Thursday, 22 September 2011

भारतकुमार राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार

मुंबई - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. माधवराव अंभोरे यांनी आज येथे केली. ९ ऑक्टोबर रोजी वासिम येथे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे परिषदेच्या प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार खा.भारतकुमार राऊत यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्रात आला आहे. दैनिक देशोन्नतीने हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, पां.वा.गाडगीळ पुरस्कार सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, ग.त्र्य. माडखोलकर पुरस्कार देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले, आचार्य अत्रे पुरस्कार सामनाचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अरुण निगवेकर यांना, नागोजीराव दुधगावकर पुरस्कार आय.बी.एन.चे औरंगाबाद ब्युरो चीफ संजय वरकड यांना, उद्योगपती रावसाहेब गोगटे पुरस्कार ‘लोकमत’ चे संगमेश्वर येथील पत्रकार जे.डी.पराडकर यांना, कृषीवलकर प्रभाकर पाटील स्मृती पुरस्कार माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना, तर सावित्रीबाइ फुले पुरस्कार स्टार माझा च्या नागपूर ब्युरो चीफ सरिता कौशिक यांना जाहीर करण्यात आला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश डहाके, आमदार सुभाष झनक, आमदार लखन मलिक, माहिती संचालक श्रध्दा बेलसरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, वाशिम नगरपालिकेचे अध्यक्ष अशोक हेडा आदी उपस्थित राहणार आहेत.वाशिम येथे होणा-या या कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संख्यंने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे किरण नाईक यांनी केले आहे.