Saturday, 3 September 2011

जितेंद्र झवर जळगाव ‘दिव्य मराठी’ च्या सेवेत

जळगाव - लोकमतच्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक जितेंद्र झवर आज दि. ३ सप्टेबरपासून दिव्य
मराठीच्या जळगाव आवृत्तीत मुख्य उपसंपादक म्हणून रूजू झाले. ते मूळचे जळगावचेच. मृदू स्वभावाचे
म्हणून परिचित असलेल्या झवर यांनी १९९८मध्ये येथूनच पत्रकारितेस प्रारंभ केला. देशदूत, सकाळ, वेब
दुनिया, लोकमत असा प्रवास करीत ते आता दिव्य मराठीला जॉईन झाले आहेत. जळगावात असताना
त्यांना शोध पत्रकारितेबद्दल पुरस्कारदेखील मिळाला होता.
झवर यांचे लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांच्याशी ट्युनिंग जुळत नव्हते.
तेदेखील जळगावचेच. बाविस्कर यांच्या दरबारी राजकारणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्यांना बराच
त्रास झाला. या वर्षी त्यांना एकाही रुपया पगारवाढ देण्यात आली नव्हती, असे कळते. याबद्दल झवर
यांनी बाविस्करांना विचारले असता ‘पगार वाढला नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. मात्र, याआधी
किती वेळा तुम्ही येऊन भेटलात?’  असा उलट प्रश्न बाविस्कर यांनी त्यांना विचारला होता. चांगले काम
करणा-यापेक्षा जे आपल्याला केबिनमध्ये भेटायला येतात, इतरांची गा-हाणी सांगतात, त्यांचेच बाविस्कर
भले करतात, असा अनुभव आल्याने झवर नाराज होते. यातच त्यांना दिव्य मराठीकडून ऑफर आली.
जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधल्याचे कळते. मुख्य
उपसंपादक म्हणून झवर यांना ३२ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात आले. लोकमतमध्ये त्यांचा पगार १७ ते
१८ हजार रुपये होता.
झवर दिव्य मराठीला जॉइन होताच पुणे लोकमतमधील एका पत्रकाराने माझेही ‘दिव्य’ त काम करून
द्या, अशी गळ त्यांना घातली आहे. बाविस्कर दरबारी राजकारण करतात, ही बाब हेरून या पत्रकाराने
त्यांच्या केबिनच्या फे-या वाढवल्या. साहेबांबद्दल कोण काय बोलतात, याची खरी-खोटी तपशीलवार
माहिती देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली. नित्यपणे बाविस्करांच्या दरबारात जाऊन त्यांना
कुर्निसात करणे या दाढीधारीने आपले आद्यकर्तव्य मानले. झवर काहीच काम करीत नाही, असे वारंवार
सांगून त्यांनी झवर यांच्याबद्दल बाविस्करांचे मन कलुषित केले. या पत्रकाराची ही ‘बातमीदारी’  झवर यांना
कळलीदेखील. मात्र, आपण भले व आपले काम भले, अशी वृत्ती जोपासणा-या झवर यांनी त्याकडे फारसे
लक्ष दिले नव्हते. विदर्भ ‘देश’ चे मूळ रहिवासी असलेल्या या दाढीधारी व्यक्तीने दिव्य मराठीत नोकरी
मिळवण्यासाठी आता झवर यांना विनंती करून स्वत:हुन आपला ‘मुख’ भंग करून घेतला आहे.
लोकमतचे जुने सहकारी संदीप पारुळेकर यांच्यामार्फतही हे दाढीधारी प्रयत्न करीत आहेत. येत्या
काही दिवसात ते खांडेकरचरणी जाणार असल्याची चर्चा आहे. दारू पिऊन कामावर येण्याच्या व इतर
दिव्य चमत्कारांमुळे विदर्भातील सकाळ आवृत्तीने त्यांचे ‘मुख’  न पाहण्याचे ठरवले आहे. पुण्यात आपल्या
‘दरबारी बातमीदारी’ ची डाळ फार दिवस शिजणार नाही, हे लक्षात आल्याने हे जुने पुढारीवासी
खान‘देश’ मध्ये जाण्यास उतावीळ आहेत. नियतीचा न्याय बघा..........वरिष्ठांना खोटे-नाटे सांगून आपले
स्थान बळकट करू पाहणारे दुस-या वृत्तपत्रात संधी मिळण्यासाठी वणवण भटकत आहेत. दुसरीकडे,
दरबारी राजकारणामुळे काही काळ नुकसान सहन करणा-या झवर यांना नियतीने त्यांच्या कामाचे व संयमी
स्वभावाचे बक्षीस म्हणून पद व पगार वाढवून आपल्याच शहरात आणून सोडले.