकथित विचारवंत, बुद्धिवंत आणि संपादक अण्णांचा लोकपाल विधेयकाबाबतचा आग्रह कसा चुकीचा होता, हे सांगण्याचा आपला घेतलेला वसा सोडायला तयार नाहीत. अण्णा कसे दुराग्रही आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी आदी त्यांचे सहकारी कसे हेकेखोर, याची वर्णनं रंगवून सांगितली जात आहे. अण्णांची एकही मागणी सरकारने पूर्ण केली नाही. अण्णा अर्धा विजय मिळविल्याचे सांगत आहे, तीसुद्धा दिशाभूलच आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. काही माध्यम तज्ज्ञ वृत्त वाहिन्यांच्या विरोधात उठले आहेत. अण्णांच्या विषयात वाहिन्यांनी विभूतीपूजेची भूमिका घेतली होती. हे माध्यम मुळातच पक्षपाती आहे, असा सूर त्यांनी लावला आहे. या सार्‍या प्रतिक्रिया मोठय़ा गमतीशीर आहेत. अण्णांना दुराग्रही म्हणणार्‍या या माणसांना आपणसुद्धा अण्णांच्या विषयात एकांगी भूमिका घेतली आहे, याचा सोयीस्कर विसर पडला आहे. तसा त्यांना अनेक गोष्टींचा विसर पडला आहे. किरण बेदी, केजरीवाल, ओम पुरींनी राजकारण्यांचा अपमान केला, त्यांना चोर म्हटले, असं सांगताना सरकार टीम अण्णांसोबत कसं वागलं हेसुद्धा या विचारवंतांनी मांडलं असतं, तर बरं झालं असतं. अण्णांसमोर सरकार सहजासहजी झुकलं नाही. सरकार नावाची यंत्रणा कुठलेही आंदोलन व आंदोलकांबाबत जी बदमाशी करते ती सारी आधी त्यांनी केली. अण्णांसहित सार्‍यांची कुंडली सरकारने तपासली. अण्णा सैन्यातून पळून आले होते काय? त्यांनी तेथे काही गैरवर्तणूक केली होती का? अण्णांच्या राळेगणसिद्धी येथील ट्रस्टचे हिशेब अशा अनेक गोष्टी तपासण्यात आल्या. केजरीवाल एनजीओ चालवितात, तिला कुठून पैसा मिळतो, याचा शोध घेण्यात आला. किरण बेदींचंही रेकॉर्ड तपासण्यात आलं. सार्‍या शासकीय यंत्रणा यासाठी कामी लावण्यात आल्या होत्या. (आता आंदोलनानंतरही केजरीवालच्या मागे इन्कमटॅक्सची भानगड लावण्यासोबत संसदेच्या हक्कभंगाची नोटीस पाठविण्यात आली आहे.) या सर्व उपद्व्यापातून जनता भडकून उठेल, असं काहीही मिळत नाही म्हटल्यानंतर सरकारने नांगी टाकली. त्याअगोदर सरकारच्या मंत्र्यांनी अकलेचे जे तारे तोडले होते, ते सार्‍या देशाने पाहिले आहेत. मनीष तिवारींनी अण्णा भ्रष्टाचारात आकंठ डुबले आहेत, अशी बडबड केली होती. चिदंबरम, कपिल सिब्बल, सलमान खुश्रीद या तीन वकील मंत्र्यांनी आपलं कायद्याचं ज्ञान पाजळत अण्णांना अटक करण्याचा हट्ट पूर्ण केला. प्रणव मुखर्जींसारखा ज्येष्ठ नेता 'अण्णांचं उपोषण हा तुमचा प्रॉब्लेम आहे', अशी भाषा वापरत होता. वाईट याचं वाटतय की, अण्णा व त्यांच्या सहकार्‍यांच्या वर्तनाची मायक्रोस्कोपिक चिकित्सा करणार्‍या विचारवंतांना या विषयात काही लिहावसं वाटत नाही. मात्र, ही विसंगतीच त्यांची नियत स्पष्ट करून जाते.
अण्णा हजारे नावाच्या माणसाचं नैतिक बळ आणि त्यांच्या आंदोलनाला देशाने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद याचं आकलनच अजूनही आपल्याकडे अनेकांना झालं नाही. दिल्लीपासून मुंबईपर्यंत, हैदराबादपासून चेन्नईपर्यंत अगदी ईशान्य भारतातसुद्धा लाखो माणसं कुठल्याही नेतृत्वाशिवाय स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरतात, हा प्रकार कित्येक वर्षानंतर घडला. राजकीय नेत्यांचे डोळे विस्फारणारा तर हा प्रकार होताच सोबतच ज्यांनी वेगवेगळ्या चळवळीत आयुष्य घालविलं, त्यांनाही वैफल्य आणणारा हा प्रकार होता. या वैफल्यातूनच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अण्णा लोकशाहीची चौकट मोडायला निघाले आहेत, अशी टीका केली. मात्र, देशातील सामान्य माणसाने अशा कुठल्याही टीकेकडे लक्ष दिले नाही. अण्णांच्या आंदोलनातील काही महत्त्वाच्या गोष्टी सारे चष्मे बाजूला ठेवून समजून घेतल्या पाहिजेत. राजकीय नेत्यांना लाखो रुपये खर्च करूनही माणसं जमवता येत नाही आणि ज्याच्याजवळ कुठलंही वलय नाही, अशा अण्णांमागे देश एकवटतो, यामागचा अर्थ स्पष्ट आहे. सारं जग सत्ता, अधिकार व पैशाच्या मागे धावत असतानाही प्रतिष्ठा मात्र अजूनही त्यागाला, फकिरी जगण्यालाच आहे. विसाव्या शतकात गांधी नावाच्या फकिराच्या मागे देश असाच लोहचुंबकासारखा आकर्षित झाला होता. अण्णांचं वैयक्तिक चारित्र्य, राळेगणसिद्धीच्या एका मंदिरातील वास्तव्य, केवळ एका पेटीचा संसार अण्णांना खूप मोठी उंची देऊन गेला. कुठलीही सत्ता, संपत्ती व ग्लॅमर नसलेला एक ७४ वर्षांचा म्हातारा देशाच्या राजकारण्यांची मस्ती उतरवितो, त्यांना तोंड लपवित फिरायला भाग पाडतो, हे अद्भूत चित्र देशाने पाहिलं. 
 अविनाश दुधे 
मीडिया वॉच

`खात्या-पित्या' कुरणातले बागडणे थांबले ....सुप्रिया बागवडेंच्या पापाचा घडा अखेर फुटला

संदीप कुलकर्णी / सातारा
सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या खंडाळय़ाला तहसीलदार सुप्रिया बागवडे 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळय़ात अडकल्या. यावेळी राजकीय वरदहस्तही त्यांना वाचवू शकला नाही. त्यांच्या मुजोरीचा आणि पापाचा घडा फुटला असून महसुलाच्या `खात्या-पित्या' कुरणातले सुप्रियाताईंचे बागडणे
सध्यातरी थांबले आहे.
महसूल खाते म्हणजे सर्वात खाते-पिते खाते. या खात्यात वर्णी लागावी यासाठी अनेकजण देव पाण्यात घालतात तर काहीजण वाटेल तेवढा पैसा ओतून पोस्टींगसाठी धडपडतात. या विभागात काम करणाऱया अगदी कोतवाल आणि तलाठय़ापासून ते तहसीलदारापर्यंत अनेकांची चांदीच असते. एकीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठवले आहे. सारा देश आदोंलनात झोकून देत आहेत आणि दुसरीकडे अशा सरकारी `खात्या-पित्या' कुरणात अनेक मदमस्त वळू निवांतपणे चरत आहेत. `सापडला तो चोर नाही तर संताहून थोर' या उक्तीप्रमाणे दिसत नसले तरी अनेक महाभाग सुप्रिया बागवडे यांच्या पकडल्या जाण्याने थोडे सावध झाल आहेत. यावर काही दिवस जातील. केस स्टँड होईल, कोणाला न्याय मिळल कोणावर अन्याय होईल. पण सिस्टिम बदलेल की नाही हे मात्र कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. तहसीलदार म्हणजे तालुक्याचा राजा. न्यायदंडाधिकारी असल्याने आपण देऊ तोच `न्याय' हे पक्के मनात बसल्यामुळे आणि पितृकृपेने मोठा राजकीय वरदहस्त असल्यामुळे सुप्रिया बागवडेंची मुजोरी दिवसेंदिवस वाढत गेली. शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊनही मूल्य, संस्कार विसरून त्या पैशाच्या हव्यासापोटी वाहवत गेल्या. विटा असो, कोरेगाव असो की जावली जेथे जाईल तेथे मॅडम वादग्रस्त ठरत गेल्या. जिल्हय़ात काम करणारे अनेक तहसीलदार आजपर्यंत वादग्रस्त ठरले मात्र त्यांची वादग्रसता चारभिंतीच्या आतच राहिली. किंवा त्या तालुक्यापुरती मर्यादीत राहिली मात्र, वरदहस्ताच्या पाठिंब्यावर व त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे बागवडे यांची वादग्रस्ता चव्हाटय़ावर आली. ती इतकी की मॅडमच्या विरोधात लोकांना आंदोलने करावी लागली. मोर्चे काढावे लागले. स्त्री म्हणजे झाशीच्या राणीचे रूप. ज्या झाशीच्या राणीने इतिहास घडवला त्या इतिहासाचा अभ्यास करून `झाशीची राणी' होऊन तालुक्याचा कारभार सांभाळण्याचे सोडून बागवडेंना पैसे कमावण्याचे डोहाळे लागले. आपल्या मुलीला क्लास वन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली म्हणून `त्या' शिक्षक पित्याचा ऊर भरून आला असेल पण त्यांच्या मुलीने संधीचे सोने नव्हे तर माती केली.
वेळ आली की नियती प्रत्येकाला योग्य शिक्षा देतेच. आणि नियतीने जर बागवडे यांना योग्य शिक्षा दिली तर कदाचित सावळज येथील द्राक्ष बागेत त्या द्राक्षं गोळा करताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चाही त्यांच्या सहकाऱयांमध्ये आहे.

ता. क. - शेतीचे क्षेत्र  बिगर शेती करण्यासाठी खंडाळ्याच्या तहसीलदार सुप्रिया बागवडे यांना २० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. त्या नंतर त्यांना न्यायालयात हजार केले असता अधिक चौकशी साठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे आत्ता पर्यंत पावणे दोन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजार केले असता. आज प्रभारी जिल्हा सरकारी वकील सौ.सरोज एस जाधव यांनी मागणी केल्याप्रमाणे  जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. अवचट यांनी लाच प्रकरणी तहसीलदार सुप्रिया बागवडे यांना चौदा दिवसाची न्यायलयीन कोठडी दि २१ सप्टेम्बर पर्यंत सुनावली आहे. 

Monday, 5 September 2011

गाजराची पुंगी : नाशिक सिटी

चला बाप्पा पावला !
गणेशोत्सवाचे प्रारंभीचे दिवस असल्याने सायंकाळनंतर कुटुबांसहित देखावे पाहण्यासाठी शनिवारपर्यंत फार गर्दी झालेली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये होणार्‍या गर्दीचा विचार करून स्वत:ला हुशार समजणार्‍या एका कुटुंबप्रमुखाने शनिवारीच कुटुंबासहित देखावे दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय जाहीर केल्यावर पत्नीने ‘अहो अजून सगळे देखावे लागलेले नसतील, आपण दोन-तीन दिवसांनी जाऊ या’, असा सल्ला दिला; मात्र स्वत:च्या हुशारीचा गर्व असलेल्या त्या कुटुंबप्रमुखाने त्याकडे दुर्लक्ष करून तयार होण्याचे आदेश दिले. मुंबई नाक्यापासून देखावे पाहण्यास प्रारंभ केला. पण गर्दी नसल्याने तसेच अद्याप खेळणी विकणारे आले नसल्याने बच्चेमंडळीला देखावे दर्शनाचा आनंद मिळत नव्हता. तिथून पुढे आले तर टॅक्सी स्टॅण्डवरील कठपुतलीचा खेळ अद्यापही सुरूच नव्हता, तर त्यापुढील संदीप हॉटेलसमोर लायटिंग पूर्ण झालेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सार्‍यांचीच हिरमोड होण्याची वेळ आली; पण आपला निर्णय कसा योग्य आहे, ते दाखविण्यासाठी कुटुंबप्रमुखाने चला पंचवटीतला सगळ्यात सुंदर देखावा दाखवतो. त्यासाठी कुटुंबप्रमुखाने एकीकडे गाडी चालवत मखमलाबादनाका येथील देखाव्याची भरपूर स्तुती केली. त्या जागेवर पोहोचल्यावर त्याला कार्यकर्त्याने सांगितले की, हा देखावा अद्याप अपूर्णच असल्याने रविवारनंतरच तो बघण्यासाठी खुला होईल. कुटुंबप्रमुखाला आपली चूक उमगली; मात्र चूक मान्य केली तर आपली नाचक्की होईल, अशी स्थिती निर्माण झाली. पावसाचे आगमन झाले. बाप्पाच पावला, असे मनाशीच म्हणत त्याने निर्णय फिरवला. चला पावसात पोरं भिजली तर आजारी पडतील. दोन-तीन दिवसांनी येऊ असे म्हणून त्याने दुचाकी घराकडे वळविली.

कैदी नको; पण गांजा आवर
गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कैद्याला भोजन आदी सुविधा नियमानुसार दिल्या जातात. मोठमोठय़ा तुरुंगांमध्ये कैद्यांना पंचतारांकित सुविधा गुपचूपपणे दिल्या जात असल्याची अनेक उदाहरणे असली, तरी तालुका आणि ग्रामीण भागातील तुरुंगात रिमांडमध्ये असलेल्या गुन्हेगारांनाही सुविधा दिल्या जात असल्याची उदाहरणेही कमी नाहीत. सिन्नर तालुक्यातल्या वावी पोलिस ठाणे भाड्याच्या जागेत असल्याने तेथील तुरुंगास तुरुंग म्हणावे की नाही हाही प्रo्न आहे. गेल्या आठवड्यात या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चास खोर्‍यात एका साधूस मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. रिमांडमध्ये चौकशीसाठी ठेवले असताना या साधूने भोजनाकडे सरळ दुर्लक्ष केले अन् मागणी केली ती गांजाची. मला काहीच नको फक्त गांजा आणून द्या, असा धोशाच त्याने लावला.

पोलिसांनी त्याला हरप्रकारे धाक दाखविला, समजावून सांगितले; पण महाशय अजिबात ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या पोलिसांना त्याची कोठडीची मुदत कधी एकदाची संपते असे होऊन गेले आणि असला कैदी नको अन् त्याच्या गांजा पुरविण्याच्या मागणीचे संकटही नको असे त्यांना होऊन गेले. गांजाच्या या शाब्दिक नशेत त्याच्या चौकशीतून काय निष्पण्ण झाले हे मात्र समजू शकले नाही.

सभात्यागाचा फंडा
जिल्हा परिषदेचे कारभारी म्हणजे लई भारी ! ते कधी काय करतील याचा नेमच नाही. लोकशाहीने दिलेली आयुधे अधिकार्‍यांवर डागताना केवळ ‘अर्थ’अस्त्रच कारभार्‍यांना काबूत करू शकते. असो. एक कारभारी जरा खुट्ट झाले की, सभात्यागाचे अस्त्र घेऊन तयारच असतो. प्रशासन नीट काम करीत नाही. सहकारी मदत करीत नाही. माझे कोणी ऐकत नाही असे सांगत कारभारी भरसभेतून सभात्याग करीत असतो. प्रारंभीस सभात्यागाचे प्रकरण सहकारी कारभार्‍यांनी गांभीर्याने घेतले. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्यांनी संबंधिताची मनधरणीही केली. मात्र पदाधिकारी काही ऐकायला तयार होईना. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचे विविध प्रकार असताना पदाधिकारी का ऐकत नाही हे कोडे सर्वांनाच होते. शुक्रवारच्या सभेत पुन्हा हाच प्रयोग झाल्यामुळे सभा संपल्यानंतर यामागचे कारण काय याविषयी तर्कवितर्क सुरू होते. सदस्यांची चर्चा सुरू असतानाच एक ठेकेदार आला व त्याने सदर कारभारी एका जागेवर जास्तीतजास्त दोनच तास बसू शकतो असा गौप्यस्फोट केला. संबंधित कारभार्‍याच्या सभात्यागाचे ‘मूळ’ एका ‘व्याधीत’ दडले असल्यामुळे सभात्यागाशिवाय ते तरी काय करणार, असा सवाल केला.

नाहीतर आम्हीच वाजवू की बारा..
गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘अमृताहूनी गोड’ दिसणारी तारका नुकतीच एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशकात येऊन गेली. त्यावेळी पत्रकारपरिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने पत्रकारपरिषदेची वेळदेखील दुपारी बाराचीच ठरली. अगदी बाराच्या ठोक्याला तिची एण्ट्री होईल आणि तिच्याच गाण्याच्या ओळी अनुभवायला मिळतील, अशी आशा पत्रकारांना होती. मात्र बारा वाजून गेले, सव्वाबारा, साडेबारा, एक वाजायला आला तरी ती येईना. पत्रकारांचा धीर सुटला. निघून जाऊ म्हणत एकेक जण उभा राहू लागला. आयोजकांनी पत्रकारांना थांबण्याची विनंती केली, तेव्हा त्यातील एक पत्रकार म्हणाला, ‘पाच मिनिटात बोलवा नाहीतर आम्हीच वाजवू की बारा’. त्याने असे म्हणताच उपस्थितामध्ये हंशा उसळला

Saturday, 3 September 2011

राळेगण सिद्धी लाईव्ह....

अण्णांनी भ्रष्टाचाराविरूध्द देशभर रणशिंग फुंकल आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी हे निसर्गाच्या कुशीत लपलेलं छोटस गाव जगाच्या नकाशावर आलं...आज राळेगणमधील परिस्थिती पूर्णपणे बदललीये...राष्ट्रीय वृत्तवाहीन्यांबरोबर वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सध्या इथं ठाण मांडून आहेत...
अण्णांच्या प्रत्येक हालाचालींवर ते बारकाईने लक्ष ठेउन आहेत....
"अण्णा अभी तक सोये हुये है... इथपासून तर... अण्णाने व्हीव्हीआयपी सिक्युरिटी लेने से इन्कार किया है..." अशा स्वरूपाच्या बातम्या सध्या सर्वत्र सुरुयेत.....
असूद्यात पण आपल्या राज्यातील एक गाव आज जगात झळकतय हे मात्र निश्चित !
(अण्णांच्या आंदोलनामुळ मी ही प्रभावीत झालो आहे...त्यामुळच राळेगण सिद्धीच्या ग्रामसभेला हजेरी लावली.....)

जितेंद्र झवर जळगाव ‘दिव्य मराठी’ च्या सेवेत

जळगाव - लोकमतच्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक जितेंद्र झवर आज दि. ३ सप्टेबरपासून दिव्य
मराठीच्या जळगाव आवृत्तीत मुख्य उपसंपादक म्हणून रूजू झाले. ते मूळचे जळगावचेच. मृदू स्वभावाचे
म्हणून परिचित असलेल्या झवर यांनी १९९८मध्ये येथूनच पत्रकारितेस प्रारंभ केला. देशदूत, सकाळ, वेब
दुनिया, लोकमत असा प्रवास करीत ते आता दिव्य मराठीला जॉईन झाले आहेत. जळगावात असताना
त्यांना शोध पत्रकारितेबद्दल पुरस्कारदेखील मिळाला होता.
झवर यांचे लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांच्याशी ट्युनिंग जुळत नव्हते.
तेदेखील जळगावचेच. बाविस्कर यांच्या दरबारी राजकारणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्यांना बराच
त्रास झाला. या वर्षी त्यांना एकाही रुपया पगारवाढ देण्यात आली नव्हती, असे कळते. याबद्दल झवर
यांनी बाविस्करांना विचारले असता ‘पगार वाढला नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. मात्र, याआधी
किती वेळा तुम्ही येऊन भेटलात?’  असा उलट प्रश्न बाविस्कर यांनी त्यांना विचारला होता. चांगले काम
करणा-यापेक्षा जे आपल्याला केबिनमध्ये भेटायला येतात, इतरांची गा-हाणी सांगतात, त्यांचेच बाविस्कर
भले करतात, असा अनुभव आल्याने झवर नाराज होते. यातच त्यांना दिव्य मराठीकडून ऑफर आली.
जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधल्याचे कळते. मुख्य
उपसंपादक म्हणून झवर यांना ३२ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात आले. लोकमतमध्ये त्यांचा पगार १७ ते
१८ हजार रुपये होता.
झवर दिव्य मराठीला जॉइन होताच पुणे लोकमतमधील एका पत्रकाराने माझेही ‘दिव्य’ त काम करून
द्या, अशी गळ त्यांना घातली आहे. बाविस्कर दरबारी राजकारण करतात, ही बाब हेरून या पत्रकाराने
त्यांच्या केबिनच्या फे-या वाढवल्या. साहेबांबद्दल कोण काय बोलतात, याची खरी-खोटी तपशीलवार
माहिती देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली. नित्यपणे बाविस्करांच्या दरबारात जाऊन त्यांना
कुर्निसात करणे या दाढीधारीने आपले आद्यकर्तव्य मानले. झवर काहीच काम करीत नाही, असे वारंवार
सांगून त्यांनी झवर यांच्याबद्दल बाविस्करांचे मन कलुषित केले. या पत्रकाराची ही ‘बातमीदारी’  झवर यांना
कळलीदेखील. मात्र, आपण भले व आपले काम भले, अशी वृत्ती जोपासणा-या झवर यांनी त्याकडे फारसे
लक्ष दिले नव्हते. विदर्भ ‘देश’ चे मूळ रहिवासी असलेल्या या दाढीधारी व्यक्तीने दिव्य मराठीत नोकरी
मिळवण्यासाठी आता झवर यांना विनंती करून स्वत:हुन आपला ‘मुख’ भंग करून घेतला आहे.
लोकमतचे जुने सहकारी संदीप पारुळेकर यांच्यामार्फतही हे दाढीधारी प्रयत्न करीत आहेत. येत्या
काही दिवसात ते खांडेकरचरणी जाणार असल्याची चर्चा आहे. दारू पिऊन कामावर येण्याच्या व इतर
दिव्य चमत्कारांमुळे विदर्भातील सकाळ आवृत्तीने त्यांचे ‘मुख’  न पाहण्याचे ठरवले आहे. पुण्यात आपल्या
‘दरबारी बातमीदारी’ ची डाळ फार दिवस शिजणार नाही, हे लक्षात आल्याने हे जुने पुढारीवासी
खान‘देश’ मध्ये जाण्यास उतावीळ आहेत. नियतीचा न्याय बघा..........वरिष्ठांना खोटे-नाटे सांगून आपले
स्थान बळकट करू पाहणारे दुस-या वृत्तपत्रात संधी मिळण्यासाठी वणवण भटकत आहेत. दुसरीकडे,
दरबारी राजकारणामुळे काही काळ नुकसान सहन करणा-या झवर यांना नियतीने त्यांच्या कामाचे व संयमी
स्वभावाचे बक्षीस म्हणून पद व पगार वाढवून आपल्याच शहरात आणून सोडले.

Thursday, 1 September 2011

खुषखबर... कुमारस्वामी आता ‘खा.’ होणार...!

खुष खबर... खुष खबर... खुष खबर... महाराष्ट्र देशीचे महान पत्रककार श्री श्री कुमारस्वामी यांच्या गळ्यात लवकरच ‘खा.’ पदाची माळ (अखेर) पडणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्राकडून (म्हणजे आमच्या मनातल्या मनात) कळते. 


श्री श्री कुमारस्वामी (श्री श्री ही दुहेरी उपाधी त्यांच्याबद्दल आमच्या मनातील परम आदर दर्शविणारी आहे. गैरसमज नसावा) म्हणजे निधड्या छातीचा पत्रकार! आतापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या छातीत कित्येक गोष्टी दाबून ठेवल्या. योग्य वेळी त्या त्यांनी बाहेर काढल्या. त्यांच्या अनेक इच्छा होत्या. महाराष्ट्रदेशीच्या सर्वाधिक दैनिकांच्या प्रमुखपदावर काम करून दाखवीन ही प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईसमोर केली होती असे मध्यंतरी त्यांच्या मावशीकडून आम्हाला कळले. (या मावशींचा चिरोटे तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे. पुण्यात आमच्या शेजारीच राहतात.) लहानपणी आपल्या आईला दिलेले वचन म्हातारपणापर्यंत जाताना (खरे तर आम्ही त्यांना म्हातारा म्हणू इच्छित नव्हतो. पण शब्दांचा परिणाम उठून दिसण्यासाठी हा शब्द वापरण्याचा नाईलाज आहे. क्षमस्व) स्मरणात ठेवण्याची त्यांची शक्ती खरोखरच स्पृहणीय आहे म्हणायची. आतापर्यंत इंग्रजी-मराठी धरून मुदलात पाच पेप्रांच्या मेन मेन पोस्टवर श्री श्री कुमारस्वामी यांनी आपली योग्यता सिद्ध केली. सध्या त्यांच्या ‘दिव्य’ बुद्धिमत्तेचा प्रकाश सार्‍या संबंध अख्ख्या अखिल महाराष्ट्रभर फाकतो आहे. 


अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लीक करा...