उस्मानाबाद - मुंबई,पुणे पाठोपाठ आता नशिकमध्ये सुरू झालेल्या स्मार्ट मित्र पेपरच्या एका वार्ताहराने काँग्रेसच्या एका मंत्र्याला कशी टोपी घातली,याची रसभरीत चर्चा उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्यात चालू आहे.
या वार्ताहराला उस्मानाबाद शहर व जिल्ह्यात शेठजी म्हणून संबोधले जाते.पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना कार्यक्रमाच्या नावाखाली अधिकारी, पुढा-यांना कसा गंडा घातला याचे किस्से अजूनही चर्चेत असताना, चक्क स्मार्ट मित्रच्या नावाखाली काँग्रेसच्या एका मंत्र्याला त्याने कशी टोपी घातली,याचा किस्सा या मंत्र्याचे पीए असलेले तुळजापूरचे जाधव चांगल्या प्रकारे सांगू शकतात.
घडले असे की,काँग्रेसचे युवराज राहूल गांधी हे सहा महिन्यापुर्वी उस्मानाबादच्या दौ-यावर आले होते.त्यावेळी काँग्रेसच्या एका मंत्र्याने स्मार्ट मित्र पेपरला १ लाख २० हजार रूपयाची जाहिरात दिली होती.या जाहिरातीची रोख रक्कम या मंत्र्याच्या पी.ए.ने या शेठजीकडे दिले होते.गंमत अशी की, ही जाहिरातच स्मार्ट मित्रमध्ये प्रसिध्द झाली नाही.नंतर या मंत्र्याच्या पी.ए.ने जाहिरात आली नाही म्हणून १ लाख २० हजार रूपये रक्कम परत मागितली असता,त्यांनी मी डी.डी.करून पेपरकडे पाठविला आहे, थोडे थांबा म्हणून दोन महिने घालविले.दोन महिन्यानंतर या पी.ए.बरोबर बाचाबाची झाल्यानंतर त्याने ४० हजार रूपये काढून दिले.नंतर चार महिन्यांनतर मोठा राडा झाल्यानंतर परत ४० हजार दिले.आता उर्वरित ४० हजार रूपये देण्याचे नाव काढल्यानंतर हे शेठजी म्हणतात, माझ्याकडे तीन - चार पेपर असून,माझ्या मागे पाच - सहा पत्रकार आहेत, तुमच्या साहेबांच्या बातम्या फुकट छापायच्या का, असा उलटा दम देत आहेत.कंटाळलेले जाधव ...साहेबांनाही सांगू शकत नाहीत व शेठजीबरोबर जास्त पंगाही घेवू शकत नाहीत, कारण उलट - सुलट बातम्या छापण्याचा खानदानी पेशा या शेठजीचा चालू आहे.
औरंगाबादच्या शेठजीच्या पेपरमध्ये या शेठजीचे बंधुराज जिल्हा प्रतिनिधी होते.परंतु बंधुराजचे सर्व काम तेच करायचे.वाशी तालुक्यातील इंदापूरच्या मुंबई निवासी एका उद्योगपतीला विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी पुरवणीच्या नावाखाली कसे फसविले याची किर्ती पार ऋषीबाबूपर्यंत पोहचली,तेव्हा राजेंद्र बाबूजींनी पोसलेल्या या उस्मानाबादच्या बाबूजीला त्यांनी झटक्यात दूर करून विशाल निर्णय घेतला.नंतर उस्मानाबादचे हे बाबूजी कोल्हापूरच्या पद्मश्रीकडे गेले व आपण महाराष्ट्राच्या मानबिंदूची अख्खी टीप फोडतो, संपूर्ण जाहिरात व्यवसाय तुमच्याकडे वळवितो अशी खोटी आश्वासने देवून, वार्ताहरपद मिळविले.परंतु पद्मश्रीची औरंगाबाद आवृत्तीच सुरू न झाल्यामुळे बाबूजींचा व त्यांच्या शेठजी भाऊचा चेहरा पार काळवंडला आहे.
पत्रकार संघाचे अध्यक्षपद गेल्यामुळे तसेच महाराष्ट्राचा मानबिंदू हातचा गेल्यामुळे शेठजीची सद्दी संपली असून, त्यामुळेच सोलापूरच्या एका रद्दी पेपरचेही त्यांनी काम सुरू केले आहे.ढापाढापीत मास्टर माईंड असलेल्या शेठजीच्या मागे आता कोणतेही पत्रकार पाठबळ देत नसल्यामुळे त्यांनी इतर पत्रकारांच्या खोट्या तक्रारी खोटया तक्रारदाराच्या नावे पाठविण्याचा कुटीरउद्योग सुरू केला आहे.अशाच भानगडीमुळे उस्मानाबादच्या काही पोरांनी त्यांना त्यांच्या दुकानातच चांगलेच ठोकले होते.अनेकवेळा काहींना काही कारणामुळे मार खालेल्या या शेठजीच्या असंख्य भानगडी आमच्याकडे उपलब्ध झाल्या असून,त्या यथाअवकाश प्रसिध्द करू...
ता.क. - एका पत्रकार परिषदेत बूट चोरीला गेल्यानंतर संयोजकाकडून ९०० रूपये कसे वसूल केले, सोलापूरच्या लोकमंगलने उस्मानाबादच्या पत्रकारांसाठी पाठविलेल्या तुपाचे डबे कसे एकट्याने हाणले, रांजनीच्या कारखान्याने पत्रकारांसाठी पाठविलेली साखर कशी गिळंकृत केली, याचा सविस्तर पंचनामा लवकरच....