औरंगाबाद - मराठवाडा व खान्देशात हिंदी वाचक नसून, या दोन्ही विभागात हिंदी दैनिक चालत नाही, हा गोड गैरसमज दूर करीत दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्तीने केवळ दहा - बारा दिवसांत चांगलीच भरारी घेतली आहे.
मराठवाड्यात दैनिक लोकमतने दहा वर्षापुर्वी लोकमत समाचार हे हिंदी दैनिक सुरू आहे, परंतु त्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे मराठवाडयात हिंदी वाचक नसून, हिंदी दैनिक चालू शकत नाही, असा गोडगैरसमज निर्माण झाला होता.परंतु भारतातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह म्हणून ओळखल्या जाणा-या दैनिक भास्करने हा गोडगैरज दूर करीत मराठवाडा व खान्देशात चांगलेच पाय रोवले आहेत.
दैनिक भास्करच्या १३ राज्यात ६२ आवृत्त्या सुरू होत्या.औरंगाबादची ६३ वी आवृत्ती दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू झाली. नागपूर,अकोला नंतर महाराष्ट्रातील औरंगाबादची तिसरी आवृत्ती आहे.ही आवृत्ती औंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली या आठही जिल्ह्यात वितरीत केली जाते,त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात तसेच खान्देशातील जळगाव,धुळे,भुसावळ या जिल्ह्यातीलही वितरीत केली जाते.सध्या औरंगाबादहून तीन आवृत्त्या सुरू आहेत.
दररोज किमान पाने १६ व आठवडयातून ३ पुरवण्या सुरू आहेत.अंकाची किंमत दररोज २ रूपये व रविवारी ३ रूपये आहे.वार्षिक वर्गणीदाराचा फॉर्म भरून दिल्यास भेट वस्तू, जाहिरात कुपन व लकी ड्रॉचे कुपन देण्यात येते.दर्जेदार अंक,वाचणीय पुरवण्यामुळे व विविध स्कीममुळे दैनिक भास्करने मराठवाडा,नगर व खान्देशात चांगलीच भरारी घेतली आहे.
'दैनिक भास्कर' इंटरनेट आवृत्ती