सोलापूर -लोकमत सोडल्यापासून( की काढल्यापासून? ) ‘बस’ खात्यात असणारे शांतकुमार मोरे ‘पद्मश्रीं’ चे ‘पुढारी’ होणार असून ते लवकरच सोलापूर कार्यालयात रूजू होणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. दरम्यान, ‘मीच सोलापूरचा पुढारी’ अशा तो-यात वावरणारे आवृत्तीप्रमुख अभय दिवाणजी हे अन्य पर्यायाच्या शोधात असल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या थकबाकीमुळे ‘पद्मश्री’ सोलापूर कार्यालयाच्या कामकाजावर नाखूष होते. त्यातच दिवाणजी व चौधरी यांच्यातील शीतयुध्दाच्या अनेक तक्रारी कोल्हापूरपर्यंत पोहचल्या होत्या. हेमंत चौधरी हे ‘पद्मश्रीं’ चे जुनेजाणते सहकारी असून त्यांचे ‘ फॅमेलीमेंबर’ म्हणून ओळखले जातात. मात्र दिवाणजींनी पुढारीच्या सोलापूर कार्यालयात रूजू झाल्यापासून चौधरींच्या साम्राज्याला सुरूंग लावला होता. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नव्हता.
या पाश्र्वभूमीवर दिवाणजींना धक्का देण्याची खलबते कोल्हापुरात चालली होती. दरम्यानच्या काळात लोकमत सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक शांतकुमार मोरे लोकमतमधून बाहेर पडले.(लोकमतने त्यांना काढले की त्यांनीच लोकमतला सोडले हे लोकमत आणि मोरे यांनाच माहित) त्यामुळे ते निवांतच होते. त्यातच सोलापूर लोकमतमधील त्यांचे एकेकाळचे वरिष्ठ अरूण खोरे पुणे पुढारीत दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून(व्हाया चौधरी) मोरे ‘पद्मश्रीं’ च्या कोल्हापुरात पोहचले. ‘पद्मश्रीं’ नी मोरे यांना सोलापूर पुढारीचे निवासी संपादकपद दिले असून ते १ ऑक्टोबर रोजी सोलापूर कार्यालयाचा पदभार स्विकारणार असल्याची खबर ‘बेरक्या’ पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, मोरे हे एकेकाळचे दिवाणजींचे लोकमतमधील वरिष्ठ असूनही त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे दिवाणजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळचे लोकमतचे ‘बॉस’ मधुकर भावे यांच्या वशिल्याने ‘डी.एम.’ च्या संपर्कात असल्याची चर्चासुध्दा सोलापुरात सुरू झाली आहे.